सरकारी योजना रेशन कार्ड

नवीन रेशन कार्ड कसे काढायचे?

2 उत्तरे
2 answers

नवीन रेशन कार्ड कसे काढायचे?

2
रेशनकार्डचे प्रकार:-

* अंत्योदय रेशनकार्ड – अंत्योदय योजनेतील लाभधारक
* प्राधान्य गट रेशनकार्ड – वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
* केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक
* पांढरे रेशनकार्ड – १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती


नवीन रेशनकार्ड कधी मिळते?

* रेशनकार्ड हरवले असेल तर
* दुबार रेशन कार्ड काढावयाचे असल्यास
* रेशनकार्ड खराब झाले असेल तर
* कुटुंब विभक्त झाले असेल तर
* रेशनकार्डामध्ये नाव वाढवायचे असेल तर
* रेशनकार्डमधून नाव कमी करणे
* व्यक्ती स्थलांतरित झाली असल्यास

आवश्यक कागदपत्रे

* तलाठी रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला
* लाइट बिल, घरफाळा पावती
* घरमालकाचे संमतीपत्र
* १० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प
* प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट)
* धान्य दुकानदाराचे पत्र
* आधार कार्ड झेरॉक्स
* बँक पासबुक झेरॉक्स व महिलेचे दोन फोटो

नवीन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे

*बाहेरगावाहून आलेले असल्यास : बाहेरगावाहून आलेले असल्यास त्याठिकाणच्या संबंक्षित सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार) स्थलांतराचा दाखला, रेशनकार्ड मूळप्रत.

*ज्यांचे रेशनकार्ड कोठेच नाही : रेशनकार्डमध्ये कोठेच नाव नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, तलाठ्याचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाइटबिल, भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमतीपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक व ज्या महिलेच्या नावाने कार्ड काढावयाचे आहे त्यांचे दोन फोटो.

*विभक्त कुटुंब असेल तर : वरील कागदपत्रांशिवाय विभक्त राहत असल्याचा सरकारी पुरावा उदा. लाइटबिल, घरफळा पावती, ग्रामपंचायत असेसमेंट उतारा यापैकी एक पुरावा. विभक्त राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र वडिलांनी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने लिहून दिलेले असावे.

*रेशनकार्ड हरविले असल्यास : पोलिस स्टेशनचा कार्ड हरविल्याचा दाखला आणि वरील सर्व कागदपत्रे
दुबार रेशन कार्ड काढावयाचे असल्यास : रेशनकार्ड हरविले किंवा खराब झाल्यास दुबार रेशनकार्ड काढता येते. हरविले असल्यास पोलिसांचा दाखला तर खराब झाले असल्यास मूळ रेशनकार्डची प्रत अर्जासोबत जोडावी लागते.

* नाव वाढवायचे असल्यास : मूळ रेशनकार्ड, नाव कमी करून आणल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा दाखला, लग्नामुळे नाव वाढवायचे असेल तर लग्नपत्रिका किंवा यादी पुरावा, विवाह नोंदणी दाखला. लहान मुलगा असेल तर सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी जन्मदाखला तर सहा वर्षावरील मुलांसाठी जन्मदाखला, शाळेचा दाखला आणि प्रतिज्ञापत्र

* नाव कमी करणे : मयत दाखला किंवा लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका किंवा यादी.
स्थलांतरीत होऊन आले असल्यास : ज्या कारणाने स्थलांतर झाले आहे त्याचे सक्षम अधिकाऱ्याचा दाखला. रेशनविभागाकडून तपासणी, चौकशी आणि त्यानंतरच कार्ड मिळते.

रेशनकार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही. तर गावागावांत असलेल्या किंवा सर्कलमध्ये असलेल्या महा इ सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. त्याठिकाणी जाऊन वरील कागदपत्रे सादर केल्यास नवीन रेशनकार्ड किंवा नाव कमी करणे आणि वाढवून मिळण्याचे काम होऊ शकते. त्याठिकाणाहून तहसिल कार्यालयात रेशनकार्ड येते आणि त्याची तपासणी करून त्यावर संबंधितांची सही झाली की रेशनकार्ड तयार होते.

घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं


केंद्र सरकारने नुकतीच 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची राहिली असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसं अपडेट करायचं जाणून घेऊया.

कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देश आणि राज्यासमोर संकट निर्माण झाले आहे. आर्थिक व्यवहार बंद असल्याने गरीब आणि हातावर पोट असलेल्यांवर अनेक ठिकाणी उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत आणि कमी किमतीत धान्य देण्याची योजना हाती घेतली आहे.  गरिबांसाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. अनेक सरकारी योजनांसाठी रेशन कार्ड अनिवार्य आहे.

केंद्र सरकारने नुकतीच 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची राहिली असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसं अपडेट करायचं हे जाणून घेऊया.

रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी 'या' कागदपत्रांची आहे आवश्यकता

- रेशन कार्डमध्ये घरातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची असल्यास कुटुंब प्रमुखाचे रेशनकार्ड असणं अनिवार्य आहे. याची एक फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. तसेच मुलाच्या जन्माचा दाखला आणि आईवडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे.

- घरामध्ये लग्न करून आलेल्या सुनेचं रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं असेल तर तिचं आधार कार्ड आणि पतीच्या रेशन कार्डची फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. यासोबतच माहेरच्या रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचं प्रमाणपत्र देखील असावं.

घरबसल्या ऑनलाईन अशी अपडेट करा माहिती

- घरबसल्या रेशन कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल.

- लॉगिन आयडी तयार केल्यावर वेबसाईटच्या होमपेजवर आपल्या नव्या सदस्याचे नाव टाकण्याचा एक पर्याय असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.

- ओपन झालेल्या फॉर्ममध्ये कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती भरा.

- फॉर्मसह आवश्यक डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करा.

- फॉर्म सबमिट झाल्यावर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, ज्याच्यामदतीने नंतर फॉर्म ट्रॅक करू शकता.

- फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अधिकार व्हेरिफाय करतील. जर तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य असेल तर फॉर्म अ‍ॅसेप्ट करण्यात येईल आणि पोस्टाद्वारे रेशन कार्ड घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.
उत्तर लिहिले · 4/11/2020
कर्म · 0
0
नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) काढण्यासाठी खालील प्रक्रिया आहे:

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड: कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
  • पॅन कार्ड (असल्यास)
  • उत्पन्नाचा दाखला: तहसीलदारांकडून जारी केलेला उत्पन्नाचा दाखला.
  • निवास दाखला: लाईट बिल, पाणी बिल, घरपट्टी किंवा भाडे पावती.
  • ओळखपत्र: ভোটার কার্ড, ড্রাইভিং লাইসেন্স, किंवा অন্য कोणताही सरकारमान्य ओळखपत्र.
  • कुटुंबाचा फोटो: कुटुंबातील सर्व सदस्यांचा एकत्रित फोटो.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. ऑफलाइन अर्ज:
    • तुमच्या এলাকার अन्न पुरवठा विभागात जा.
    • शिधापत्रिकेचा अर्ज (Ration Card Application Form) घ्या.
    • अर्ज व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
    • भरलेला अर्ज आणि कागदपत्रे अन्न पुरवठा विभागात जमा करा.
  2. ऑनलाइन अर्ज:
    • महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाइटवर जा: mahafood.gov.in
    • "ऑनलाइन सेवा" विभागात 'नवीन शिधापत्रिका अर्ज' (New Ration Card Application) शोधा आणि त्यावर क्लिक करा.
    • आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
    • अर्ज सबमिट करा आणि पोचपावती डाउनलोड करा.

अर्ज सादर केल्यानंतर:

  • तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • पडताळणी दरम्यान काही त्रुटी आढळल्यास, तुम्हाला त्या दुरुस्त करण्यास सांगितले जाईल.
  • पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे नवीन रेशन कार्ड जारी केले जाईल.

नोंद: अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमच्या এলাকার अन्न पुरवठा विभागाकडून नवीनतम माहिती तपासा.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

महाराष्ट्रामध्ये फ्री उपचार कोठे होतात?
नवीन सरकारी योजना आल्या तर कशा कळतात?
लाडकी बहिण योजनेची नवीन नियमानुसार काय पात्रता आहे?
कल्याण सुधारण्यासाठी सरकारचे विविध उपाय लिहा?
कल्याण सुधारणेसाठी सरकार विविध उपाय काय करत आहे?
पुरुष बचत गटासाठी सरकारी योजना आहेत का?
एका माणसाचे नवीन रेशन कार्ड बनते का? (विशेषत: जर घटस्फोट झाला असेल तर?)