Topic icon

शिष्टाचार

0






आई वडिलांनंतर आपल्या जीवनाच्या जडणघडणी मध्ये प्रत्येक अवस्थे मधल्या गुरूचा मोठा वाटा असतो. अगदी प्राथमिक अवस्थेतील गुरुपासून ते शेवटच्या टप्प्यातिल आध्यत्मिक गुरुपर्यंत. अप्रत्यक्षपणे तर निसर्ग नेहमीच आपल्याला साथ देत असतो, शिकवत असतो. शिक्षक हा अतिशय चैतन्य असलेल्या बालकाशी निगडीत असल्यामुळे त्याला नेहमी जागरूक रहावे लागते. त्याने नेहमी नवीन शिकण्याची आस धरावी, कास धरावी. जर तो स्वतःला परिपूर्ण समजत असेल तर त्याला नवीन काहीच शिकत येणार नाही; म्हणजे अज्ञानाची जाणीव झाली तरच तो घडत जाईन. आपल्याला मिळालेले ज्ञान जोपर्यंत तो आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवत नाही तोपर्यंत तो बद्ध असतो तो त्या ज्ञानातून मुक्त होत नाही.
         आजही आपण आपले आई वडील असो किंवा गुरुजन आपल्या समोर आले कि आपली मान आपोआप आदराने झुकली जाते. आपण त्यांचा शब्दही टाळत नाही इतके खोलवर संस्कार आपल्यात निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत पण कुठेतरी हि खंत येते की असे खोलवर संस्कार आम्ही आमच्या स्वतःच्या मुलांमध्ये, विद्यार्थीमध्ये रुजवू शकत नाही. अस म्हणतात की वृक्ष जर वरती चांगला वाढवायचा असेल तर त्याची मुळे खोलवर गेली पाहिजेत तरच त्याला सुंदर फळे फुले लागतील. आपलं 'छान छान गोष्टीच' पुस्तक अजूनही डोळ्यासमोर येत त्यातील गोष्टींनी अगदी हसत खेळत आपल्याला मोठी शिकवण दिलीय.
        आजची मुले फार हुशार आहेत पण कार्टून आणि मोबाइल गेम यामुळे ती चंचल, शिघ्रकोपी उतावळी असलेली बनली आहेत. आपण डिजिटायलॆझेशनच्या नादात पाश्चिमात्य बनत चाललो आहोत. तंत्रज्ञान तर आवश्यक आहेच पण त्यासाठी मुळ संस्कृती विसरून चालणार नाही. ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान हि काळाची गरज आहे हे मान्य आहे त्यासाठी स्पर्धा आहे हे हि मान्य! पण ते करत असताना मानासोबत अपमान , सुखा:सोबत दुःख, यशासोबत अपयश पचवत आलं पाहिजे
पण तस घडत नाही. प्रेरणा, प्रोत्साहन ही गोष्ट अतिशय गरजेची असली तरी कधीतरी शिक्षा करणे हे सुद्धा संयुक्तिक आहे. आपल्याला आपल्या लहानपणी आपल्या आई वडिलांनी गुरुजींनी केलेल्या शिक्षा अजूनही आठवतात आणि त्या का केल्या गेल्या याची कारणेही आणि त्यामुळेच आपला विकास योग्य दिशेने झाला हे सत्य आहे.
उत्तर लिहिले · 22/7/2023
कर्म · 53710
0
निमंत्रण पत्राला उत्तर देण्याची प्रक्रिया येथे दिली आहे:
  1. पत्राचे स्वरूप:
    औपचारिक निमंत्रण पत्र असल्यास, उत्तर औपचारिक भाषेत लिहावे. अनौपचारिक निमंत्रण पत्र असल्यास, उत्तर अनौपचारिक भाषेत लिहावे.
  2. तत्काळ उत्तर:
    निमंत्रण मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर उत्तर द्यावे.
  3. आभार:
    निमंत्रण पाठवल्याबद्दल आयोजकांचे आभार माना.
  4. स्वीकृती किंवा नकार:
    आपण निमंत्रण स्वीकारत आहात की नाही, हे स्पष्टपणे सांगा.
  5. कारण:
    जर आपण निमंत्रण स्वीकारू शकत नसाल, तर त्याचे कारण सांगा. कारण स्पष्ट आणि विनम्र असावे.
  6. शुभेच्छा:
    कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्या.
  7. भाषा:
    आपली भाषा सभ्य आणि सकारात्मक ठेवा.
  8. उदाहरण:

    औपचारिक उत्तर:

    आदरणीय [आयोजकाचे नाव],
    आपण मला [कार्यक्रमाचे नाव] साठी आमंत्रित केले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. मला हे कळविण्यात आनंद होत आहे की मी निमंत्रण स्वीकारत आहे आणि कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहीन.
    आपला नम्र,
    [तुमचे नाव]

    अनौपचारिक उत्तर:

    प्रिय [आयोजकाचे नाव],
    तुमच्या निमंत्रणाबद्दल खूप खूप धन्यवाद! मला खूप आनंद झाला आहे आणि मी नक्कीच [कार्यक्रमाचे नाव] ला येईन.
    खूप प्रेम,
    [तुमचे नाव]

