भूगोल पृथ्वी

आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

4 उत्तरे
4 answers

आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

1
आपण सूर्यमालेतील पृथ्वी या ग्रहावर राहतो. हा एक असा ग्रह आहे ज्यावर सजीवसृष्टी अस्तित्वात आहे.
उत्तर लिहिले · 11/10/2020
कर्म · 6750
1
आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो.पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.

पृथ्वी
 
Earth symbol.svg

पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.

पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे २० सेकंद लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती; पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी.

पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही गृहावर जीवसृष्टी नाही.पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकिय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रमुळे सूर्यापासून  येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रवीय क्षेत्राकडे वळतात.
उत्तर लिहिले · 25/11/2020
कर्म · 2910
0

आपण पृथ्वी नावाच्या ग्रहावर राहतो.

पृथ्वी हा सौरमंडळातील आठ ग्रहांपैकी एक आहे आणि या ग्रहावर जीवन शक्य आहे कारण येथे पाणी, हवा आणि जमीन आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

अजय आणि विजय समोरासमोर उभे आहेत. अजयचे तोंड पूर्वेकडे आहे, तर विजयच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे सत्य सांगितल्याबद्दल छळ करण्यात आला?
सूर्य उगवताच पृथ्वीवर प्रकाश पडण्यासाठी किती कालावधी लागतो?
पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे सत्य सांगितल्याबद्दल कोणत्या शास्त्रज्ञाचा छळ करण्यात आला?
पृथ्वीवर किती राज्ये आहेत?
सूर्यानंतर पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता?
सूर्य उगवताच पृथ्वीवर किरणे पडण्यासाठी किती कालावधी लागतो? पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे सत्य सांगितल्याबद्दल कोणत्या शास्त्रज्ञाचा छळ करण्यात आला? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?