2 उत्तरे
2
answers
बहिरे लोक मोठ्याने का बोलतात?
1
Answer link
बहिऱ्या लोकांना ऐकू यावे म्हणून आपण मोठ्याने बोलतो; पण बहिरे लोक ऐकू येणाऱ्या लोकांशी बोलतानाही मोठ्याने का बोलतात, हे तुमच्या लक्षात आले आहे का? असे का बरे होत असावे? विशेषतः वृद्धत्वामुळे बहिरेपणा आलेल्या लोकांच्या बाबतीत हे प्रामुख्याने आढळून येते. असे का होते हे कळण्यासाठी, आपण किती जोरात बोलायचे हे कसे ठरवतो ते आठवून पाहा. आपल्याला ऐकू येणाऱ्या आपल्या आवाजाच्या तीव्रतेवर आपण किती जोरात बोलायचे ते ठरवतो. साहजिकच पूर्णपणे ऐकू न येणाऱ्या व्यक्तींना स्वत:चा आवाजही खूप क्षीण ऐकू येतो वा बिलकुलच ऐकू येत नाही. त्यामुळे ती व्यक्ती खूप मोठ्याने बोलते. अशा व्यक्तींना श्रवण्यंत्र लावल्यास त्यांचे बोलणे सामान्य बनते. त्यामुळे ज्या बहिरेपणात व्यक्तीला थोडेफार तरी ऐकू येते, त्या व्यक्ती सर्वसामान्यांप्रमाणेच बोलतात वा थोडे मोठ्याने बोलतात; पण खूप कमी ऐकू येणारे लोक, विशेषतः वृद्धत्वामुळे बहिरेपणा येणारे लोक खूप मोठ्याने बोलतात.
0
Answer link
बहिरे लोक मोठ्याने का बोलतात याची काही कारणे:
- श्रवणशक्ती कमी असणे: ज्या लोकांना ऐकायला कमी येते, त्यांना स्वतःच्या आवाजाची पातळी कळत नाही. त्यामुळे ते मोठ्याने बोलू शकतात.
- प्रतिक्रिया: काहीवेळा, बहिरे लोक मोठ्याने बोलतात कारण त्यांना इतरांच्या बोलण्याची प्रतिक्रिया हवी असते.
- सवय: लहानपणापासून ऐकायला कमी येत असल्यामुळे, मोठ्याने बोलण्याची सवय लागते.
- समस्या: बोलताना आवाज स्पष्ट न झाल्यास, संवाद साधण्यात समस्या येऊ शकतात.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: