वनस्पतीशास्त्र फुल फुले

जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त फुल कोणते आहे?

2 उत्तरे
2 answers

जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त फुल कोणते आहे?

1
वनस्पती !

माणूसच काय, पूर्ण प्राणी जगत अस्तित्वात येण्याच्या किती आधीपासून ह्या भूतलावर त्याचं राज्य आहे. सर्वात जास्त विविधता आणि उत्क्रांती चे भरपूर निकष आपण वनस्पती मध्ये पाहू शकतो. त्यामुळे नवनवीन आणि इंटरेस्टिंग जाती आज देखील जगासमोर येत आहेत.

तर आपण ज्या अळूच्या पानांची वडी खातो, किंवा सुरणाची भाजी खातो त्याच वर्गातील ( फॅमिली - Araceae) आणि जगातील सर्वात मोठ्या फुलांपैकी एक असलेली Titan Arum नावाची वनस्पती , सर्वात घाण , दुर्गंधीयुक्त फुल मानली जाते.

  

हिला दुसर नाव आहे Corpse Flower , म्हणजेच शव फूल ! कारण ह्या फुलाचा दुर्गंध एका मेलेल्या , कुजलेल्या मानवी शवा सारखा असतो! जे वरती चित्रा मध्ये दिसत आहे ते त्याच फुल , फुलोरा (inflorescence) आहे. ह्या वनस्पती चा उगम सुमात्रा बेटावर झाला असून , आता बऱ्याच देशांच्या वनस्पती उद्यान मध्ये हीची लागवड केली जाते ( संशोधन आणि शोभे ? साठी!)

बरं आकाराने देखील मोठं असल्याने , जगातील सर्वात उंच फूल असण्याचा मान देखील ह्याच वनस्पती चा आहे. ह्याची उंची तब्बल १० फूट २ इंच इतकी मोजली गेली आहे. आकाराने काही ठिकाणी ह्या फुलाला titan Penis Arum देखील संबोधलं जात.

अश्याच प्रकारचं पण थोड छोट फूल तुम्ही परसात , किंवा जंगलात पाहिलं असेल, ते असत सुरणाच फूल! खूप जास्त दुर्मिळ आणि खूप कमी वेळ टिकणारे म्हणून आपल्या जास्त दृष्टीस पडत नाही आणि ह्याचा देखील वास घाण च असतो.
  

कधी पाहिलंय का? कमेंट मध्ये जरूर कळवा , मला देखील प्रत्यक्षात बघायचं आहे!
उत्तर लिहिले · 18/8/2021
कर्म · 121765
0

जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त ফুল ॲमॉर्फोफॅलस टिटॅनम (Amorphophallus titanum) आहे. या फुलाला 'शव ফুল' (corpse flower) म्हणूनही ओळखले जाते, कारण ते सडलेल्या मांसासारखा वास देते.

ॲमॉर्फोफॅलस टिटॅनम (Amorphophallus titanum) फुला विषयी माहिती:

  • हे ফুল इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर आढळते.
  • ते जगातील सर्वात मोठे अशाखीय ফুল आहे.
  • या फुलाची उंची 10 फुटांपेक्षा जास्त असू शकते.
  • ॲमॉर्फोफॅलस टिटॅनम ফুল काही दिवसांसाठीच असते.

दुर्गंधीचे कारण:

  • हे ফুল পরাगकण (pollination) करण्यासाठी कीटकांना आकर्षित करते आणि म्हणूनच त्यातून दुर्गंधी येते.

इतर दुर्गंधीयुक्त ফুল:

  • रॅफ्लेसिया अर्नोल्डी (Rafflesia arnoldii): हे ফুল देखील दुर्गंधीयुक्त आहे आणि ते इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये आढळते.

अधिक माहितीसाठी:

  • विकिपीडिया
  • उत्तर लिहिले · 23/3/2025
    कर्म · 2400

    Related Questions

    जगात सर्वात महाग झाड कोणते?
    पाणकणीस बद्दल माहिती द्या?
    कॅरोलिना रीपर या मिरचीचे बियाणे भारतात कुठे मिळते?
    मनचंंदीच्या झाडाचे वैशिष्ट्य काय?
    पींपळ, वड आणि तुळस यांच्या व्यतिरिक्त आणखी अशी कोणकोणती झाडे आहेत जी केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीही प्राणवायू पुरवतात?
    "बांडगुळ" म्हणजे काय? त्याच्या किती जाती असतात?
    द हार्ड ऑफ फेनुगरे?