Topic icon

वैद्यकीय स्थिती

0

हीमोड (हीमोडायलिसिस) म्हणजे काय?

हीमोडायलिसिस (Hemodialysis) ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मशीनच्या साहाय्याने रुग्णाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी फिल्टर केले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मूत्रपिंड (kidney) निकामी होते, तेव्हा ते रक्त शुद्ध करू शकत नाही. अशा स्थितीत, हीमोडायलिसिस त्या व्यक्तीसाठी जीवनदायी ठरते.

हीमोडायलिसिस कसे कार्य करते?

  • रुग्णाच्या शरीरातून रक्त डायलिसिस मशीनमध्ये पाठवले जाते.
  • मशीनमध्ये, डायलायझर (Dialyzer) नावाचे एक फिल्टर असते, जे रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी शोषून घेते.
  • शुद्ध केलेले रक्त परत रुग्णाच्या शरीरात पाठवले जाते.

हीमोडायलिसिस कधी आवश्यक असते?

  • मूत्रपिंड निकामी झाल्यास (Kidney failure).
  • गंभीर मूत्रपिंड रोग (Kidney disease).
  • शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यास.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1080
2
गालगुंड हा एक विषाणूमुळे होणारा आजार असून याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्‍याकडे लाळ, नाकातील स्राव यामार्फत होत असतो. गालगुंड आजारात गालाच्या खाली गळ्याजवळ असणाऱ्या लाळेच्या ग्रंथी सूजतात. त्यामुळे या आजारात गाल फुगलेले दिसतात म्हणूनच गालगुंड आजाराला 'गालफुगी' असेही संबोधले जाते.


ह्या व्याधीमध्ये रोग्याच्या लाळग्रंथी अचानक सुजतात. साधारणतः शिशीर व वसंत ऋतुमधे गालगुंड, गालफुगी रोगाची साथ येते.


गालफुगी झालेला मुलगा
गालगुंड, गालफुगी हा व्यापक प्रमाणात पसरणारा व्याधी असून जगामधे सर्वत्र आढळतो.
गालगुंड, गालफुगी रोग ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधे अधिक प्रमाणात आढळतो. परंतु कुठल्याही वयांमधे याची लागणं होऊ शकते. बालकांपेक्षा प्रौढ व्यक्तीमधे व्याधीची गंभीर लक्षणे निर्माण होतात. ९ महिण्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना हा व्याधी सहसा होत नाही.

स्त्रियाच्या तुलनेने पुरुषामधे गालगुंड, गालफुगी रोग अधिक प्रमाणात होतो. एकदा हा व्याधी होऊन गेल्यानंतर सहसा पुनः होत नाही. कारण त्या रोग्याच्या शरीरात ह्या व्याधीविरुद्ध प्रतिकार शक्ति निर्माण होते. मोठया शहरामधे हा व्याधी जास्त प्रमाणात पसरतो.

वर्णन 
झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो साधारणपणे आढळतो. भारतातील दर एक लाख मुलांमधील त्याचे १९४१ मधील प्रमाण दररोज २५० नवे रुग्ण असे होते. गालफुगीच्या लसीचा वापर सुरू झाल्यानंतर हे प्रमाण ७६ एवढे कमी झाले. गालफुगीची लस प्रचलित झाल्याने गालफुगीच्या रुग्णामध्ये खूपच घट झाली. १९८७मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णामध्ये पाच पटीने वाढ झाली होती. याचे कारण शाळेमध्ये लसीकरणामध्ये झालेले दुर्लक्ष. १९९६ पासून शाळेतील मुलांमध्ये १००% लसीकरणाची मोहीम राबवल्याने सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल- यू एस ) च्या रिपोर्ट प्रमाणे देशभरात फक्त ७५१ नवे रुग्ण आढळले. (दर पन्नास लाखात एक ).

गालफुगी, गालगुंड रोगाचा संचयकाळ १८ दिवसांचा असतो.
गालगुंड रोगाचा संचयकाळ म्हणजे काय?

गालगुंड रोगाचा संचयकाळ म्हणजे गालगुंड रोगाच्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यापासून ते गालगुंड रोगाची लक्षणे निर्माण होईपर्यंतचा कालावधी.

