3 उत्तरे
3 answers

उत्सर्जन म्हणजे काय?

1
झाडातून न पचलेले टाकाऊ घटक बाहेर टाकणे
उत्तर लिहिले · 28/7/2021
कर्म · 1500
0
शरीरातील क्षेप्यद्रव्य (टाकाऊ पदार्थ) बाहेर टाकण्याच्या क्रियेस उत्सर्जन म्हणतात. सजीवांत अखंड सुरू असलेल्या चयापचय क्रियांमुळे (रासायनिक घडामोडींमुळे) पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड व अमोनिया अशी क्षेप्यद्रव्ये प्रामुख्याने निर्माण होत असतात. ती शरीरात राहणे आरोग्यास अपायकारक असते, म्हणून उत्सर्जन अत्यावश्यक ठरते. त्यापैकी वायुरूप पदार्थ श्वसन तंत्रामार्फत (श्वासोच्छ्‌वासाच्या इंद्रियांकडून) आणि पाणी, हे श्वसन तंत्रातर्फे, तसेच घामाच्या रूपाने त्वचेमार्फत व विष्ठेबरोबर पचन तंत्राकडून (पचन संस्थेकडून) बाहेर टाकले जाते. अर्थात पाण्याबरोबर, म्हणजे लघवीवाटे, प्रथिनांपासून होणारी नायट्रोजनी क्षेप्यद्रव्ये ही प्रामुख्याने उत्सर्जन तंत्रातील वृक्कांमार्फत (मूत्र तयार करून शरीराबाहेर टाकणाऱ्या इंद्रियांच्या जोडीमार्फत) टाकली जातात. त्याचबरोबर उत्सर्जन तंत्र शरीराला जरूर असलेली महत्त्वाची द्रव्ये ठेवून आणि रक्तातील अम्ल व क्षार (अल्कली) यांचे प्रमाण योग्य राखून अनावश्यक घटक, जास्तीचे पाणी, लवणे, चयापचय द्रव्ये इ. बाहेर टाकून व तर्षण नियमन [अर्धपारगम्य पटलातून द्रवरूप वा वायुरूप पदार्थ जाऊन पटलाच्या दोन्ही बाजूंची त्यांची संहती सारखी करण्याच्या क्रियेचे नियमन, तर्षण] करून अंतःपरिस्थिती समतोल राखते. ह्या महत्त्वाच्या क्रियेस होमिओस्टॅसिस असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 29/7/2021
कर्म · 855
0
उत्सर्जन म्हणजे सजीवांच्या शरीरातून निरुपयोगी, विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया.

उत्सर्जन:

सजीवांच्या शरीरात चयापचय क्रियेदरम्यान (Metabolism) तयार झालेले निरुपयोगी आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजे उत्सर्जन होय.

उत्सर्जनाची गरज:

  • शरीरातील अनावश्यक आणि विषारी पदार्थ बाहेर काढणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
  • उत्सर्जन संस्थेद्वारे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी उत्सर्जन आवश्यक आहे.

उत्सर्जन प्रक्रिया:

  • मानवामध्ये: मूत्रपिंड (Kidney), त्वचा, फुफ्फुसे आणि यकृत हे उत्सर्जनाचे मुख्य अवयव आहेत.
  • वनस्पतीमध्ये: पाने गळणे, राळ स्त्रावणे अशा क्रियांमधून उत्सर्जन होते.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
पयाावरणीय समस्या स्पष्ट करा.?
भारतात कोणकोणते अभयारण्य आहेत?
हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते, चूक की बरोबर?
कोणते उत्पादन वनातून मिळते?
वायु हमारे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे?
सामाजिक वनीकरण प्रकार स्पष्ट करा?