निवडणूक मतदान कार्ड ओळखपत्र तंत्रज्ञान

रंगीत मतदान कार्ड कसे बनवावे?

2 उत्तरे
2 answers

रंगीत मतदान कार्ड कसे बनवावे?

3
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे.

👨🏼‍🦰 *तुम्हालाही जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला त्याबाबतची माहिती देत आहोत.*

1. रंगीत मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या घराच्या पत्त्यासंबंधीचा पुरावा (address proof), वय व जन्मतारखेसंबंधित पुरावा आणि तुमचा एक फोटो सोबत ठेवा.

2. नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल (NVSP) च्या वेबसाईटवर जा

3. होमपेजवर व्होटर पोर्टल बॉक्सवर क्लिक करा. आता तुम्हाला https://voterportal.eci.gov.in पोर्टल दिसेल.

4. या पेजवर स्वतःचं रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला नवीन अकाऊट बनवावं लागेल. इथे तुम्ही गुगल, फेसबुक किंवा कोणत्याही इतर अकाउंटचा वापर करु शकता.

5. रजिस्ट्रेशननंतरच्या पेजवरील फॉर्म भरा.

6  इथे तुम्हाला तुमचा फोटो आणि इतर माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर एकदा फॉर्म तपासा आणि खाली दिलेल्या सबमिट बटणवर क्लिक करा. त्यानंतर काही दिवसांनी तुमचं रंगीत मतदार ओळखपत्र तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.
उत्तर लिहिले · 4/12/2020
कर्म · 569265
0

रंगीबेरंगी मतदान कार्ड बनवण्यासाठी खालील गोष्टी करा:

  1. अर्ज करा:
    • नवीन मतदार नोंदणीसाठी किंवा मतदार कार्डमध्ये बदल करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अर्ज करा. NVSP (National Voters' Service Portal) या वेबसाइटवर तुम्हाला अर्ज मिळेल.
  2. आवश्यक कागदपत्रे:
    • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, इत्यादी)
    • पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल, इत्यादी)
    • नवीनतम पासपोर्ट साइज फोटो
  3. अर्ज सादर करा:
    • ऑनलाईन अर्ज भरून झाल्यावर, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
  4. पडताळणी:
    • तुमच्या अर्जाची पडताळणी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात होईल.
  5. मतदान कार्ड मिळवा:
    • पडताळणी झाल्यावर तुमचे रंगीत मतदान कार्ड तुम्हाला पोस्टाने तुमच्या पत्त्यावर मिळेल किंवा तुम्ही ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून घेऊ शकता.

टीप: तुमच्या क्षेत्रातील निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला अचूक माहिती मिळू शकेल.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5000

Related Questions

AI च्या madati एक real estate agent Website बनवण्यासाठी किती खर्च येतो, ज्यामध्ये property owner Property Post करू शकतील. क्लायंट प्रॉपर्टी शोधू शकतील. त्यांचा पूर्ण कंट्रोल माझ्या हातात असावा. अशी वेब साइट बनवायची आहे?
माझे वय ५६ वर्ष आहे. मी रिअल इस्टेट एजंटचे काम करतो. मला माझी वेबसाईट AI च्या मदतीने बनवता येईल का? सुरुवात कोठून आणि कशी करावी? त्यासाठी मी काय करावे?
माझे वय ५६ वर्ष आहे. मी रिअल इस्टेट एजंटचे काम करतो. मला माझी वेबसाईट AI च्या मदतीने बनवता येईल का?
ऑडिओ बुक्स ऐकण्यासाठी चांगले ॲप?
माझ्या व्हॉट्सॲप वर गॅलरी मधून सिलेक्ट केलेले इमेज,मॅसेज,व्हिडिओ ई. शेअर करतांना डायरेक्ट फॉरवर्ड (send) होतात शेअर होत नाहीत.... इमेज,मॅसेज,व्हिडिओ ई. शेअर करतांना कॅप्शन टाकता येत नाही. इमेज,मॅसेज,व्हिडिओ ई. शेअर व्हावा यासाठी काय करावे लागेल?
आपल्या घरांमध्ये Wi-Fi ची जोडणी कशी करावी?
रोबो व माणूस यांच्या सामर्थ्य बाबत चर्चा करा?