भाषा मराठी कविता कविता साहित्य

मराठी असे आमुची मायबोली, जरी आजही राजभाषा नसे । नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, या काव्यपंक्ती कुणाच्या आहेत?

2 उत्तरे
2 answers

मराठी असे आमुची मायबोली, जरी आजही राजभाषा नसे । नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, या काव्यपंक्ती कुणाच्या आहेत?

0
मराठीच्या आजच्या स्थितीलाही बऱ्याच अंशी लागू पडणारी माधव जूलियन यांची ‘मराठी असे आमुची मायबोली’ ही कविता आज पाहू या...

मराठी असे आमुची मायबोली,
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माऊलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे

जरी पंचखंडातही मान्यता घे
स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

जरी मान्यता आज हिंदीस देई
उदेलें नवें राष्ट्र हे हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती
हिची जाणुनी योग्यता थोरवी
    
मराठी असे आमुची मायबोली,
जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी,
हिच्या एक ताटात आम्ही बसूं!

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं,
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी,
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे,
हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं!

मराठी असे आमुची मायबोली
अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ती गेली
उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळीं

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें
नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा
जगांतील भाषा हिला खंडणी

- माधव जूलियन
 

उत्तर लिहिले · 21/1/2021
कर्म · 14895
0

"मराठी असे आमुची मायबोली, जरी आजही राजभाषा नसे । नसो आज ऐश्वर्य या माऊलीला..." या काव्यपंक्ती कृष्णाजी केशव दामले यांच्या आहेत, जे केशवसुत या नावाने प्रसिद्ध आहेत.

हे वाक्य त्यांच्या 'नवा शिपाई' या कवितेतील आहे.

या कवितेत कवीने मराठी भाषेची महती सांगितली आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2200

Related Questions

अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगा?
अंत असते प्रारंभ हे पुस्तक वाचायचे आहे का?
ग्रंथ म्हणजे काय?
नवकाव्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
कथात्म साहित्य म्हणजे काय?
तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका दलित कथेचे थोडक्यात विवेचन करा?
झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?