प्रेमात भांडण का होत असते?

एकमेकांच्या मनासारखं वागलो नाही तर भांडणं होतात.. प्रेमाचा रंग काळा पडायला वेळ लागत नाही.. मनुष्याचा स्वभावच असतो की, कुणावर तरी आपला अधिकार असायला हवा.. त्यावर अधिराज्य गाजवले पाहिजे.. आणि समोरचा व्यक्ती जर ते अधिकार देत नसेल तर राग, चिडचिड, छोटी मोठी कारणं घेऊन वाद करणं, आणि मग हीच छोटी मोठी गोष्ट एकमेकांच्या लायकी पर्यंत पोहोचते.. आणि प्रेमात भांडणं होतात..

प्रेमाने जग जिंकता येते.. पण प्रेमाच्या व्यक्तीचे मन आयुष्यभर जिंकता येत नाही.. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचे वाटते पण दुसऱ्याचा सेल्फ रिस्पेक्ट ला किंमत नसते.. जेव्हा एकमेकांना समजून घ्यायला क्षमताच नसते तेव्हा प्रेमात भांडणं होतात...

एका बरणीत १०० काळ्या लाल मुंग्या एकत्र ठेवल्या तरी फार काही घडत नाही.. पण बरणी जोरात हलवून पुन्हा ठेवली तर या दोन्ही प्रकारच्या मुंग्या एकमेकांना शत्रू समजून जीवे मारण्यासाठी चावे घेतात.. कारण, आपल्याला जोराचा धक्का समोरच्यानेच दिला असा गैरसमज होतो.. पण खरा शत्रू तर बरणी हलवणारा असतो?? आजकाल समाजात हेच तर चाललंय.. एकमेकांविरुद्ध भांडणं करतात, पण ही भांडणं होण्याआधी बरणी कोणी हलवली याचा विचार करा!!

प्रेम तर सगळेच करतात.. पण जिथे समजून घेऊ शकत नाही तिथे प्रेमाचा ओलावा कायम टिकत नाही.. भांडणं होतात पण ती भांडणं पुन्हा होऊ नये यासाठी तडजोड मात्र कुणी करत नाही.. कारण अहंकार मध्ये येतो..
आपण त्या लाल काळ्या मुंग्यांसारखे आहोत.. आणि आपलं नकारात्मकी मन शत्रू आहे.. विचार करण्यासाठी बुद्धी आहे.. क्षमता आहे.. पण ही वैचारिक क्षमता आपण नकारात्मक गोष्टींवर जास्त प्रभाव टाकतो.. म्हणून बोलण्याआधी विचार करा.. जी गोष्ट शांतपणे बोलू शकतो ती आरडाओरडा करून कशी होईल.. विश्वासात घेऊन बोलण्याची वृत्ती बाळगा.. भांडणं होतील पण कमी होतील..

फोटो स्रोत: गुगल
प्रेमात भांडणं होण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी काही मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत:
-
अपेक्षा आणि अपेक्षाभंग:
प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या पार्टनरकडून काही अपेक्षा असतात. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा नाराजी आणि भांडणं होऊ शकतात.
-
संवाद कमी असणे:
दोन व्यक्तींमधील संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. आपल्या भावना आणि गरजा योग्य प्रकारे व्यक्त न केल्यास भांडणं होऊ शकतात.
-
समर्पणाचा अभाव:
एखाद्या नात्यात दोघांनीही समान प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर एक व्यक्ती जास्त आणि दुसरी कमी प्रयत्न करत असेल, तर त्यामुळे असंतोष निर्माण होतो आणि भांडणं होतात.
-
Space चा अभाव:
प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी थोडा वेळ आणि स्पेस हवा असतो. नात्यात जास्त बंधने असल्यास घुसमट होऊ शकते, ज्यामुळे भांडणं होतात.
-
आर्थिक समस्या:
पैशावरून होणारे वाद हे नात्यात भांडणाचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. आर्थिक ताण आणि गैरव्यवस्थापन यामुळे भांडणं वाढू शकतात.
-
व्यक्तिमत्त्वातील फरक:
दोन व्यक्तींच्या आवडीनिवडी, विचारसरणी आणि स्वभाव वेगवेगळे असू शकतात. या फरकांमुळे मतभेद होऊ शकतात आणि त्याचे रूपांतर भांडणात होऊ शकते.
-
असुरक्षितता:
असुरक्षिततेमुळे मनात शंका निर्माण होतात. पार्टनरवर संशय घेणे, हे भांडणाचे कारण बनू शकते.
हे सर्व मुद्दे पाहता, प्रेमळ नात्यात भांडणं टाळण्यासाठी संवाद, समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दल आदर असणे खूप महत्त्वाचे आहे.