भाषा लिपी

लिपी म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

लिपी म्हणजे काय?

0
लिपी ही लिखाणाची सूत्रबद्ध पद्धत आहे. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी तसेच संदेश देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरे व अंकांचा वापर केला जातो. वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी ज्या चिन्हांचा उपयोग करतात, त्या चिन्हसमुहांना लिपी असे नाव आहे. एका चिन्हापासून जेव्हा एकाच ध्वनीचा बोध होतो, तेव्हा लिपीचा उद्देश सफल होतो.
उत्तर लिहिले · 30/7/2021
कर्म · 855
0
लिपी म्हणजे काय ?

 मोडी लिपी म्हणजे जलद लिहिण्यासाठी वर्ण मोडून लिहिण्याची प्रचारात आलेली पद्धत . मोडी लिपीला मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली मानली जाते , मोडी लिपी ही देवनागरी लिपीची एक सुबक लपेटीतील शीघ्र लिपी आहे. भाषेला लिखित स्वरूप देणारी लिपी एखाद्या भाषेची स्वतःपूर्ती असते . अनेक भाषा एकच लिपी वापरतात तसेच एकाच भाषेतले लिखाण अनेक लिप्यांतही सापडते. काळाच्या ओघात अनेक भाषा विरून गेल्या , तश्या अनेक लिप्याही.

 लिपी या शब्दाचा उगम हा मूळ "लिप्" यापासून झाला आहे . "लिप्" म्हणजे लिंपणे , माखणे , सारवणे . आपण कागदावर शाईने अक्षर , शब्द , चित्र , चिन्ह इत्यादी "लिंपतो" म्हणून त्याला लिपी असे म्हणतात .
 
लिप्यांचे दोन ठळक प्रकार सांगता येतात -
 
१ मुळाक्षरांना एक ठराविक अक्षर ठरवून त्याला योग्य ते वळण ठरवून लिहिली जाते .
 
२ तर दुसरा प्रकार चित्रलिपी .
 
तसेच काही लिप्या ह्या चिन्हांचा वापर करून सुद्धा लिहिल्याला सापडतात . चीन ,जपान या प्रदेशांत चित्रलिपि प्रचलीत , तर रोमन , देवनागरी या मूळाक्षर चा वापर करून लिहिलेल्या लिप्या आहेत .

पूर्वी दगड, लाकूड , चामडे , गुहा , ताम्रपट लिहिलेले सुद्धा सापडतात . पण अशा वस्तु अथवा वास्तू वर लिहिलेला मजकूर हा शाईने लिहिलेला नसतो . तो एखाद्या टोकदार हत्यार वापरुन कोरून लिहिलेला असतो . याला कोरणे म्हणतात . उदाहरणार्थ - "शिलालेख". "लीख" म्हणजे कोरणे. शिलालेख याचाच अर्थ शिळेवर , दगडावर कोरलेला लेख व त्यावरूनच "लेखन " हा शब्द तयार झाला .

 अशा एकेकाळी वापरात असलेल्या पण आता ज्ञात नसलेल्या लिप्यांची संख्या किती असेल कोणास ठाऊक . कुतूहल हा माणसाचा एक मुळ्धर्म असल्याने अलिकडच्या शतकात अशा लुप्त झालेल्या काही लिप्या पुन्हा उजेडात आल्या .

 मुळाक्षरांवर आधारीत असो वा चित्रांवर वा चिन्हांवर लिपीतल्या प्रत्येक प्रतीकांचा एक उच्चार असतो . प्रत्येक भाषा हि प्रथम बोलली जाते . लिहिणे फार नंतरचे. त्या त्या भाषेची एक उच्चार पद्धत त्यामुळे तयार होते. त्यामुळे कुठलीही लिपी उलगडताना मूळ वापर कुठल्या भाषेचा आहे , हे महत्वाचे ठरते . मात्र तेवढ्याच ज्ञानावर लिपी उलगडता येत नाही हे हि खरे .

