भाषा व्याकरण शब्द

मराठी समानार्थी शब्द?

2 उत्तरे
2 answers

मराठी समानार्थी शब्द?

1
तक्रार = गाऱ्हाणे 

तोंड = तुंड, वक्र, आनन, वदन, मुख

गाजावाजा झाला = कीर्ती पसरली

कुचंबणा = घुसमट

अनाथ = पोरका

घरटे = खोपा

झाड = वृक्ष, तरू, पादप, द्रूप, गुल्म, अगम, विटप, शाखी

राग = क्रोध, संताप, चीड

भाट = स्तुतिपाठक

दूध = दुग्ध, पय, क्षिर

अपराध = गुन्हा, दोष

पुरातन = प्राचीन 

इशारा = सूचना

अमृत = पीयूष, सुधा

अंक = आकडा

अभिमान = गर्व

हळू चालणे = मंदगती

आठवडा = सप्ताह

पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री

वैराण = ओसाड, भकास, उजाड

साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा


उत्तर लिहिले · 10/11/2020
कर्म · 515
0

मराठी समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द जे अर्थाने समान असतात, पण त्यांचे लेखन आणि उच्चारण वेगळे असते.

समानार्थी शब्दांची काही उदाहरणे:

  • अग्नी: आग, विस्तव, ज्वाला, अनल.
  • आकाश: गगन, नभ, अंबर, व्योम.
  • वारा: हवा, वायू, अनिल, पवन.
  • पाणी: जल, नीर, उदक, वारी.
  • पृथ्वी: जमीन, भूमी, धरती, धरा.
  • सूर्य: रवी, भास्कर, आदित्य, दिनकर.
  • चंद्र: शशी, इंदू, रजनीकर, सुधाकर.
  • कमळ: पंकज, नीरज, अरविंद, सरोज.
  • आई: माता, जननी, जन्मदात्री, माऊली.
  • देव: ईश्वर, परमेश्वर, भगवान, विधाता.

समानार्थी शब्दांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि विचार अधिक स्पष्टपणे मांडता येतात.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2680

Related Questions

पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे या वाक्यातील काळ ओळखा?
मोराचा समानार्थी शब्द काय?
शब्द वर्णानुक्रमे लावा: शंख, शहामृग, शेवगा, शॅडो, शॉप?
शब्द वर्णानुक्रमे लावा: तरंग, तून, तुरुंग, भद्रा, तंग. स्पष्टीकरणासह?
मोठेपणा, आई, पण, शहाणा या शब्दांमध्ये नाम नसलेला पर्याय कोणता?
स्वतः, दुःख, फायदा, नाव, यामध्ये कोणता शब्द नाम नाही?
नाम नसलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. पर्याय क्रमांक एक: टाकी, पर्याय क्रमांक दोन: माळी, पर्याय क्रमांक तीन: काळी, पर्याय क्रमांक चार: जाळी?