कारण आणि लक्षणे 
गालफुगी, गालगुंड कारणीभूत घटक – आर. एन. ए. मिक्झोव्हायरस पॅरॉटायडिटीज ( RNA Myxovirus – Parotiditis ) ह्या विषाणुची लागणंं झाल्यामुळे गालफुगी, गालगुंड व्याधी होतो.

पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक ना लागणे आणि निरुत्साह. कधी कधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आम्लयुक्त पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही. बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो.

गालफुगी, गालगुंड रोगाचा प्रसार कसा होतो? गालफुगी, गालगुंड व्याधीचा प्रसार प्रत्यक्ष संपर्क, तुषार संसर्ग, रुग्णांनी वापरलेल्या वस्तु इतरांंनी वापरल्यामुळे तसेच रोग्याच्या लाळेमुळे होतो. गालफुगी, गालगुंड व्याधीचा प्रसार नाकातील स्राव, शिंकणे, खोकणे, श्वासाद्वारे होतो.

मेंदूआवरण दाह गालगुंडाच्या लक्षणानंतर चार ते पाच दिवसात सुरू होतो. मान अवघडणे, उलट्या आणि गळून गेल्यासारखे वाटणे ही मेंदूदाहाची लक्षणे आहेत. ही बहुघा सात दिवसानी चालू होतात. मेंदूमध्ये कायमचा बिघाड सहसा होत नाही. गालगुंडाचा संसर्ग मेंदूमध्ये पसरल्यानंतर मेंदूआवरण दाह होतो. गालगुंड मेंदूदाहाची लक्षणे वेदना ना होणे, आकडी आणि अधिक ताप. मेंदूदाह गालगुंड होऊन दोन आठवड्यांनी होतो. गालगुंडानंतर झालेला मेंदूदाह बहुघा पूर्णपणे बरा होतो. पण बरे झाल्यानंतर झटके येणे बरेच दिवस राहते. दर शंभर रुग्णापैकी एका रुग्ण गालगुंड आजारात गुंतागुंतीमुळे मृत्यू पावतो.

वयात आलेल्या एक चतुर्थांश पुरुषामध्ये अंडकोशामध्ये मम्सची लक्षणे दिसतात. अंडकोशास आलेली सूज हे त्याचे लक्षण आहे. गालगुंड झाल्यानंतर सात दिवसात ही अवस्था सुरू होते. एका किंवा दोन्ही अंडकोशास आलेली सूज, तीव्र वेदना, ताप, मळमळ आणि डोकेदुखी सुरू होते.वेदना आणि सूज पाच ते सात दिवसात कमी होते पण अंडकोश कित्येक आठवडे संवेदनक्षम राहतात. कधीकधी मुलींना बीजांड दाह होतो पण त्याची लक्षणे पुरुषांपेक्षा कमी तीव्र असतात. २००२ मध्ये झालेल्या एका संशोधनात गालगुंड झालेल्या व्यक्तीमध्ये मोठ्या आतड्याचा दाह होण्याची शक्यता अधिक असते असे आढळून आले आहे. पण अजून यावर पूर्ण संशोधन झालेले नाही.

लक्षणे १ ) लाळग्रंथीमधे शोथ व वेदना –

एका बाजुला किंवा दोन्ही बाजुला लाळग्रंथीमधे शोथ व वेदना, कर्णमूलशूल, डोकेदुखी, मानदुखी इ लक्षणे निर्माण होतात.

२ ) ताप / ज्वर –

ताप १०१ ते १०२ डिग्री फॅरेनहिट, पर्यंंत ताप येतो.

३ ) गालावर व कानाच्या मुळाजवळ सूज असल्यामुळे येथील त्वचा ताणली जाते. त्यामुळे तोंड उघडतेवेळी त्रास होतो. ४ ) ८ ते १० दिवसाांमधे सूज नाहीशी होते. तसेच गालगुंड आजाराची इतर लक्षणे कमी होतात.

५ ) गालफुगी, गालगुंड रोगामधे काही रुग्णांमध्ये उपद्रव स्वरुपात वृषणग्रंथीवर दाह व सुज येणे ( Orchitis ), स्त्रीबिजांंडावर सुज व दाह (Ovaritis), अग्न्याशयावर सुज व दाह (Pancreatitis), ह्रदयाच्या पेशीवर सुज व दाह Myocarditis इ लक्षणे निर्माण होतात.

