
इतिहासाची ओळख
0
Answer link
इतिहास म्हणजे काय:
इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास. भूतकाळात घडून गेलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करणे होय. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला मानवी समाजाच्या विकासाची दिशा समजते.
इतिहासाचे प्रकार:
- राजकीय इतिहास: राजकीय इतिहासामध्ये राज्यशास्त्र, युद्धे, राजघराणी आणि त्या वेळची राजकीय परिस्थिती यांसारख्या घटनांचा अभ्यास केला जातो.
- सामाजिक इतिहास: सामाजिक इतिहास समाजात रूढ असलेल्या चालीरीती, परंपरा, लोकांचे जीवनमान, सामाजिक संबंध आणि सामाजिक बदलांचा अभ्यास करतो.
- आर्थिक इतिहास: आर्थिक इतिहासामध्ये उत्पादन, व्यापार, उद्योग, आर्थिक धोरणे आणि आर्थिक विकास यांचा अभ्यास असतो.
- सांस्कृतिक इतिहास: सांस्कृतिक इतिहास कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाटके, धार्मिक विचार आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करतो.
- वैज्ञानिक इतिहास: वैज्ञानिक इतिहास विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदल आणि प्रगतीचा अभ्यास करतो.
इतिहास महत्वाचा का आहे:
इतिहास आपल्याला भूतकाळातील चुका आणि यशांपासून शिकण्यास मदत करतो. वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्य सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतो.
अधिक माहितीसाठी:
1
Answer link
_*इतिहास म्हणजे काय?*_
▫ भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे ' इतिहास' होय.
▪ भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय.
▫ इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन कालखंड पडतात.
👉 _*इतिहासाची आवश्यकता काय आहे?*_
▪ लाखो वर्षात मानव कसा राहिला? त्याचे अन्न कोणते होते? त्याची वस्त्रे कशा प्रकारची होती, या प्रश्नांची उत्तरे इतिहासात अभ्यासातून मिळतात. पूर्वजांनी केलेल्या प्रगतीतून पूर्वजांविषयी स्वाभिमानाची भावना निर्माण होते आणि त्यांनी केलेल्या चुका टाळून भविष्यकाळातील प्रगती करणे इतिहासाच्या अभ्यासाद्वारे शक्य होते.
2
Answer link
इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमबद्ध व सुसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे.{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो.
3
Answer link
इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.
प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :
१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान
२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत
३) इतिहास आणि आपला भूतकाळ
४) भूतकाळ आणि भविष्यकाळ
प्राचीन साहित्यात इतिहास संपादन करा
पुराणकथा या एकेकाळचा इतिहास आहेत.
राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात–‘स च द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’त्याचा अर्थ असा–परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे/होय.भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित छांदोग्योपनिषद या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.
धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||{ श्रीधर स्वामी कृत विष्णु पुराण टीका}
अनेक शिलालेख हे महत्त्वाचे असतात
आधुनिक व्याख्या संपादन करा
हॅपाल्ड यांच्या मते 'इतिहास' हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो असा दावा केला आहे.
0
Answer link
भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार, शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय.