2 उत्तरे
2 answers

कोमा म्हणजे काय?

2

रॉबीन कुकच्या 'कोमा' या कादंबरीवर 'कोमा' हा चित्रपट निघाला. तो अनेकांनी पाहिला असेल. त्यानंतर निघालेल्या बन्या हिंदी चित्रपटामध्येही आपला आवडता नायक, नायिका वा त्यांचे माय-बाप कोमात गेल्याचे (बिचारे!) तुम्ही बघितले असेल. अधूनमधून 'अमूक तमूक राजकीय पक्षाचे वयोवृद्ध नेते कोमात' अशी बातमीही तुम्ही वाचली असेल. कोमा म्हणजे नेमके काय? - हा प्रश्न तेव्हापासून तुम्हाला सतावत असेल.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, कोमा ही अशी गाढ झोप आहे जितून माणसाला कितीही वेदना होणारे उद्दीपन दिले तरी तो जागा होऊ शकत नाही. झोप व कोमा यांतील याखेरीज महत्त्वाचा फरक म्हणजे झोपेतला माणूस ठरावीक काळच झोपत असल्याने त्याच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होत नाही; पण कोमातील माणसाला जर शिरेवाटे पोषण पुरवले नाही, तर तो जिवंत राहणार नाही.

मेंदूचे कार्य काही प्रमाणात बंद पडणे म्हणजे माणूस कोमात जाणे, असे म्हणता येईल. यात मेंदूतील सर्व अत्यंत महत्त्वाच्या केंद्रांचे काम बंद पडते. मेंदूच्या वा त्यावरील आवरणांच्या आजारांमुळे, मेंदूला होणाऱ्या दुखापतीमुळे. अफू व दारू यांच्या विषबाधेमुळे तसेच मधुमेहात व मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. व्यक्तीचा मृत्यू हा मेंदूतील श्वसन, रक्ताभिसरण इत्यादी गोष्टींचे नियंत्रण करणारी केंद्रे निकामी झाल्याने होतो. कोमा हा आजार नसून, आजारांमुळे होणारा परिणाम आहे. आजकाल कृत्रिम उपायांनी लंबमज्जा, मज्जारज्जू, तसेच सर्व शरीराचा रक्तपुरवठा सुरळीत चालू ठेवता येतो.

त्यामुळे कोमात गेलेल्या अशा व्यक्ती बराच काळ जिवंत राहू शकतात. अर्थात त्या शुद्धीवर येणे जवळपास अशक्यच असते.

भारतीय कायद्याने आता 'मेंदूचा मृत्यू म्हणजे मृत्यू' ही कल्पना मान्य केली आहे. ज्या व्यक्तींच्या मेंदूच्या कार्याचा - विद्युत प्रवाहांचा आलेख हा ५ मिनिटे घेतला तरी सरळ रेषाच दाखवतो अशी व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करून तिच्या शरीरातील मूत्रपिंड, हृदय असे अवयव इतर रुग्णांसाठी वापरता येतात.
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

कोमा म्हणजे काय?

कोमा ही एक दीर्घकाळ चालणारी बेशुद्धीची अवस्था आहे. या स्थितीत, व्यक्ती जागृत नसते किंवा त्याला त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव नसते.

कोमाची कारणे:

  • मेंदूला गंभीर दुखापत.
  • स्ट्रोक (Strokes).
  • ब्रेन ट्यूमर (Brain tumor).
  • मधुमेह (Diabetes).
  • संसर्ग (Infection).
  • शरीरात ऑक्सिजनची कमतरता.
  • विषारी पदार्थ सेवनाने.

कोमाची लक्षणे:

  • डोळे बंद असणे.
  • कोणत्याही उत्तेजनांना प्रतिसाद न देणे.
  • कोणतीही हालचाल न करणे.
  • श्वासोच्छ्वास अनियमित होणे.

उपचार:

कोमावर कोणताही विशिष्ट उपचार नाही. उपचाराचा उद्देश मेंदूला आणखी नुकसान होण्यापासून वाचवणे आणि शरीराच्या कार्यांना आधार देणे हा असतो.

अधिक माहितीसाठी:

मेयो क्लिनिक - कोमा (इंग्रजी)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोक - कोमा (इंग्रजी)
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1080

Related Questions

हीमोड म्हणजे काय?
गालफुगी म्हणजे काय?
सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस मुळे अशक्तपणा येऊ शकतो का? उत्तर अर्जंट हवे आहे
सूज म्हणजे काय?
Spondylosis व spondylitis यात काय फरक आहे?
माझ्या मोठ्या भावाला पॅरालिसिसचा झटका आला, त्यांना दवाखान्यात नेण्यास उशीर झाला. नंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी सांगितले व केले. मला याच्यातलं काहीच माहिती नाही.
Hydrocele म्हणजे काय आहे?