निदान 
गालगुंडाची साथ आल्यास बाह्य लक्षणावरून गालगुंडाचे निदान त्वरित करता येते. डॉक्टर मुलाचे तापमान पाहून गालावरील त्वचेच्या स्थितीवरून गालाची अंतर्त्वचा पाहतात. लाळग्रंथीच्या नलिकांची तोंडे गालगुंड झाले असल्यास तांबड्या रंगाची होतात. सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले असल्याने मुख आरोग्य व्यवस्थित नसल्यास लालग्रंथीमध्ये जिवाणूंची वाढा होऊन लाळ नलिकाना सूज आल्याची शक्यता असते. त्यामुळे गालगुंडाचे व्यवस्थित निदान होण्याची गरज आहे. जिवाणूसंसर्ग झाला असल्यास प्रतिजैविकांचा डोस द्यावा लागतो. क्वचित लाळनलिकांची तोंडे कर्करोगामुळे बंद होतात. अशा वेळी आयोडीनचा वापर करावा लागतो. लाळग्रंथीमध्ये गालगुंड विषाणू आहे याची खात्री योग्य त्या चाचणीने करून घ्यावी लागते.

२००२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या संशोधनातून गालगुंड विषाणू निदान करण्यासाठीची इम्युनोग्लोबिन-जी चाचणी विकसित करण्यात आली आहे. स्थानिक लोकसंख्येमध्ये लसीकरणाचे नेमके प्रमाण ठरविण्यासाठी या चाचण्यांचा उपयोग होतो.

उपचार 
गालगुंड झाल्यानंतर आजारावर फारसे उपचार ना करता तो आपोआप बरा होण्याची वाट पहातात. लक्षणावर उपचार करता येतात. गिळण्यास त्रास होत असल्याने रुग्णास अन्न आणि पाणी पुरेशा प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. नाहीतर शुष्कता येण्याची शक्यता आहे. रुग्णास मऊ खाण्यास सोपे पदार्थ द्यावेत.शिजवलेला मऊ भात, उकडलेले बटाटे, सूप, बेबी फूड, मिक्सरमधून काढलेली लापशी वगैरे. अ‍ॅस्पिरिन, असिटॅमिनोफेन, आयब्युप्रोफेन आदींमुळे सूज , डोकेदुखी, आणि तापामुळे झालेल्या वेदना कमी होतात. फळांचे रस टाळावेत. दूघ आणि दुधाचे पदार्थ देऊ नयेत. ते पचण्याच्या दृष्टीने कठीण असतात. गुंतागुंत झाल्यास डॉक्टरांना भेटावे. अंडकोशास सूज आल्यानंतर त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा. कापसाच्या घड्या अंडकोशाखाली ठेवून मांड्याना चिकटपट्टीने चिकटवल्यास आराम मिळतो. आइस पॅकने वेदना कमी होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने विषाणू प्रतीरोधी औषधे दिली जाऊ शकतात.

गालफुगी, गालगुंड च्या पट्टी वर दाह व सूज कमी करणार्या औषधांचा लेप केलेला असतो.

गालफुगी, गालगुंड च्या पट्टी च्या वापराने गालफुगी, गालगुंड ची लक्षणे त्रास कमी होण्यास मदत होते.

गालफुगी, गालगुंड ची पट्टी कशी वापरावी? How to use Belladonna Plaster for Mumps in Marathi ?

१ ) गालफुगी, गालगुंड पट्टीवरील छिद्र नसलेला कागद काढूण टाकावा.

२ ) गालफुगी, गालगुंड पट्टीचा गोल छिद्र असणारा भाग गालफुगी, गालगुंड वर लावण्यास वापरावा.

३ ) गालफुगी, गालगुंड झालेल्या, सुजलेल्या भागावर हि पट्टी योग्य प्रकारे चिकटवावी.

४ ) दुसर्या दिवशी जुनी पट्टी काढूण टाकावी व नविन पट्टी चिकटवावी.

