इतिहासाची ओळख इतिहास

इतिहास म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

इतिहास म्हणजे काय?

0
इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपला भूतकाळ

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ
उत्तर लिहिले · 2/7/2021
कर्म · 580
0

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास.

भूतकाळात घडलेल्या घटना, त्यांचे परिणाम आणि मानवी जीवनावर झालेला प्रभाव यांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो.

इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला भूतकाळातील संस्कृती, समाज, राजकारण आणि अर्थव्यवस्था यांबद्दल माहिती मिळते.

इतिहास हा केवळ घटनांचा संग्रह नाही, तर त्या घटनांच्या कारणांचा आणि परिणामांचा शोध आहे.

इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्व:

  • भूतकाळातील अनुभवांवरून शिकायला मिळतं.
  • वर्तमानकाळाला समजून घेण्यास मदत होते.
  • भविष्यकाळासाठी मार्गदर्शन मिळतं.

इतिहासाचे विविध प्रकार:

  • जागतिक इतिहास
  • भारताचा इतिहास
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • प्राचीन इतिहास
  • मध्ययुगीन इतिहास
  • आधुनिक इतिहास

इतिहास अभ्यासण्यासाठी अनेक साधने वापरली जातात, जसे की:

  • पुराणी कागदपत्रे
  • शिलालेख
  • नाणी
  • पुरातत्वीय अवशेष
  • जुनी पुस्तके

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

इतिहास म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
इतिहासाचा अर्थ लिहून इतिहासाचे प्रयोजन लिहा?
इतिहास म्हणजे काय.?
इतिहास म्हणजे काय नेमक?
इतिहास म्हणजे काय?
इतिहास म्हणजे काय?
इतिहास म्हणजे काय?