व्याकरण अलंकार

उपमा म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

उपमा म्हणजे काय?

1
उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||
उत्प्रेक्षा –उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||
व्यतिरेक –या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.
अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा
तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा
अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला ||
दृष्टान्त –एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.
उदा.
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर्यसंप ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे देतात.

स्वभावोक्ती –एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभावोक्ती’ अलंकार होतो.
उदा.
मातीत ते पसरले अति रम्य पंख |
केले वरी उदर पांडुर निष्कलंक ||
चंचू तशीच उघडी पद लांबविले |
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||
विरोधाभास –एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.
उदा.
जरी आंधळी मी तुला पाहते.
मरणात खरोखर जग जगते ||


उत्तर लिहिले · 19/7/2021
कर्म · 121765
0
उपमा म्हणजे काय ?
उत्तर लिहिले · 3/11/2022
कर्म · 0
0

उपमा म्हणजे दोन वस्तू किंवा गोष्टींमधील साम्य दर्शवणं. जेव्हा आपण दोन भिन्न गोष्टींमधील समानता सांगतो, तेव्हा तिथे उपमा अलंकार असतो.

उपमा अलंकाराची काही उदाहरणे:

  1. उदाहरण १: "आईचे प्रेम सागरासारखे असते."
    या वाक्यात आईच्या प्रेमाला सागराची उपमा दिली आहे, कारण सागर जसा अथांग असतो, तसेच आईचे प्रेम अमर्याद असते.
  2. उदाहरण २: " Simran चे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे."
    येथे अक्षरांना मोत्यांची उपमा दिली आहे, कारण मोती जसे मौल्यवान आणि सुंदर असतात, तसेच Simran चे अक्षर आहे.

उपमा अलंकाराचे घटक:

  • उपमेय: ज्या गोष्टीची तुलना करायची आहे, ती उपमेय. (उदा: आईचे प्रेम)
  • उपमान: ज्या गोष्टीशी तुलना करायची आहे, ते उपमान. (उदा: सागर)
  • साम्यवाचक शब्द: सारखे, जसे, तसे, प्रमाणे हे साम्य दाखवणारे शब्द. (उदा: सारखे)
  • समान धर्म: दोन वस्तूंमध्ये असलेले समान गुणधर्म. (उदा: अथांगता)

उपमा अलंकार वाक्याला अधिक आकर्षक आणि स्पष्ट करतो.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1780

Related Questions

अलंकार म्हणजे काय ते लिहा आणि अलंकाराचे विविध प्रकार थोडक्यात सांगा.
रूपक म्हणजे काय?
अलंकार म्हणजे साहित्य या विचारधारेची चिकित्सा करा.
अलंकार म्हणजे काय ते सांगून अलंकाराचे प्रकार लिहा?
तळे जळे बघ ज्योत राजळे का? मरीन अमरतआहई न खरी! अलंकार ओळखा
संत म्हणती सप्तपदी सहवासी सख्खी साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता आहे?
आभूषण या शब्दाचा एक समानार्थी शब्द कोणता आहे?