पानिपतच्या लढाईचे परिणाम?

2 उत्तरे
2 answers

पानिपतच्या लढाईचे परिणाम?

1
पानिपतच्या तिस-या युद्धात मराठ्यांचे प्रचंड सैन्य मारले गेले. महाराष्ट्रामधील एक कर्ती पिढी पुर्णपणे नष्ट झाली. संपुर्ण महाराष्ट्र भर दु:खाची छाया पसरली. ... ३) मराठा सत्तेस हादरा : पानिपतच्या लढाईतील पराभवामुळे मराठ्यांच्या राजकीय सत्तेस फार मोठा धक्का बसला.प्रसिद्ध पत्रकार खुशवंत सिंग म्हणतात की पानिपत च्या युद्ध मध्ये मराठे आणि अब्दाली पेक्षा जास्त फायदा शिखांचा झाला, काही न करताच त्यांनी मोठा युद्ध जिंकला.

अब्दाली ने कधीच विचार केला नव्हता की त्याला 18 महिने भारतात राहावे लागेल आणि कैक सैन्य आणि पैसे घालवावे लागेल.त्याने दिल्लीचा दरबार भरवला आणि जुनी व्यवसथा चालू च ठेवली. इमद उलक आणि नजीब चा हुद्दा तसाच ठेवला.

दिल्लीचे तख्त राखण्यासाठी धावून गेलेले सह्याद्रीचे मरगठ्ठे आणि हिंदुस्थान काबीज करण्याच्या इराद्याने आलेला अफ़गाण बादशहा अहमदशहा अब्दाली यांच्यातील पानिपत युद्धाला 258 वर्ष झाले .इतकी वर्षे ही जखम मराठी माणूस अश्वत्थाम्याप्रमाणे उरावर घेऊन फ़िरतो आहे.पानिपतच्या या संग्रामात एका दिवसात सुमारे एक लक्ष मराठी वीर धारातीर्थी पडले. श्रीमंत विश्वासराव पेशवे, सदाशिवराव भाऊ यांच्याबरोबरच बुंदेले, होळकर आदी अनेक सरदारही होते. जगाच्या इतिहासात एकाच दिवसात इतक्या प्रचंड संख्येने नरसंहार होण्याची ही एकमेव घटना आहे.अगदी अलीकडे हिरोशिमा व नागासकी अणुस्फ़ोटातसुद्धा दीड लक्ष जपानी नागरिक ठार झाले होते.पण या प्रक्रियेलासुद्धा चार दिवस लागले होते.


पराभव हा शेवटी पराभवच असतो व म्हणून तो वाईटच असतो, पण पानिपतच्या पराभवाचा मोठा बाऊ करण्यात येतो तो मात्र चुकीचा होय.या युद्धाचे परिणाम फार भयंकर झाले. आख्या महाराष्ट्रात एकही घर असे नव्हते की ज्यातील कोणी मृत्यूमुखी पडले नाही. महाराष्ट्राची एक आख्खी पिढी मारली गेली. अफगाण सैन्याने तर अशी दहशत खाल्ली की अवघ्या ३८ वर्षात अनेक देशांच्या सरहद्दीला धडका देणार्या अब्दालीलाच काय पण अनेक परकीय यवनी राजांना भारताकडे येण्याची हिम्मत झाली नाही.
 

पानिपतच्या पराभवामुळे मराठे आता संपले, कायमचे महाराष्ट्रात गेले म्हणून खूश झालेल्या उत्तरवासीयांना धक्का दिला तो अब्दालीनेच. आम्ही पंजाब आमच्या ताब्यात ठेवून मायदेशी जात आहोत. हिंदुस्थानचा कारभार तुम्हीच पूर्ववत चालवावा असा निरोप अब्दालीने मराठय़ांना पाठवला. त्यानुसार पेशव्यांचे हिंगणे वकील लाहोर मुक्कामी अब्दालीला भेटले. अब्दालीचा वकीलसुद्धा पुणे दरबारात दाखल होऊन त्याने थोरल्या माधवराव पेशव्यांबरोबर वाटाघाटी केल्या. योग्य ते करारमदार झाले. अब्दालीने माधवरावाला मानाचा पोशाख पाठवला. माधवरावांनीही अब्दालीला वस्त्रे व हत्ती पाठवून त्याचा सन्मान केला. पानिपत हा एक दुर्दैवी अपघात समजावा. तुमचे आमचे वैर नाही अशी परस्पर समजूतही झाली.[1]


या संदर्भात इव्हान्स बेल यांचे मत उद्धृत करणे उचित ठरेल. ‘पानिपतची लढाईसुद्धा मराठय़ांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे. मराठे ‘हिंदुस्थान सर्व हिंदी लोकांसाठीच’ या ध्येयासाठी लढले.’
 