 राजनैतिक , सैनिकी , नागरी क्षेत्रांमधे सांकेतिक भाषेचा वापर फार प्राचीन काळापासून सुरू आहे . हि सांकेतिक भाषा मुद्दाम बनवलेली असते . आपले निरोप , संदेश , आज्ञा , माहिती हे विरुद्ध पक्षाला , त्रयस्ताना कळू नयेत यासाठी निर्माण केलेली असते . विरोधी बाजूची अशी सांकेतिक भाषा उलगडण्याचा प्रयत्न कायम सुरू असतो . सांकेतिक भाषा घडवणारे विरुद्ध ती उलगडण्याचा प्रयत्न करणारे ,ही लढाई प्राचीन काळापासून सुरूच आहे .

 अशा भाषा उलगडण्यांच्या प्रयत्नांतून ज्या गणिती रिती ज्या युक्त्या माहित झाल्या त्यांचाही एक लांब रुंद इतिहास आहे . इथेही भाषा कुठली याला महत्व आहे . मुख्य म्हणजे अशा रिती युक्त्या याची फार मोठी मदत लिप्या उलगडण्यासाठी होते .

अशीच आपली ही देवनागरी ची जलद लिपी म्हणजेच "मोडी लिपी " जिला " पिशाच्च लिपी " असे देखील संबोधले जाते . ही मोडी लिपी म्हणजेच इतिहासात डोकावण्याचा राजमार्गच आहे .

सध्या आपला अभ्यास हा मोडी लिपी लेखन व वाचन यावर आहे . तरी लिपी विषयक अधिक माहिती मोडी प्राथमिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर लिहेन .


11लिपी ही लिखाणाची सुत्रबद्ध पद्धत आहे. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी तसेच संदेश देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरे व अंकांचा वापर केला जातो. वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी ज्या चिन्हांना उपयोग करतात, त्या चिन्हसमुहाला लिपी असे नाव आहे. एका चिन्हापासून जेव्हा एकाच ध्वनीचा बोध होतो, तेव्हा लिपीचा उद्देश सफल होतो.



आजची लिपी ही मानव बोलायला शिकल्यापासून हळूहळू परिणत झाली आहे. मानवाची संस्कृती जेवढी प्राचीन, तेवढीच लिपीही प्राचीन आहे.[१]

लिपीचा उगम संपादन करा
प्रारंभी मनुष्य आपले विचार साध्या उभ्या-आडव्या रेघोट्या काढून व्यक्त करीत असे. रेघोट्या मारता मारताच चित्रे काढण्याइतकी त्याची प्रगती झाली. त्या चित्रांतून तो आपला आशय व्यक्त करू लागला. सूर्य, वृक्ष, साप, बकरी इ. चित्रांनी त्या त्या वस्तूंचा व प्राण्यांचा बोध होऊ लागला. प्राचीन गुहानिवासी माणसांनी कोरलेली चित्रे अलिकडे सापडली आहेत.[१]

प्राचीन काळी इजिप्त व मेसोपोटेमिया या देशांतही भावाची अभिव्यक्ती चित्रांच्या द्वारेच होत असे. पण इजिप्तमध्ये ही चित्रे प्रायः दगडांवर खोदीत आणि मेसापोटेमियात ती मातीच्या विटांवर खिळ्यांनी कोरीत. विटांचा पृष्ठभाग मऊ असल्याने त्यांवर केवळ रेघाच ओढता येत, गोलाकार काढता येत नसत. उदा. तीनचार रेघा ओढून विटांवर माशाचे चित्र काढीत. त्यामुळे आरंभापासूनच ही चित्रे संकेतात्मक झाली. याच संकेतात्मक चित्रांतून पुढे इराणी लोकांना अक्षरे बनविली. चित्रलिपी हा लिपीच्या विकासातील एक टप्पा होय.

