2 उत्तरे
2
answers
सौजन्यशीलता: आजची गरज' या विषयावर पाच ते सात ओळी लिहा?
0
Answer link
आई वडिलांनंतर आपल्या जीवनाच्या जडणघडणी मध्ये प्रत्येक अवस्थे मधल्या गुरूचा मोठा वाटा असतो. अगदी प्राथमिक अवस्थेतील गुरुपासून ते शेवटच्या टप्प्यातिल आध्यत्मिक गुरुपर्यंत. अप्रत्यक्षपणे तर निसर्ग नेहमीच आपल्याला साथ देत असतो, शिकवत असतो. शिक्षक हा अतिशय चैतन्य असलेल्या बालकाशी निगडीत असल्यामुळे त्याला नेहमी जागरूक रहावे लागते. त्याने नेहमी नवीन शिकण्याची आस धरावी, कास धरावी. जर तो स्वतःला परिपूर्ण समजत असेल तर त्याला नवीन काहीच शिकत येणार नाही; म्हणजे अज्ञानाची जाणीव झाली तरच तो घडत जाईन. आपल्याला मिळालेले ज्ञान जोपर्यंत तो आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवत नाही तोपर्यंत तो बद्ध असतो तो त्या ज्ञानातून मुक्त होत नाही.
आजही आपण आपले आई वडील असो किंवा गुरुजन आपल्या समोर आले कि आपली मान आपोआप आदराने झुकली जाते. आपण त्यांचा शब्दही टाळत नाही इतके खोलवर संस्कार आपल्यात निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत पण कुठेतरी हि खंत येते की असे खोलवर संस्कार आम्ही आमच्या स्वतःच्या मुलांमध्ये, विद्यार्थीमध्ये रुजवू शकत नाही. अस म्हणतात की वृक्ष जर वरती चांगला वाढवायचा असेल तर त्याची मुळे खोलवर गेली पाहिजेत तरच त्याला सुंदर फळे फुले लागतील. आपलं 'छान छान गोष्टीच' पुस्तक अजूनही डोळ्यासमोर येत त्यातील गोष्टींनी अगदी हसत खेळत आपल्याला मोठी शिकवण दिलीय.
आजची मुले फार हुशार आहेत पण कार्टून आणि मोबाइल गेम यामुळे ती चंचल, शिघ्रकोपी उतावळी असलेली बनली आहेत. आपण डिजिटायलॆझेशनच्या नादात पाश्चिमात्य बनत चाललो आहोत. तंत्रज्ञान तर आवश्यक आहेच पण त्यासाठी मुळ संस्कृती विसरून चालणार नाही. ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान हि काळाची गरज आहे हे मान्य आहे त्यासाठी स्पर्धा आहे हे हि मान्य! पण ते करत असताना मानासोबत अपमान , सुखा:सोबत दुःख, यशासोबत अपयश पचवत आलं पाहिजे
पण तस घडत नाही. प्रेरणा, प्रोत्साहन ही गोष्ट अतिशय गरजेची असली तरी कधीतरी शिक्षा करणे हे सुद्धा संयुक्तिक आहे. आपल्याला आपल्या लहानपणी आपल्या आई वडिलांनी गुरुजींनी केलेल्या शिक्षा अजूनही आठवतात आणि त्या का केल्या गेल्या याची कारणेही आणि त्यामुळेच आपला विकास योग्य दिशेने झाला हे सत्य आहे.
0
Answer link
आजच्या धावपळीच्या जीवनात सौजन्यशीलता कमी होत चालली आहे.
सौजन्यशीलता म्हणजे दुसऱ्यांबद्दल आदर आणि विचार व्यक्त करणे.
समाजात सलोखा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सौजन्यशीलता आवश्यक आहे.
आजच्या काळात, जेव्हा ताण आणि संघर्ष वाढत आहेत, तेव्हा सौजन्याने वागणे अधिक महत्त्वाचे आहे.
सौजन्यशीलतेमुळे व्यक्तिगत आणि सामाजिक संबंध सुधारण्यास मदत होते.
त्यामुळे, प्रत्येकाने आपल्या जीवनात सौजन्याचा वापर करणे गरजेचे आहे.