2 उत्तरे
2
answers
टोपण नाव राम गणेश गडकरी?
2
Answer link
राम गणेश गडकरी हे मराठी कवी, नाटककार आणि विनोदी लेखक होते.
त्यांनी एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही चार पूर्ण नाटके तसेच राजसंन्यास, वेड्यांचा बाजार ही दोन अपुरी राहीलेली नाटके लिहिली.
राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव गोविंदाग्रज व बाळकराम आहे.
यांनी गोविंदाग्रज या टोपणनावाने १५० कविता लिहिल्या. तसेच, बाळकराम या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले.

राम गणेश गडकरी यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील गणदेवी येथे झाला.
यांच्या वडिलांचे नाव गणेश वासुदेव गडकरी आहे. तर, आईचे नाव सरस्वतीबाई गणेश गडकरी आहे.
यांना दोन पत्न्या होत्या. पहिल्या पत्नीचे नाव सीताबाई गडकरी होते. तर दुसऱ्या पत्नीचे नाव रमाबाई गडकरी होते.
राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपिअर समजले जाते.
विविध नाट्यप्रेमी संस्थांनी राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.
नागपूरला राम गणेश गडकरी यांच्या नावाचा एक साखर कारखाना आहे.
राम गणेश गडकरी यांचा मृत्यू २३ जानेवारी १९१९ ला नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे झाला.
0
Answer link
राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव 'गोविंदाग्रज' असे होते.
ते एक प्रसिद्ध कवी, नाटककार, आणि लेखक होते.