वाढदिवस सामाजिक शिष्टाचार

मला माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार कसे व्यक्त करावे?

3 उत्तरे
3 answers

मला माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार कसे व्यक्त करावे?

16
सर्वप्रथम वाढदिवस म्हणजे खूप विशेष काही असे नाही, खूप साधारण गोष्ट आहे, किंबहूना दिखावा करण्याचा कार्यक्रम आहे हे लक्षात ठेवा.
दुसरी गोष्ट वाढदिवसाला शुभेच्छा देतात म्हणजे ते तुमचे हितचिंतक असतातच असे काही नाही, जास्ती तर ह्यात गोडबोले, संधीसाधू,लबाड,भोंदू लोक असतात ही सत्य परिस्थिती आहे.
आणि मुख्य म्हणजे यातले बरेच रिकामटेकडे असतात,दुसर्याच काय चालू आहे यातच यांचं जास्त लक्ष असतं. जेंव्हा तुम्ही तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच,बहिणीचा वाढदिवस यांचं स्टेट्स ठेवले असते,त्यावेळी तुमच्या बायकोचा/बहिणीचा फोटो झूम करून करून हेच लोक बघत असतात.
आणि ज्यांना तुम्ही शुभेच्छा दिलेल्या असतात तेच लोक तुम्हाला परतीच्या शुभेच्छा देत असतात, एखाद्याला शुभेच्छा न देता अनुभव घ्या, तुमचा स्टेट्स बघून पण शुभेच्छा देत नाही तो...
सगळ्यात शेवटी सांगतो, ज्यांचा तुमच्या पासून फायदा होत असतो तेच सगळ्यात पुढे पुढे लाळ घोटेपणा करत असतात.
कटू,तिखट,झणझणीत वाटेल पण तेवढेच सत्य आहे, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या...
खूप लबाड जमाना आहे हो.
उत्तर लिहिले · 24/12/2020
कर्म · 650
2
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या अडवान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎊🎊
 
वाढदिवसाला शुभेच्छा देणार्यांचे आभार तुम्ही पुढील प्रमाणे धन्यवाद व्यक्त करू शकता.


•माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.
धन्यवाद

•आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी अगदी मनापासून स्वीकार करतो.
आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा.
धन्यवाद

•आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद !

•आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो.
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद

•मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.
धन्यवाद…!

•आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार

•आभार🙏

 माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन , एसएमएस ,व्हॉट्सअप,फेसबूक ,सोशल मिडीया,प्रिंट मिडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,आशिर्वादही दिले , त्या सर्वांचा मी आभारी आहे.......!!! असेच सर्वांचे प्रेम,सहकार्य,आशिर्वाद,शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।
पुनः एकदा धन्यवाद...

•कालचा माझा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या असंख्य शुभेच्छांमुळे अविस्मरणीय ठरला. असेच प्रेम करीत रहा. आशिर्वाद देत रहा. तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी ताकद आहे. मी व्यक्तीश: प्रत्येकाला धन्यवाद देण्याच्या पूर्ण प्रयत्न केला परंतु तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर क्षमस्व 🙏🏽

धन्यवाद.
उत्तर लिहिले · 24/12/2020
कर्म · 14895
0

नमस्कार!

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी खूप आभारी आहे. तुमच्या शुभेच्छांनी माझा दिवस आणखी आनंददायी बनवला.

तुमचे प्रेम आणि साथ माझ्यासाठी खूप मोलाची आहे.

धन्यवाद!

आपला,

[तुमचे नाव]

इतर पर्याय:
  • वैयक्तिक आभार: प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिकरित्या धन्यवाद द्या.
  • सोशल मीडियावर पोस्ट: सोशल मीडियावर एकत्रितपणे सर्वांचे आभार माना.
  • व्हिडिओ संदेश: एक छोटा व्हिडिओ तयार करून तुमचे आभार व्यक्त करा.
  • धन्यवाद कार्ड:Printable धन्यवाद कार्ड पाठवा.
टीप: तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी আন্তরিক शब्द वापरा.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

सौजन्यशीलता: आजची गरज' या विषयावर पाच ते सात ओळी लिहा?
निमंत्रण पत्राला उत्तर कसे देतात?
अनोळखी लग्नामध्ये जेवायला गेलो तर त्यात काही तोटा आहे का?
अन्नाचा आदर कसा करावा?
स्काऊट गाईड कोणाच्या हाताने हस्तांदोलन करते?
सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये?
सौजन्यशीलता आजची गरज या विषयावर पाच ते सात ओळी कशा लिहाल?