पर्यायी उपचार 
सूज आलेल्या ग्रंथीवर अक्युप्रेशर चा उपयोग होतो. मधल्या बोटाने जबड्याचे हाड आणि कान यामधील जागा दोन मिनिटे दाबून दीर्घ श्वास घेतल्यास आराम मिळतो. होमिओपॅथीची अनेक औषधे गालगुंडावर देण्यात येतात. उदाहरणार्थ बेलॅडोना सूज, गाल लाल होणे, यावर परिणाम करते. ब्रायोनिया संवेदनक्षमता, अशक्तपणा किंवा तहान लागणे यासाठी, फायटोलॅक्का मोठ्या प्रमाणात ग्रंथीना सूज आली असल्यास वापरतात. मुलांना देण्यासाथी औषधांचे प्रमाण होमिओपॅथी प्रॅक्टिशनरच्या सल्ल्याने घ्यावे. एका दिवसात गुण आला नाही तर औषध थांबवावे. गालगुंड होऊ नये म्हणून मिळणारे प्रतिबंधक होमिओपॅथीचे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.

अनेक वनस्पतिजन्य औषधे गालगुंडासाठी वापरण्यात येतात. याने गालगुंड बरा होतो किंवा आजारामुळे होणारा त्रास कमी होतो. इचिनॅसिया शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगजंतूंचा प्रतिकार करण्यासाठी वापरतात. क्लेव्हर (गॅलियम अ‍ॅतपारिन ), कॅलॅन्डुला (कॅलॅन्डुला ऑफिसिनॅलिस) , आणि फायटोलॅक्का (पोक रूट) लसिकाग्रंथीवर परिणामकारक आहेत. फायटोलॅक्कामुळे विषबाधा होण्याची शक्यता असल्याने ते अनुभवी वैद्याच्या देखरेखीखाली घ्यावे. त्वचेवर वरून लावण्याची औषधे उदाहरणार्थ व्हिनेगार आणि कॅपसिकम फ्रुटेसेन्स मध्ये भिजवून गरम केलेला कपडा गालावर आणि मानेभोवती बाहेरून गुंडाळावा.

औदुंबराच्या खोडातून सूर्योदयापूर्वी पाझरणारा चीक लावला की गालगुंड बरा होतो.

पूर्वानुमान 
गालगुंड झाल्याच्या निदानानंतर गुंतागुंत ना झाल्यास फारशी काळजी करण्याचे कारण नाही. दोन आठवड्यानंतर आणखी एकदा गालगुंडाचा त्रास होण्याची शक्यता असते. पूर्ण बरे होईपर्यंत गुंतागुंत होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

गालफुगी, गालगुंड रोगामधे काही रुग्णांमध्ये उपद्रव स्वरुपात खालील आजार किंंवा लक्षणे दिसून येतात.

   वृषणग्रंथी शोथ (Orchitis ) – १५ ते ४० % पुरुषांमधे वृषणग्रंथीचा दाह होतो व तेथे सुज येते. हि लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
   स्त्रीबिजांंडदाह (Ovaritis ) – ५ % मुलींमधे व स्त्रीयांमधे स्त्रीबिजांंडावर सुज येते व त्याचा दाह होतो. यावेळी पोटदुखी हे लक्षण प्रर्कषाने जाणवते हि लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
   अग्न्याशयदाह (Pancreatitis ) – ४ % काही रुग्णांमधे अग्न्याशयावर सुज येते व त्याचा दाह होतो. यावेळी अचानक पोटदुखी हे लक्षण निर्माण होते, हि लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
   ह्रदयदाह (Myocarditis) – ह्रदयाच्या पेशीवर सुज येते व त्यांचा दाह होतो. अशा वेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
   मस्तिष्क दाह (Encephalitis) – १ ते १० % रुग्णांमधे मेंंन्दूवर सुज येते.
प्रतिबंध 
१ ) सूचना – Notification –

गालफुगी, गालगुंड व्याधीचा रुग्ण दिसताच आरोग्य विभागास कळवावे. २ ) पृथ्यकरण – Isolation –

गालफुगी, गालगुंड रोग्याच्या लाळग्रंथीला सूज आल्यापासून ५ दिवसपर्यत रुग्ण हा अतिसंक्रामक असतो त्यामुळे गालफुगी, गालगुंड च्या रुग्णाला ५ दिवसपर्यत इतर निरोगी व्यक्तींपासून वेगळे ठेवावे. ३ ) गालगुंड लसीकरण – Mumps Vaccination in Marathi –

एम. एम. आर. ( MMR ) ही लस गालफुगी, गालगुंड किंवा Mumps ह्या व्याधीसाठी दिली जाते.

