राजकारण राजकीय विचारवंत अर्थशास्त्र

राज्यशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते?

2 उत्तरे
2 answers

राज्यशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते?

4
अ‍ॅरिस्टॉटल हा राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांचा जाणकार असणारा सुधारणावादी, मध्यममार्गी तत्त्वज्ञ होता. अ‍ॅरिस्टॉटल अनेक बाबतीत आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडले. त्याआधी या दोन गोष्टींत भेद केला जात नसे. अ‍ॅरिस्टॉटलचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याने कायद्याच्या राज्याचा विचार करताना, आजवर चालत आलेल्या रूढी-परंपरा-रितीरीवाज यांना प्राधान्य दिले.
आज अ‍ॅरिस्टॉटल याला राज्यशास्त्राचा जनक मानले जाते.

उत्तर लिहिले · 11/2/2021
कर्म · 14895
0

ॲरिस्टॉटल (Aristotle) यांना राज्यशास्त्राचे जनक मानले जाते.

ॲरिस्टॉटल हे प्राचीन ग्रीसमधील एक महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी राजकारण, नैतिकता, तर्कशास्त्र, जीवशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांसारख्या विविध विषयांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले.

पॉलिटिक्स (Politics) नावाच्या ग्रंथात त्यांनी राज्याच्या स्वरूपाबद्दल आणि शासनाबद्दल आपले विचार मांडले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यशास्त्राचे जनक मानले जाते.

ॲरिस्टॉटल यांचे विचार आजही राज्यशास्त्र आणि राजकीय विचारांच्या अभ्यासात महत्त्वाचे मानले जातात.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1680

Related Questions

स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?
ग्रामीण राजकीय नेतृत्वाचा अर्थ स्पष्ट करा?
ग्रामसंस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?
वारली आदिवासींच्या राजकीय जीवनाचे वर्णन करा?
वारली अधिवेशनाच्या राजकीय जीवनाचे वर्णन करा?
ग्राम संस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?