3 उत्तरे
3
answers
स्वर्गवासी व कैलासवासी यांत काय फरक आहे?
6
Answer link
सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जे उत्तर दिले आहे ते बरोबर असू शकते असे नाही मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे
तर बगा कैलावसी म्हणजे वयात नसतां नाही मरण येणे जसे आत्महत्या , रोगी .....! असे जर मरण पावले असतील तर आपण त्यांना कैलासवासी म्हणु शकतो
स्वर्गवासी म्हणजे वय होहून गेलेली लोक की जसे अजी आजोबा वय ७५-१०० च्या पुढील लोग जर मरण पावले तर त्यांना आपण स्वर्गवास म्हणु शकतो
धन्यवाद....
3
Answer link
मेल्यावर ती व्यक्ती स्वर्गात गेली अन आता त्या व्यक्ती ला आपण जी स्वर्गाची कल्पना करतो ती सगळी सुख मिळत असतील अश्या संकल्पनेतून स्वर्गवासी हा शब्द आला असावा… ... म्हणजे सुख दुःख परत जन्म या सगळ्या तुन मुक्त होऊन कैलास जिथं शंकराचं स्थान आहे असं मानतात तिथे ती व्यक्ती गेली अन तिला मुक्ती मिळाली अस मानत असावे….
खरतर मेल्यानंतर माणूस कुठे जातो कोणालाच माहीत नाही. या सगळ्या आपल्या मनाच्या कल्पना आहेत की तो स्वर्गात गेला की कैलासात… पण या कल्पना कुठून आल्या याविषयी माझा अंदाज असा आहे की
मेल्यावर ती व्यक्ती स्वर्गात गेली अन आता त्या व्यक्ती ला आपण जी स्वर्गाची कल्पना करतो ती सगळी सुख मिळत असतील अश्या संकल्पनेतून स्वर्गवासी हा शब्द आला असावा…
तर स्वर्ग म्हटलं की जन्म मृत्यू चा फेरा परत येणार… अन पुण्य संपल की परत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार… म्हणून मग कैलासवासी ही संकल्पना आली असावी… म्हणजे सुख दुःख परत जन्म या सगळ्या तुन मुक्त होऊन कैलास जिथं शंकराचं स्थान आहे असं मानतात तिथे ती व्यक्ती गेली अन तिला मुक्ती मिळाली अस मानत असावे….
0
Answer link
दिवंगत व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी 'स्वर्गवासी' आणि 'कैलासवासी' हे शब्द वापरले जातात, पण त्यांच्यात काही सूक्ष्म फरक आहेत:
स्वर्गवासी:
- 'स्वर्गवासी' म्हणजे 'स्वर्गात वास करणारा'.
- जेव्हा एखादी व्यक्ती देह सोडते, तेव्हा तिचा आत्मा स्वर्गात जातो, अशी मान्यता आहे. त्यामुळे, त्या व्यक्तीला 'स्वर्गवासी' म्हणतात.
- हा शब्द कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर वापरला जातो, मग ती कोणत्याही लिंगाची, वयाची किंवा सामाजिक स्तरातील असो.
कैलासवासी:
- 'कैलासवासी' म्हणजे 'कैलासावर वास करणारा'. कैलास हे भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते.
- हा शब्द विशेषतः शैव परंपरेतील (शिवभक्त) लोकांच्या मृत्यूनंतर वापरला जातो.
- 'कैलासवासी' म्हणजे ती व्यक्ती शिवलोकात गेली आहे, अशी श्रद्धा असते.
साम्य:
- दोन्ही शब्द मृत व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी वापरले जातात.
- दोन्ही शब्दांचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती आता एका चांगल्या ठिकाणी (स्वर्ग/कैलास) वास करत आहे.
फरक:
- 'स्वर्गवासी' हा शब्द अधिक सामान्य आहे आणि तो कोणासाठीही वापरला जाऊ शकतो, तर 'कैलासवासी' हा शब्द मुख्यतः शिवभक्तांसाठी वापरला जातो.