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1080
0

अनोळखी लग्नात जेवायला গেলে काही तोटे असू शकतात, जे खालीलप्रमाणे:

  1. गैरसोय: अनोळखी ठिकाणी आणि अनोळखी लोकांमध्ये तुम्हाला comfortable वाटणार नाही. तुम्हाला कुणी ओळखत नसल्यामुळे तुम्हाला एकटे वाटू शकते.
  2. असुरक्षितता: अनोळखी लोकांमध्ये गैरवर्तन होण्याची शक्यता असते.
  3. वेळेचा अपव्यय: तुम्ही तुमचा वेळ अशा ठिकाणी घालवता जिथे तुम्हाला आनंद मिळत नाही.
  4. आर्थिक नुकसान: लग्नाला जायचा खर्च (उदा. भेटवस्तू) वाया जाऊ शकतो, कारण तुमचा त्या समारंभात सहभाग नसतो.
  5. सामाजिक awkwardness: तुम्हाला तिथे adjust व्हायला वेळ लागू शकतो आणि तुम्ही awkward feel करू शकता.

या तोट्यांव्यतिरिक्त, काही सकारात्मक गोष्टीही घडू शकतात:

  1. तुम्ही नवीन लोकांना भेटू शकता.
  2. तुम्हाला नवीन संस्कृती आणि परंपरांची माहिती मिळू शकते.
  3. तुम्हाला चांगले जेवण मिळू शकते.

अनोळखी लग्नाला जायचे की नाही, हे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि परिस्थितीवर अवलंबून असते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1080
0


अन्नाचा आदर कसा करावा हे सांगतात या ‘तीन’ कथा! - 


अन्न हे पूर्णब्रह्म असतं. शरीररुपी यंत्राची हालचाल, त्याचे कामकाज आणि नियंत्रण योग्य प्रकारे सतत चालू ठेवण्यासाठी अन्न हे इंधनासारखे काम करते. इतकं अन्नाचं महत्व असताना मात्र आपण राजरोसपणे अन्नाची नासाडी करण्यात अग्रेसर असतो. याच अन्नाचे महत्त्व पटवून देणाऱ्या तीन कथा आजच्या लेखात पाहू.