प्राचार्य रॉलिन्सन म्हणतात, ‘विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासातील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो आणि मराठय़ांच्या सर्व इतिहासात त्यांच्या फौजेने राष्ट्रातील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपतच्या घनघोर रणक्षेत्रात आपल्या देशाच्या व धर्माच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल.’

शाह वलीउल्लह च्या जिहादी प्रेरणेमुळे अब्दालीने हिंदुस्तानवर स्वार्या केल्या.
१७५७ ते १७६१ च्या दरम्यान केलेल्या एकूण लुटीत अहमदशहा अब्दालीने २४ कोटींची संपती लुटून नेली, आजच्या काळातले सुमारे २५,००० कोटी रुपये.
हिंदुस्तान च्या रक्षणासाठी किंवा राष्ट्ररक्षणाच्या भावनेतून मराठ्यांनी केलेली हि लढाई हे प्रमुख वैशिष्ठ्य होय.तर इथल्या अन्नावर पोसून सुद्धा अफगाण्यान्ची साथ करणारे नजिबखान आणि शुजाउद्दौला राष्ट्रद्रोही निघाले. पराभवानंतर मराठ्यांनी केलेली मोर्चेबांधणी,फौजेचे आधुनिकीकरण,युद्धात कुचराई करणार्यांना दिलेल्या शिक्षा, महादजी शिंद्यांनी बदला घेण्याची केलेली भीष्मप्रतिज्ञा या पार्श्वभूमीवर अब्दालीने पुन्हा भारतावर आक्रमण करण्याची चूक केली नाही. झालेल्या पराभवानंतर १० च वर्षात मराठ्यांनी पुनर्वैभव प्राप्त केले
पानिपतच्या युद्धानी मराठी भाषेतसुद्धा म्हणी आणि वाक्प्रचारांची भर घातली, जसे कि -
पानिपत होणे,संक्रांत कोसळणे,१७६० गोष्टी करणे,प्यादाचा फर्जी,भाऊगर्दी,मुरगी मारी बच्चे दानादान,कालचा शेणामेनाचा झाला लोखंडाचा,रानभरी जाहले इत्यादी.
कुतुबशाह चे मुंडके छाटून,नजीबचे थडगे फोडून आणि हिंदुस्तान वर सत्ता पुनर्स्थापित करून मराठ्यांनी आपला पानिपत चा बदला घेतला अर्थात बदल घेतला[2]

