2 उत्तरे
2 answers

ध्वनिप्रदूषण कसे मोजतात?

3

अलीकडेच मुंबईत 'नो हॉर्न डे' पाळला गेला. त्या दिवशी कोणत्याही वाहनानं आपला हॉर्न वाजवू नये अशी अपेक्षा होती. कारण सतत आणि आवश्यक नसताना हॉर्न वाजवत राहिल्यानं गोंगाट होतो, ध्वनिप्रदूषण होतं आणि त्यापायी आसपास राहणाऱ्या लोकांचं आरोग्य बिघडतं. साहजिकच प्रश्न पडतो, की हे ध्वनिप्रदूषण नेमकं मोजतात कसं? १९२९ साली पहिल्यांदाच आवाजाच्या पातळीचं सर्वेक्षण न्यूयॉर्क शहरात केलं गेलं. त्यावेळी बेल टेलिफोन लॅबोरेटरीतले वैज्ञानिक डॉ. हार्वे फ्लेचर यांचं, 'आवाजाची पातळी म्हणजे काय आणि ती कशी मोजतात', या विषयावरचं एक व्याख्यान रेडिओवरून प्रसृत करण्यात आलं. आपण कोणताही आवाज ऐकतो तो आपल्या कानांनी. आपले कान तसे भलतेच संवेदनशील आहेत. आपलं बोट एखाद्या काचेवरून फिरत असताना जो चुटपुटता आवाज होतो, तोही ऐकण्याची क्षमता आपल्या कानामध्ये असते. त्यामुळे आवाजाची पातळी मोजण्यासाठीही आपल्या कानांचंच एक प्रतिरूप बनवण्यात आलं. कोणताही आवाज आपण ऐकतो तेव्हा त्या ध्वनिलहरींचा दाब आपल्या कानांच्या पडद्यावर पडतो. त्यातून उठलेल्या तरंगांचं रूपांतर विद्युत् रासायनिक लहरींमध्ये होतं. त्या लहरी कानांच्या पडद्यांना जोडलेल्या मज्जातंतूंकडून मेंदूपर्यंत पोहोचवल्या जातात. तिथं त्यांचं विश्लेषण होऊन त्या आवाजाचा अर्थ आपल्याला कळतो; पण आवाजाची पातळी मात्र कानांच्या पडद्यावर पडणाऱ्या दाबावरच अवलंबून असते. तेव्हा कोणत्याही ध्वनिलहरींच्या एका पातळ पडद्यावर पडणाऱ्या दाबाचं मोजमाप करून त्याची पातळी निश्चित केली जाते. त्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात. चार्ल्स लिन्डबर्गच्या स्वागतासाठी झालेला टाळ्यांचा कडकडाट फ्लेचर यांनी ध्वनिमुद्रित केला होता. तो ९० डेसिबल इतका होता. तो आपल्या श्रोत्यांना ऐकवून त्यांनी त्यात १० डेसिबलची घट झाली तर काय होतं हेही दाखवून दिलं. जेव्हा नितांत शांतता असते तेव्हा आवाजाची पातळी शून्य डेसिबल एवढी असते. त्यावेळी पडद्यावर दाब पडतो न पडतो अशी परिस्थिती असते. त्याच्या दसपट दाब पाडणाऱ्या आवाजाची पातळी १० डेसिबल असते. शंभर पटीनं अधिक दाब देणारा आवाज २० डेसिबल असतो. कुजबूज १५ डेसिबल इतकी असते, तर मोटारीचा हॉर्न ११० डेसिबल आवाज निर्माण करतो. जेट विमान उडताना होणारा आवाज १४० डेसिबल हून अधिक असू शकतो. सतत ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज कानावर पडत राहिला तर आपल्या श्रवणशक्तीला हानी पोहोचू शकते. त्यामुळे ६० किंवा ७० डेसिबलचा आवाज सतत होत राहणं याला ध्वनिप्रदूषण म्हणतात.

उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी डेसिबल (Decibel - dB) या एककाचा वापर केला जातो.

ध्वनिप्रदूषण मोजण्याची प्रक्रिया:

  1. साउंड लेवल मीटर (Sound Level Meter): ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठी साउंड लेवल मीटर नावाचे उपकरण वापरले जाते. हे उपकरण ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजते.
  2. मापन पद्धती: साउंड लेवल मीटरला ध्वनीच्या स्त्रोताजवळ धरून काही वेळासाठी ध्वनीची पातळी मोजली जाते.
  3. सरासरी पातळी: काही मिनिटांच्या अंतराने अनेक वेळा पातळी मोजून त्याची सरासरी काढली जाते.
  4. विश्लेषण: यानंतर, मिळालेल्या ডেसिबलच्या आधारावर ध्वनी प्रदूषण कोणत्या पातळीवर आहे हे ठरवले जाते.

डेसिबल (dB) स्केल:

  • ० dB: हे सर्वात कमी ध्वनी पातळी आहे, जी साधारणपणे ऐकू येत नाही.
  • ६० dB: सामान्य संभाषणाची पातळी.
  • ८५ dB: या पातळीवरील ध्वनी दीर्घकाळ ऐकल्यास श्रवणशक्तीला धोका होऊ शकतो.
  • १२० dB: वेदनादायक ध्वनी पातळी.

संदर्भ:

  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (https://mpcb.gov.in/)

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5060