भारत साम्राज्य इतिहास

अखंड भारताचा राजा कोण?

2 उत्तरे
2 answers

अखंड भारताचा राजा कोण?

3
अखंड भारताचा राजा सम्राट आशोकाला म्हणतात .अखंड भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२  दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. अनेकांच्या मतानुसार, सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे ....
उत्तर लिहिले · 25/12/2020
कर्म · 18385
0

अखंड भारताचा राजा कोण होता हे सांगणे कठीण आहे, कारण 'अखंड भारत' ही एक आधुनिक कल्पना आहे. इतिहासात, भारतीय उपखंड अनेक राज्यांमध्ये विभागलेला होता आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या राजघराण्यांनी या भागांवर राज्य केले.

प्राचीन भारतामध्ये, मौर्य साम्राज्य (इ.स.पू. 322-185) हे सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होते आणि सम्राट अशोक हे सर्वात प्रसिद्ध शासक होते.

मध्ययुगीन भारतामध्ये, दिल्ली सल्तनत आणि मुगल साम्राज्य यांसारख्या अनेक राज्यांनी राज्य केले. मुघल साम्राज्याची स्थापना बाबरने केली आणि अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगजेब यांसारख्या शासकांनी भारतावर राज्य केले.

ब्रिटिश राजवटीत, भारत अनेक प्रांतांमध्ये विभागलेला होता आणि त्यावर ब्रिटिश सरकारने राज्य केले.

त्यामुळे, अखंड भारताचा राजा म्हणून कोणा एका व्यक्तीचे नाव घेणे शक्य नाही.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2720

Related Questions

Hadappa Sanskriti Harappa Sanskriti konatya Kala til hoti?
हडप्पा संस्कृती कोणत्या काळातील होती?
गरीब निवाजी नंदा संस्था कोण होती?
तोरणा किल्ल्याची उंची किती आहे?
कालगणना करण्याची एकके कोणती? इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे लिहा. स्वयंप्रकाशी साधने लिहा.
महाराष्ट्रातील कोणता सण राज्य सण म्हणून ओळखला जातो?
भारतातील पहिले महिला राष्ट्रपती कोण?