   एम. एम. आर. ( MMR ) लसीचा १ ला डोस बाळाचे वय १ वर्ष ते सव्वा वर्ष या दरम्यान असताना द्यावा. १ वर्षानंतर अर्धा मि. ली. ह्या मात्रेत इंंन्जेक्शन द्वारे देतात.
   एम. एम. आर. ( MMR ) लसीचा २ ला डोस बाळाचे वय ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
एम. एम. आर. ( MMR ) लसीचे दोन्ही डोस वरील प्रमाणे घेतल्यास सहसा हा गालफुगी, गालगुंड रोग आयुष्यात कधीच होत नाही. समजा झालाच तर त्याची खुप सौम्य लक्षणे निर्माण होतात. गर्भवति स्त्रीला हि लस देत नाहीत.

४ ) विमंक्रमण – Disinfection –

गालफुगी, गालगुंड रोग्यांंनी वापरलेले कपडे, वस्तु, नाकातील आणि गळ्यातील आभूषने, यांचे विसंक्रमण करावे.

गालगुंड प्रतिबंधक लस घ्यावी. एमएमआर ही संयुक्त लस रुबेला, गोवर आणि गालगुंड यासाठी देण्यात येते. १२-१५ महिन्याच्या बालकांना, ४-६ वर्षांच्या आणि ११-१२ वर्षाच्या मुलांना प्रत्येकी एक डोस अशा प्रमाणात ती देण्यात येते. गालगुंड झाल्याचे नक्की ठाऊक नसलेल्या मुलांना लस द्यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची गरज आहे. सर्व जगभर गालगुंड हा आजार असल्याने प्रौढांनी परदेशी प्रवास करताना लसीकरण करून घ्यावे. गालगुंडाची लस अत्यंत परिणामकारक आहे. प्रत्येकास लसीकरणानंतर गालगुंडापासून संरक्षण मिळते. काही रुग्णाना गालगुंडाची लस देता येत नाही उदाहरणार्थ

दिवस गेलेल्या गरोदर स्त्रिया. लसीकरणानंतर गर्भपाताची शक्यता. पण बाळामध्ये लसीकरणामुळे विकृति उत्पन्न होत नाही. ज्या स्त्रियाना गालगुंडाची लस दिली आहे त्यानी तीन महिन्यासाठी गरोदरपण लांबवावे .
लस न घेतलेल्या व्यक्तीस गालगुंड झाल्यास त्याला लस देऊ नये. अर्थात गालगुंडाची साथ आल्यानंतर लक्षणे न दिसल्यास लसीकरण करून घ्यावे.
ताप येणे, प्रारंभीच्या श्वासमार्गाचे आजार असल्यास आजार बरा होईपर्यंत लस घेऊ नये.
गालगुंडाची लस कोंबडीच्या अंड्यामध्ये वाढवलेली असल्याने ज्या व्यक्तीना अंडे खाल्यानंतर घसा दुखणे, घशास सूज, श्वास घेण्यास अडथळा दिसल्यास लस घेऊ नये.
प्रतिकार क्षमता क्षीण झालेल्या कॅन्सर प्रतिबंधक औषधे आणि उपचार घेणा-या रुग्णानी गालगुंड लस घेऊ नये.
सीडीसी च्या प्रसिद्धीकरणाप्रमाणे जी मुले एचआयव्ही उपचार घेत आहेत आणि ज्याना गालगुंडाची लक्षणे दिसत नाहीत त्याना गालगुंड लस १५ महिन्यांनंतर देण्यात यावी.

उत्तर लिहिले · 22/1/2022
कर्म · 121765
0
माझ्या माहितीप्रमाणे,
Cervical spondylitis मुळे हाता-पायांमध्ये अशक्तपणा येऊ शकतो.
उत्तर लिहिले · 18/11/2021
कर्म · 25850
0

सूज (Inflammation):

सूज म्हणजे शरीराची कोणत्याही प्रकारच्या उत्तेजनाला दिलेली प्रतिक्रिया. जेव्हा शरीरात काहीतरीAnomaly (उदाहरणार्थ, एखादा सूक्ष्मजंतू किंवा एखादी जखम) होते, तेव्हा शरीर त्या भागाचे संरक्षण करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी प्रतिक्रिया देते. या प्रतिक्रियेला सूज म्हणतात.

