3 उत्तरे
3
answers
दर्शन नावाचा अर्थ काय?
2
Answer link
मराठी मध्ये दर्शन म्हणजे काय?
definition मराठी शब्दकोशातील दर्शन व्याख्या
दर्शन—न. १ अवलोकन; पाहणें. २ स्वप्न; दृष्टांत. ३ धर्म- संबंधीं अथवा तत्वज्ञान संबंधीं सहा पंथ. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा. या शिवाय बौद्ध, जैन इ॰ मतें. 'न कळसी दर्शना धांडोळितां ।' -तुगा ९२५. ४ (देव, देऊळ इ॰ ची) भेद; पाहणें; अवलोकन. ५ (ल.) दृष्टि. 'ना ना मावळतेनि तपनें । नेइजती लोकांची दर्शनें ।' -ज्ञा १५.३६६. [सं.] -(दृष्टि)-स्त्री. (नृत्य) विशिष्ट वस्तूकडे विशिष्ट तर्हेनें पाहणें. याचे पुढील आठ प्रकार आहेत. -साचीकृत, अनुवृत्त, आलोकित, विलोकित, उल्लोकित, अवलोकित, प्रलोकित इ॰. ॰कोन-पु. (ज्योतिष) दोन दर्शनरेषा मिळून झालेला कोन. पट्टि-स्त्री. दार, खिडकी इ॰ च्या वर नकशी केलेली लांकडाची पट्टी. ॰प्रतिभू- पु. जामीन; हमीदार. ॰रेषा-स्त्री. (ज्योतिष) एखाद्या पदार्था- कडे पाहत असतां डोळ्यांपासून पदार्थापर्यंत काढलेली जी रेषा ती. ॰संतुष्ट-संतोष-वि. केवळ दर्शनानें तृप्त झालेला. ॰संतोष- षी-वि. १ देखणा; डौली; चांगला दिसणारा. २ (ल.) कपाळकरंटा; देखणा पण कुचकामाचा; पोकळ दिखाऊ. ३ दर्शनानें तृप्त. दर्शनी-वि. १ पाहण्यासंबंधीं. २ देखणा; सुंदर; आल्हादजनक मुद्रेचा; दर्शनसंतोष. ३ दिखाऊ; देखाव्यासाठीं केलेला. जसें:- दर्शनी-घडी-खिडकी-दार-लुगडें इ॰ ४ समोरील; पुढील; अगदीं समोर दिसणारी (वस्तु). 'दर्शनी भिंत, बाजू.' ॰अंग-न. १ वस्तूची चांगली, सुरेख बाजू. २ दिसणारी, पुढील, समोरील बाजू. ३ (ल.) दिखाऊ बाजू. ॰काम-न. दिखाऊ, सुरेख, डाम- डौलाचें किंवा झळकफळक काम; समोर दिसणारें काम. ॰दर- वाजा-पु. पुढचा दरवाजा; महाद्वार. ॰देखावा-न. (वास्तु.) पुढील बाजू, समोरील दृश्य भाग. फ्रंट इलेव्हेशन या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द. ॰पट्टीस्त्री. दर्शनपट्टी पहा. ॰भिंत-स्त्री. पुढची भिंत. ॰हुंडी-स्त्री. पाहण्याबरोबर पटविण्याची हुंडी. दर्शनीय-वि. पाहण्यासारखें; सुरेख; सुंदर; प्रेक्षणीय; मनोहर. दर्शविणें, दर्साविणें-उस्त्रि. १ दाखविणें; भासविणें; जाणविणें (अस्पष्टपणें, असंदिग्धपणें). २ सुचविणें; खुणाविणें; अंदाज करणें; अटकळ बांधणें; निर्देश करणें; समजाविणें; वरवर दाखविणें (अन्योक्तीनें, संकेतानें). [सं. दर्शन] दर्शित-वि. पाहिलेलें; दाख- विलेलें. [सं.] दर्शी-वि. पाहणारा; द्रष्टा; दाखविणारा. (समासांत) गुण-छिद्र-दुर-दोष-परिणाम-सूक्ष्म-तत्व-दर्शी. [सं.]>वैशेषिक दर्शन
वैशेषिक दर्शन : ‘ दर्शन’ या शब्दाचा या संदर्भात तत्वज्ञान असा अर्थ आहे. सहा आस्तिक दर्शनांपैकी हे एक दर्शन आहे. याचे मूळ प्रणेते ⇨कणाद महर्षी होत. विश्व अणूंचे बनलेले आहे, हा या दर्शनाचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. एक घट दुसऱ्या घटाहून भिन्न असतो, याचे कारण त्यांचे अणू निराळे असतात. पण एक अणू दुसऱ्या अणूहून भिन्न कसा?–याचे उत्तर त्या प्रत्येकाच्या ठिकाणी एक विशेष असतो हे आहे. ‘विशेष’ हा स्वतंत्र पदार्थ मानला म्हणून या दर्शनाला ‘वैशेषिक’ दर्शन असे नाव आहे.
विश्वात एकूण किती पदार्थ आहेत, असा प्रश्न त्यांनी तत्त्वचिंतक या नात्याने विचारला. पदार्थ म्हणजे ‘जे जे शब्दाने वाच्य आहे ते ते म्हणजेच जे काही आहे ते’ एकूण सर्व. कणादांच्या सूत्रात सहा पदार्थ सांगितले आहेत. पण पुढे ‘अभाव’ या सातव्या पदार्थाची भर घातली. कारण ‘नसणे’ यालाही अर्थ आहेच. ते सात पदार्थ म्हणजे द्रव्य, गुण, कर्म, सामन्य, विशेष, समवाय आणि अभाव हे होत. कणाद महर्षींनी आपले तत्त्वज्ञान सूत्ररूपांनी सांगितले. त्या कणादसूत्रांवर प्रशस्तपाद या आचार्यांनी भाष्य लिहिले. त्या भाष्यावर ⇨उदयनाचार्यांची किरणावली आणि श्रीधराचार्यांनी न्यायकंदली अशा टीका आहेत. न्यायसूत्र हा दर्शनग्रंथ वैशेषिक दर्शनाशी विसंगत नाही. वैशेषिक दर्शन आणि न्यायदर्शन ही परस्परसुसंगत अशी दर्शने आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांचे बरेचसे सिद्धांत समान आहेत. त्या दोहोंचा उल्लेख पुष्कळदा ‘द्वे तर्के’ असा होतो.
0
Answer link
दर्शन या नावाचा अर्थ आणि त्या संबंधित माहिती खालीलप्रमाणे:
- अर्थ: दर्शन या शब्दाचा अर्थ आहे:
- दृष्टी
- भेट
- देवाला भेटणे किंवा देवतेची मूर्ती पाहणे.
- ज्ञान
'दर्शन' हे नाव भारतीय संस्कृतीत खूप महत्वाचे आहे. हे नाव सकारात्मकता आणि आदर दर्शवते.