१. अन्नदानाचे महत्त्व -
एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थितीने गरीब असला तरी आपल्‍या घासातील घास इतरांना देण्यास तो कधी मागेपुढे पहात नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवायला गेला. तेव्हा शेठजीने त्याला पंचपक्कवानांचे ताट वाढून दिले. ते ताट पाहून त्याने विचार केला यातून अजून तीन जणांचे पोट सहज भरेल. म्हणून तो ते अन्न घेऊन घरी जाऊ लागला. वाटेत त्याला भिकारी दिसला त्याला त्याने त्यातील थोडे अन्न दिले. नंतर घरी पोहचल्यावर एक भिक्षुक त्याच्या दारावर आला. त्यालाही त्याने अन्न दिले. त्यानंतर एक अपंग व्यक्ती त्याच्या दाराशी आला आणि त्याने अन्न मागितले. त्यालाही त्याने उरलेले सगळे अन्न देऊन टाकले. याच्याजवळ स्वतःसाठी काहीच खायला उरले नाही. तरीदेखील त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज ओसंडून वाहत होते. कारण त्याच्यामुळे या तीन जणांची भूक भागली होती. अचानक त्या दारापाशी आलेल्या अपंग व्यक्तीच्या भोवती तेजोमय प्रकाश आला आणि त्यातून देव प्रकटले आणि त्यांनी त्या गरीब अन्नदात्याला, तुला इथून पुढे काहीच कमी पडणार नाही असा आशिर्वाद दिला आणि देव अंतर्धान पावले.
तात्पर्य : देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.
२. अन्नाचा आदर -
एकदा राजा विक्रमादित्य त्यांचा सेनापती व मंत्री यांना घेऊन रथात बसून भ्रमंतीला निघाले. भ्रमंतीला निघाल्यावर आजूबाजूला रस्त्यावर त्यांना धान्य विखरुन पडलेले दिसले. राजांनी आपल्या सारथ्याला रथ थांबवायला सांगितले व म्हणाले, “अरे इथे जमीन तर हिऱ्यांनी भरून गेली आहे. मला हिरे गोळा करू द्या.” राजाच्या अशा बोलण्याने मंत्री गोंधळले. ते म्हणाले, "महाराज आपला काही भ्रम झाला आहे. जमिनीवर हिरे नाहीत तर धान्याचे दाणे विखरुन पडले आहेत." राजा विक्रमादित्य रथावरुन खाली उतरले आणि जमिनीवरचे दाणे वेचून त्यांना आपल्या कपाळाला स्पर्श करू लागले आणि म्हणाले, खरा हिरा तर अन्नाचे कणच असतात. या अन्नामुळेच आपले पोट भरते आणि आपण जिवंत राहतो. तेव्हा मंत्र्यांना अन्नाचे महत्व समजले व त्यांनी सगळे अन्न गोळा केले.
तात्पर्य : अन्नाला अन्नदेवता म्हटले जाते म्हणून अन्नाचा सदैव सन्मान केला पाहिजे. जगात हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान काही असेल तर ते केवळ अन्नच आहे. कारण अन्न असेल तरच आपण ऐश्वर्य आणि समृद्धीचा आस्वाद घेऊ शकू. त्यामुळे अन्नाच्या प्रत्येक कणाचा आदर करणे हेच आपले कर्तव्य आहे.
३. अन्नाला नावे ठेवू नका.
एकदा श्यामच्या आईने रताळ्याच्या पानांची भाजी केली होती. श्याम, त्याचे वडील, भाऊ असे सगळे जेवायला बसले होते. श्यामच्या आईने सगळ्यांना केलेली भाजी वाढली. श्यामला ती भाजी प्रचंड आवडायची. पण त्या दिवशी तो भाजी आवडीने खाताना दिसलाच नाही. म्हणून आईने श्यामला विचारले, "का रे श्याम, आज तू भाजी खात नाहीयेस? आवडली नाही का तुला? एरवी तर निम्मी भाजी तूच फस्त करतोस." त्यावर श्याम म्हणाला, “असे काही नाही." आणि सगळे मान खाली घालून जेवू लागले. सगळ्यांची जेवणं झाल्यावर आईसुद्धा जेवायला बसली. तिने भाजीचा घास घेतला तर तो तिला अळणी लागला. ती श्यामला म्हणाली, "अरे श्याम भाजीत मीठच नाही मुळी. तुम्ही सुद्धा कोणीच काही न बोलता मुकाट्याने जेवलात." त्यावर श्याम म्हणाला, "कधीतरी चुकून स्वयंपाकात कमी जास्त होणारच. त्यात एवढे सांगण्यासारखे आणि भाजीला नावे ठेवण्यासारखे देखील काहीच नव्हते. म्हणून आम्ही कोणीच काही बोललो नाहीत."
तात्पर्य : आपण नेहमीच जेवण जेवताना हे नाही, ते नाही अशा तक्रारी करत जेवतो. नावडीचे जेवण असेल तर जेवत सुद्धा नाही. हा अन्नाचा अपमान असतो. त्यामुळे नेहमी जे ताटात असेल, जसे असेल तसे पूर्णब्रह्म मानून खायला हवे.
आजकाल कित्येक जण अन्नावाचून आपले प्राण गमवताना दिसतात. तर अशा लोकांच्या पंक्तीत आपण नाही याचे देवाकडे आभार मानायला हवेत. पण यावरच थांबून उपयोगाचे नाही. तर या तिन्ही कथांच्या माध्यमातून अन्नाचे महत्व समजून घ्यायला हवे आणि अन्नाची नासाडी देखील थांबवायला हवी. 
उत्तर लिहिले · 23/12/2022
कर्म · 53710
0
डाव्या हाताने 




स्काऊट व गाईड हस्तांदोलन डाव्या हाताने करावयाचे असते.
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7460
0

सभेमध्ये लाजू नये आणि बाष्कळपणे बोलू नये, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात काही स्पष्टीकरण खालीलप्रमाणे:

सभेमध्ये लाजू नये:

  • आत्मविश्वास: सभेमध्ये आपले मत मांडताना आत्मविश्वास आवश्यक आहे. लाजून बोलल्यास आपले विचार स्पष्टपणे पोहोचत नाहीत.
  • संधीचा फायदा: अनेकदा सभेमध्ये बोलण्याची संधी एकदाच मिळते, त्यामुळे लाजल्यास आपण आपले म्हणणे मांडू शकत नाही.
  • ज्ञान आणि अनुभव: आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून সভায় सक्रिय सहभाग घ्या.

बाष्कळपणे बोलू नये:

  • विषयाला धरून बोलावे: सभेमध्ये विषयाला सोडून किंवा निरर्थक बोलणे टाळावे.
  • वेळेचे भान: कमी वेळात मुद्देसूद बोलणे महत्त्वाचे आहे, बाष्कळ बोलण्याने इतरांचा वेळ वाया जातो.
  • तयारी: सभेमध्ये काय बोलायचे आहे याची तयारी करणे आवश्यक आहे, जेणेकरून विषयावर योग्य माहिती देता येईल.

थोडक्यात, सभेमध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, पण तो योग्य आणि विषयाला धरून असावा.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1080
0

सौजन्यशीलता: आजची गरज

आजच्या धावपळीच्या जीवनात सौजन्यशीलता फार महत्त्वाची आहे.

सौजन्यशीलतेमुळे आपण दुसऱ्यांशी आदराने आणि नम्रतेने वागतो.

समाजात प्रेमळ आणि सकारात्मक वातावरण तयार होते.

यामुळे नात्यांमध्ये विश्वास वाढतो आणि गैरसमज कमी होतात.

आजच्या तणावपूर्ण परिस्थितीत, सौजन्यशीलतेमुळे मानसिक शांती मिळू शकते.

म्हणून, सौजन्यशीलतेचा स्वीकार करणे हे आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1080