सुजेची लक्षणे:

  • लाली (Redness)
  • उष्णता (Heat)
  • सूज (Swelling)
  • वेदना (Pain)
  • कार्यात्मकModel of loss (Loss of function)

सुजेची कारणे:

  • संसर्ग (Infection): सूक्ष्मजंतू, विषाणू किंवा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे.
  • जखम (Injury): शारीरिक आघात किंवा दुखापत.
  • रोगप्रतिकारशक्ती (Immune system disorders): स्वयंप्रतिकार रोग, ज्यात शरीर स्वतःच्या ऊतींवर हल्ला करते.
  • ऍलर्जी (Allergies): विशिष्ट पदार्थ किंवा वस्तूंना शरीराची प्रतिक्रिया.
  • जळजळ (Irritants): रासायनिक पदार्थ किंवा विषारी घटक.

सूज दोन प्रकारची असते:

  1. तीव्र सूज (Acute inflammation): ही सूज काही दिवस किंवा आठवड्यांत कमी होते.
  2. दीर्घकालीन सूज (Chronic inflammation): ही सूज काही महिने किंवा वर्षे टिकते.

उपचार:

सुजेवर उपचार अवलंबून असतात की सूज कशामुळे आली आहे. काही सामान्य उपचारांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • औषधे (Medications): वेदनाशामक (Painkillers), दाहक-विरोधी औषधे (Anti-inflammatory drugs), स्टिरॉइड्स (Steroids).
  • घरगुती उपाय (Home remedies): बर्फ लावणे,compression करणे, affected अवयव elevated ठेवणे.

अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080
0

Spondylosis आणि spondylitis या दोहोंमध्ये काय फरक आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांची माहिती खालीलप्रमाणे:

Spondylosis (स्पॉन्डिलोसिस):

  • Spondylosis म्हणजे हाडांची झीज होणे.
  • हा एक degenerative disease आहे, जो वृद्धत्वामुळे होतो.
  • यात मणक्यांमधील cartilage (कूर्चा) आणि disc (चकती) झिजतात, ज्यामुळे osteoarthritis (संधिवात) होऊ शकतो.
  • Spondylosis बहुतेक वेळा मान (cervical spondylosis) आणि कंबरेमध्ये (lumbar spondylosis) होतो.
  • यामध्ये वेदना, stiffness (अ stiffness) आणि neurological लक्षणे दिसू शकतात.

Spondylitis (स्पॉन्डिलायटिस):

  • Spondylitis म्हणजे मणक्यांना येणारी सूज.
  • हा एक inflammatory disease आहे, म्हणजे यात रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते.
  • Ankylosing spondylitis (AS) हा spondylitis चा एक प्रकार आहे, ज्यात मणके जुळतात आणि त्यांची हालचाल कमी होते.
  • Spondylitis मध्ये पाठदुखी, जडत्व (stiffness), आणि सांध्यांमध्ये वेदना होतात.
  • Spondylitis इतर अवयवांवरही परिणाम करू शकते, जसे की डोळे (uveitis) आणि आतडे.

मुख्य फरक:

  • Spondylosis हा झीज होण्याचा प्रकार आहे, तर spondylitis हा सूज येण्याचा प्रकार आहे.
  • Spondylosis वृद्धत्वामुळे होतो, तर spondylitis रोगप्रतिकारशक्तीच्या गडबडीमुळे होतो.

अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080
2

रॉबीन कुकच्या 'कोमा' या कादंबरीवर 'कोमा' हा चित्रपट निघाला. तो अनेकांनी पाहिला असेल. त्यानंतर निघालेल्या बन्या हिंदी चित्रपटामध्येही आपला आवडता नायक, नायिका वा त्यांचे माय-बाप कोमात गेल्याचे (बिचारे!) तुम्ही बघितले असेल. अधूनमधून 'अमूक तमूक राजकीय पक्षाचे वयोवृद्ध नेते कोमात' अशी बातमीही तुम्ही वाचली असेल. कोमा म्हणजे नेमके काय? - हा प्रश्न तेव्हापासून तुम्हाला सतावत असेल.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, कोमा ही अशी गाढ झोप आहे जितून माणसाला कितीही वेदना होणारे उद्दीपन दिले तरी तो जागा होऊ शकत नाही. झोप व कोमा यांतील याखेरीज महत्त्वाचा फरक म्हणजे झोपेतला माणूस ठरावीक काळच झोपत असल्याने त्याच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होत नाही; पण कोमातील माणसाला जर शिरेवाटे पोषण पुरवले नाही, तर तो जिवंत राहणार नाही.

मेंदूचे कार्य काही प्रमाणात बंद पडणे म्हणजे माणूस कोमात जाणे, असे म्हणता येईल. यात मेंदूतील सर्व अत्यंत महत्त्वाच्या केंद्रांचे काम बंद पडते. मेंदूच्या वा त्यावरील आवरणांच्या आजारांमुळे, मेंदूला होणाऱ्या दुखापतीमुळे. अफू व दारू यांच्या विषबाधेमुळे तसेच मधुमेहात व मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. व्यक्तीचा मृत्यू हा मेंदूतील श्वसन, रक्ताभिसरण इत्यादी गोष्टींचे नियंत्रण करणारी केंद्रे निकामी झाल्याने होतो. कोमा हा आजार नसून, आजारांमुळे होणारा परिणाम आहे. आजकाल कृत्रिम उपायांनी लंबमज्जा, मज्जारज्जू, तसेच सर्व शरीराचा रक्तपुरवठा सुरळीत चालू ठेवता येतो.

त्यामुळे कोमात गेलेल्या अशा व्यक्ती बराच काळ जिवंत राहू शकतात. अर्थात त्या शुद्धीवर येणे जवळपास अशक्यच असते.

भारतीय कायद्याने आता 'मेंदूचा मृत्यू म्हणजे मृत्यू' ही कल्पना मान्य केली आहे. ज्या व्यक्तींच्या मेंदूच्या कार्याचा - विद्युत प्रवाहांचा आलेख हा ५ मिनिटे घेतला तरी सरळ रेषाच दाखवतो अशी व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करून तिच्या शरीरातील मूत्रपिंड, हृदय असे अवयव इतर रुग्णांसाठी वापरता येतात.
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

मला तुमच्या मोठ्या भावाला पॅरालिसिसचा झटका आला हे ऐकून खूप वाईट वाटले. उशीर झाल्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देऊ शकेन.

पॅरालिसिस (Paralysis) म्हणजे काय?

पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात. यात शरीराचा भाग काम करेनासा होतो. पॅरालिसिस मेंदूतील रक्तपुरवठा खंडित झाल्यास होऊ शकतो.

(https://www.mayoclinic.org/diseases-conditions/paralysis/symptoms-causes/syc-20352632 - मेयो क्लिनिक)

पॅरालिसिसच्या झटक्यात काय होते?

पॅरालिसिसच्या झटक्यात मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या निष्क्रिय होतात. यामुळे शरीराच्या भागांवर नियंत्रण कमी होते.

(https://www.ninds.nih.gov/health-information/patient-caregiver-education/fact-sheets/paralysis-hope-through-research - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक)

ऑपरेशन का केले जाते?

  • रक्तपुरवठा सुधारण्यासाठी: मेंदूतील रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करणे गरजेचे भासते.
  • रक्त गोठल्यास: रक्त गोठून रक्तपुरवठा थांबल्यास, ते गोठलेले रक्त काढण्यासाठी शस्त्रक्रिया करतात.
  • दाब कमी करण्यासाठी: कधीकधी मेंदूवर दाब वाढल्यास तो कमी करण्यासाठी ऑपरेशन केले जाते.

उशीर झाल्यास काय होते?

वेळेत उपचार न मिळाल्यास मेंदूच्या पेशी कायमस्वरूपी खराब होऊ शकतात, ज्यामुळे पॅरालिसिसचा प्रभाव वाढू शकतो.

तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या भावाच्या स्थितीबद्दल अधिक माहिती घ्या. त्यांच्या उपचारांबद्दल आणि पुढील योजनांबद्दल तपशीलवार चर्चा करा.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1080