जगामध्ये काही अशी राष्ट्र आहेत ज्यांनी कधीही हार स्वीकारली नाही. याचे उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान. रशिया ने १९७९ ला वर हल्ला केला नशिबी पराभव चा आला .आता सुद्धा अमेरिका तिथल्या युद्धाला कंटाळी आहे पण २००१ पासून आता पर्यंत १८ वर्ष झालीत विजय नाहीच. ब्रिटिशांनी तर तीन तीन युद्ध केली अफगाणिस्तान बरोबर ,१८३९ मध्ये पहिले युद्ध ,१८७८ मध्ये दुसरे युद्ध ,१९१९ मध्ये तिसरे युद्ध . दोस्त खान हा त्यांचा नायक. अशा अफगाणिस्तान कडून मराठे हरले तरी अहमद शाह दुर्रानी आणि त्यांची फौज नुकसान झाले कि ते पुन्हा भारतात आले नाही. ज्यांच्या हातून पराभव झाला तो सेनानी कुशल आणि सैन्य पराक्रमी होते. अन याच अब्दाली च्या सैन्याला आणि त्याच्या मुलाला १७५८ मध्ये राघोबा आणि मल्हार राव यांनी अफगाणिस्तान ला पळवले होते हे विसरता काम नये मराठय़ांकडून मार खाल्ल्याचे शल्य अब्दालीच्या जिव्हारी खुपत होते. तो १७६१ मध्ये पुन्हा एकदा सर्वशक्तिनिशी हिंदुस्थानवर चालून आला. दरम्यान, मराठय़ांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व सहन न होणाऱ्या हिंदू-मुसलमानांचा एक मोठा गट उत्तरेत तयार झाला होता. रजपुतादी हिंदू सत्ताधाऱ्यांना मराठे उपरे वाटत होते. कानामागून येऊन तिखट होऊन व आपल्या राखीव कुरणात वाटेकरी झालेले मराठे त्यांना आवडत नव्हते. कट्टर मुसलमान मराठय़ांकडे काफिर म्हणून पाहात होते. त्यांनी दिल्लीच्या इस्लामी तख्तावर वर्चस्व गाजवणे त्यांना आवडणारे नव्हते. शाह वली उल्लाह या त्यांच्या धार्मिक नेत्याने मराठय़ांना हटवण्यासाठी उत्तरेतील मुसलमान सत्ताधीशांना एकजूट करण्याचे आवाहन धर्माच्या नावाखाली केले. अर्थात, तेवढय़ाने काम होणार नव्हते याची खात्री असल्याने त्याने अब्दालीच्या धर्मभावनेला साद घालून मराठय़ांच्या जोखडातून मुक्त करण्याची प्रार्थना केली. अब्दालीलाही हे हवे होतेच, पण तरीही मराठय़ांशी भिडायला तो नाखूशच होता. पानिपतच्या सुप्रसिद्ध लढाईला तोंड फुटण्यापूर्वी त्याने मराठय़ांशी तह करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मराठय़ांनी पंजाब प्रांतापर्यंत अब्दालीचा अंमल मान्य करायचा एवढीच त्याची अट होती. पण जिथे मराठय़ांचीच काबूल, कंदाहापर्यंत नजर होती तिथे ते ही अट मान्य करणे शक्य नव्हते. पानिपतचे युद्ध अटळ होते ते असे. या युद्धामागची मराठय़ांची भूमिका नीट समजून घेतली जात नाही. उत्तरेकडे कूच करताना सेनापती सदाशिवरावभाऊ याने उत्तरेतील हिंदू-मुसलमान सत्ताधीशांना जी पत्रे धाडली होती त्यातून ही भूमिका व्यक्त झाली आहे. भाऊंच्या आवाहनानुसार अब्दाली हा परकीय शत्रू. त्याचा मुकाबला येथील सर्व हिंदू-मुसलमानांनी एकत्र येऊन करायला हवा. वायव्येकडून होणारी आक्रमणे मराठय़ांच्या हस्तक्षेपामुळे कायमची थांबली. सांगायला हरकत नाही की मराठय़ांचा कायमचा बंदोबस्त करायला अफगाणांनी हिंदुस्थानवर पुन्हा चालून यावे अशी निमंत्रणपत्रे त्यानंतरही काबूलला अनेक वेळा गेली. ती लिहिणाऱ्यांमध्ये हिंदू रजपूत संस्थानिकही होते.

पानिपतच्या युद्धामुळे सुरजमल ,राजपूत ,शीख यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या. शिखांनी स्वतःचे राज्य वाढवायला चालू केले गोविंदवाल च्या युद्धात अब्दाली च्या सैन्यातून अनेक मराठयानी शिखांनी सोडवले.महादजी च्या मृत्यूपर्यंत शीख मराठा संबंध चांगले होते.तिकडे निजाम आणि हैदर अली ने सुद्धा डोके काढले. सर्वात जास्त फायदा ब्रिटिशांनी उचलला आणि संपूर्ण देशात पाय पसरले. मराठ्यांनी सुद्धा नवीन जोमाने सुरुवात माधवराव दक्षिणे ला आणि महादजी उत्तरेला मुसंडी मारून मराठेशाही चा दबदबा जैसे थे केला.

तळटीपा :

3}इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांचे पुस्तक

4}william dalrymple: return of king

तळटीपा

[1] पानिपतची लाभहानी
[2] पानिपतची लाभहानी
उत्तर लिहिले · 15/8/2021
कर्म · 121705
0
पाणी तल्या लढाईचे परिणाम 
उत्तर लिहिले · 23/8/2021
कर्म · 0