शिक्षण इंग्रजी भाषा पुस्तके

इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात चांगले पुस्तक कोणते?

2 उत्तरे
2 answers

इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात चांगले पुस्तक कोणते?

4
इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय कोणता ज्यामुळे आपल्याला कमी वेळेत इंग्रजी शिकता येईल?
इंग्रजी शिकण्यासाठी काही शॉर्टकट आहे असे मला तरी वाटत नाही. माझ्या शैक्षणिक कालखंडात मी आठव्या इयत्तेत ही भाषा अभ्यासायला सुरवात केली अन चार वर्षांनी कॉलेजला गेल्यावर लिहिता वाचता येईल इतकं ज्ञान प्राप्त झालं.

पण स्वतःचे विचार कागदावर मांडण्याचं काय? बाहेरच्या जगात समोर इंग्रजी बोलणारा माणूस आला तर प्रत्येक वेळेला मान खाली नाही घालता येत नाही!

अर्थात याचा अर्थ इंग्रजी शिकायला चार चार वर्षे लागतील असा नाही. परिक्षेपुरता अभ्यास करणं वेगळं आणि भाषेवर प्रभुत्व मिळवणं वेगळं.

पण आपल्याला जर बेसिक इंग्रजी येत असेल तर मात्र सहा महिन्यांच्या आत आपण चांगले इंग्रजी बोलू शकता. लिहिणं ही मात्र एक कला आहे. जर तुम्ही मातृभाषेत तुमचे विचार मांडू शकत असाल, तर इंग्रजीतही ते कठीण नाही.

इंग्रजी पुस्तके, वर्तमानपत्रे वाचणे हे तर ओघाने आलेच. पण यापुढे जाऊन तुम्ही, स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी डमी संभाषणे करू शकता. त्याने तुमचं इंग्रजी (spoken english) नक्कीच वाढेल.

तुम्ही एवढंच करायचं. जाता येता, जेव्हा कधी एकटेच असाल तेव्हा, मनानं एखाद्या दुकानात, हॉटेलमध्ये, तिकीट काउंटरवर, मित्रांच्या मैफिलीत जायचे, समोरच्याचे आणि आपलेही संवाद इंग्रजीत आपणच म्हणायचे. साधारणपणे तीन महिन्यांनी याच गोष्टी प्रत्यक्ष करायच्या.

प्रयत्न करून पहा. मला जमलं, तुम्हालाही जमेल.प्रयत्न मात्र सातत्याने आणि खचून न जाता करायला हवेत!
उत्तर लिहिले · 11/10/2020
कर्म · 6750
0

इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा काही पुस्तकांची माहिती खालीलप्रमाणे:

1. Wren & Martin High School English Grammar and Composition:

हे पुस्तक इंग्रजी व्याकरण (grammar) शिकण्यासाठी खूप उपयुक्त आहे. शालेय तसेच स्पर्धा परीक्षांसाठी याचा उपयोग होतो.

ॲमेझॉन लिंक

2. Word Power Made Easy by Norman Lewis:

या पुस्तकातून इंग्रजी शब्दसंग्रह (vocabulary) सुधारण्यास मदत होते.

ॲमेझॉन लिंक

3. Objective General English by S.P. Bakshi:

विविध स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. यात vocabulary, grammar आणि comprehension चा समावेश आहे.

ॲमेझॉन लिंक

4. English is Easy by Chetananand Singh:

इंग्रजी सहजपणे शिकण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहे.

ॲमेझॉन लिंक

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5220

Related Questions

College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?
प्रभावी वर्गखोली (Class room) व्यवस्थापन?
ग्रंथोपार्जन या संज्ञेची कामे उदाहरणासहित स्पष्ट करा?
ऑन द जॉब ट्रेनिंग आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजे काय?