वैदिक लोकांनी गणन व लेखन या बाबतीत बरीच प्रगती केली होती. भारतात प्रारंभी ब्राह्मी लिपीचा उपयोग केला जात असे. पण ती निश्चित केव्हा प्रचारात आली, ते सांगता येत नाही. मात्र ती सनपूर्व पाचव्या शतकात प्रचारात होती, एवढे निश्चित म्हणता येते.[१]

सनपूर्व चौथ्या शतकापूर्वी लिपी हा शब्द प्रचारात होता. पाणिनीच्या अष्टाध्यायीत लिपी, लिबी व ग्रंथ या शब्दांचा वापर केलेला आहे. तसेच त्याने लिपिकर व यवनानी हे शब्द बनवण्याचे नियम दिले आहेत. कात्यायन व पतंजली यांनी यवनानी शब्दाचा अर्थ यवनांची लिपी असा दिला आहे. त्यावरून त्या काळी यावनी लिपी प्रचारात होती, असे समजते.


ग्रेट सायरसची वंशावळ आणि त्याने बॅबिलोनच्या ताब्यात घेतल्याचा अहवाल इ.स.पू. ५३९, सायरस द सिलिंडर (ओळी १–-१२) वरून काढलेली.
लिपीची दिशात्मकता संपादन करा

जगात वापरल्या जाणाऱ्या लिपींची दिशात्मकता
लिपींची विभागणी ही त्यांच्या लिहिण्याच्या दिशेने ही केली जाते. इजिप्शियन हायरोग्लिफ हे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे अश्या दोन्ही प्रकारे लिहितात. प्राचीन अद्याक्षरे ही वेगवेगळ्या दिशेने लिहिली जात असे, जसे आडव्या प्रकारे (एका बाजूला एक) किंवा अनुलंबरित्या (एका खाली एक). लिपींच्या मानकीकरणापूर्वी अक्षरे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे दोन्ही प्रकारे लिहित. हे बहुतेक सामान्यपणे बुस्ट्रोफेडोनिक पद्धतीने लिहिले जात होते: एका (आडव्या) दिशेने प्रारंभ करणे, नंतर ओळीच्या शेवटी व दिशा बदलणे.

सर्व भारतीय व युरोपियन लिप्या ह्या डावीकडून उजवीकडे लिहितात. तर अरेबियन किंवा मध्य आशियाई लिप्या ह्या उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. चीनी लिपी ही अनुलंबरित्या लिहिली जाते.


उत्तर लिहिले · 30/7/2021
कर्म · 121765
0

लिपी:

लिपी म्हणजे भाषेला दृश्य रूप देण्याचे माध्यम. ध्वनीBased spoken language अमूर्त असते, तर लिपीमुळे भाषेला मूर्त स्वरूप प्राप्त होते. लिपीच्या माध्यमातून आपण विचार, कल्पना आणि माहिती कागदावर उतरवू शकतो, ज्यामुळे ते जतन करणे आणि इतरांना transmit करणे सोपे होते.

लिपीची व्याख्या:

  • लिपी म्हणजे चिन्हांच्या आधारे भाषिक expression करण्याची पद्धत.
  • लिपी हे भाषेला लेखनात translate करण्याचे tool आहे.
  • लिपीमुळे माहिती आणि ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे transfer करणे शक्य होते.

उदाहरण:

मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. देवनागरी लिपीमध्ये अक्षरे आणि चिन्हे वापरली जातात, ज्यामुळे मराठी शब्द आणि वाक्ये तयार होतात.

लिपीचे महत्त्व:

  • communication: लिपीमुळे दूर असलेल्या व्यक्तींना संदेश पाठवणे शक्य होते.
  • knowledge retention: पुस्तके आणि documents जतन करता येतात.
  • historical record: भूतकाळातील घटना आणि संस्कृती समजून घेता येतात.
  • education and learning: लिपीमुळे शिक्षण घेणे आणि ज्ञान प्राप्त करणे सोपे होते.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1780

Related Questions

भारतीय लिपी म्हणजे काय?
छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक 'मोडी' लिपीमध्ये नाव लिहा.
अंधाऱ्या लोकांची लिपी कोणती?
मला मोडी लिपीचा क्लास लावायचा आहे, कुठे लावू शकतो?