3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
5
Answer link
यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व व राष्ट्रसंत भगवानबाबांच्या च्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

0
Answer link
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. श्री. यशवंतराव चव्हाण होते. त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी
https://marathi-motivation.com/maharashtrache-pahile-mukhyamantri
या लिंकला भेट द्या.
0
Answer link
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण होते.
त्यांचा कार्यकाल १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत होता.
स्रोत: