2 उत्तरे
2
answers
मृत्युपत्र कसे बनवावे?
3
Answer link
आपण सक्षम असतानाच आपल्यानंतर आपण आपल्या आयुष्यात जी काही मालमत्ता विशेषत: अचल मालमत्ता म्हणजे घर, जमीनजुमला इत्यादी कमावली त्याची व्यवस्था कशी असावी याचा निर्णय करणे आवश्यक आहे. असा योग्य निर्णय केल्याने पुढील पिढीचे बरेचसे प्रश्न आपोआप निकाली निघतात.
https://bit.ly/3jhm1bd
*मृत्यूपत्र म्हणजे काय?*
हे एक कायदेशीर दस्तऐवज असते ज्यात एखाद्या व्यक्तिच्या मृत्यू नंतर त्याची/तिची मालमत्ता आणि संपत्ती ज्या व्यक्तिला मिळणार असते त्याचे/त्यांचे नाव असते. जी व्यक्ती हे दस्तऐवज कार्यान्वित करते, ती जीवंत असे पर्यन्त ती हे दस्तऐवज मागे घेऊ शकते, बदलू शकते, किंवा त्याच्या जागी दुसरे निर्माण करू शकते.
मृत्युपत्र हा आपल्या मालमत्तेची व्यवस्था लावण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. आजही आपल्यापैकी अनेकांना मृत्युपत्र करायचे म्हटले की, अनेकानेक प्रश्न सतावायला लागतात. वास्तविक मृत्युपत्र ही अतिशय साधी सोपी गोष्ट आहे, त्यात घाबरून जाण्यासारखे काही नाही.
बऱ्याचदा अशी शंका येते की मृत्युपत्र नक्की लिहायचे कसे? त्याचा ठरावीक मसुदा आहे काय? तर तसे काहीही नाही. मृत्युपत्र ठरावीक साच्यातच लिहिले पाहिजे असे कोणतेही कायदेशीर बंधन नाही. सर्वसामान्य लेखनाच्या नियमांचे पालन करून मृत्युपत्र लिहावे. म्हणजे प्रथमत: ते वाचनीय असायला हवे, दोन- त्यातील मजकूर मृत्युपत्र करणाऱ्याची इच्छा स्पष्टपणे कळेल असा असावा.
मृत्युपत्र म्हटले की, ते साहजिकच कर्त्यांच्या मृत्यूनंतरच उघडण्यात येते. त्यामुळे त्यातील मजकुराबाबत खातरजमा करण्यासाठी त्याचा कर्ता हयात नसतो. म्हणूनच सामान्यत: कोणत्याही मृत्युपत्राला मृत्युपत्रातील मजकूर ठाऊक असणारे किमान दोन साक्षीदार असावेत. जेणेकरून मृत्युपत्राबाबत वाद निर्माण झाल्यास अथवा मृत्युपत्र न्यायालयात सिद्ध करायची वेळ आल्यास, मृत्युपत्रातील मजकूर साक्षिदारांद्वारा सिद्ध करता यावा.
*मृत्यूपत्र कोण बनवू शकतो?*
कुठलीही व्यक्ती जी संतुलित मन:स्थितीत आहे, सज्ञान आहे ती मृत्यूपत्राच्या मदतीने आपली संपत्ती कोणाच्या नावे ठेवून जाऊ शकते. अंध, मूक, किंवा बहिर्या व्यक्तिंना जर त्यांच्या कार्याचे परिणाम आणि कायदेशीर परिणाम समजत असतील तर ते सुद्धा मृत्यूपत्र बनवू शकतात. सामान्यपणे असंतुलित असलेला मनुष्य मृत्यूपत्र बनवू शकतो जेव्हा तो संतुलित स्थितीत असेल. मात्र, जर एखाद्या व्यक्तिला आपण काय करतो आहोत हे कळत नसेल, तर अशा मन:स्थितीत ती व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकत नाही.
*मृत्यूपत्र नोंदणीकृत करणे*
मृत्यूपत्र साध्या कागदावर पण कार्यान्वित केली जाऊ शकते आणि नोंदणी झाली नाही तरी त्याला मूल्य असते, म्हणजे कायद्याप्रमाणे नोंदणी करणे अनिवार्य नाही. पण त्याच्या खरेपणावर कोणी शंका घेऊ नये म्हणून तुम्ही त्याला नोंदणीकृत करू शकता.
जर तुम्हाला तुमचे मृत्यूपत्र नोंदणीकृत करून हवे असेल, तर तुम्हाला साक्षीदारांसह उप-निबंधकाच्या कार्यालयात जावे लागते. त्यासाठी विविध जिल्ह्यात उप-निबंधक असतात आणि संबंधित कार्यालयात चौकशी करून कोण आपल्याला मदत करेल हे शोधावे लागते.
*मृत्यूपत्रांचे प्रकार*
दोन प्रकारचे मृत्यूपत्र असतात: विशेषाधिकार असलेले आणि नसलेले. विशेषाधिकार असलेले मृत्यूपत्र हे मोहिमेवर किंवा प्रत्यक्ष युद्धात असलेले सैनिक किंवा वैमानिक किंवा खलाशी ह्यांचे अनौपचारिक मृत्यूपत्र असते. इतर सर्व मृत्यूपत्र ह्यांना विशेषाधिकार नसलेले मृत्यूपत्र म्हणतात. पहिल्या प्रकारचे मृत्यूपत्र तोंडी किंवा लिखित असू शकते आणि आपले आयुष्य धोक्यात टाकणार्या व्यक्ती हे शेवटच्या क्षणी बनवितात, दुसर्या प्रकारच्या मृत्यूपत्रासाठी सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात.
*मृत्यूपत्र करणार्याची सही*
विशेषाधिकार नसलेल्या मृत्युपत्रासाठी मृत्यूपत्र करणार्या व्यक्तिची सही किंवा शिक्का असणे अनिवार्य असते. काही परिस्थितीत जर मृत्यूपत्र करणार्या व्यक्तिला शारीरिक रित्या शक्य नसेल तर त्याच्या उपस्थितीत दुसर्या व्यक्तिला सही करता येते. काही राज्यांमध्ये मृत्यूपत्र करणार्या व्यक्तिशिवाय इतरांना त्यावर सही करता येते, मात्र हे मृत्यूपत्र करणार्याच्या निर्देशावर आणि संमतीने असावे. पण, भविष्यात काही वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र करणार्यानी सही करणे योग्य असते. विशेषाधिकार नसलेल्या मृत्युपत्रावर कमीत कमी दोन साक्षीदारांची सही लागते ज्यांनी प्रत्यक्ष मृत्यूपत्र करणार्याला मृत्युपत्रावर सही करताना बघितले आहे. साक्षीदाराने इतर साक्षीदाराच्या उपस्थितीत सही करणे आवश्यक नाही.
*मृत्यूपत्र सुरक्षित ठेवणे*
भारतीय नोंदणी कायदा १९०८ अंतर्गत मृत्यूपत्र सुरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. मृत्यूपत्र असलेले सील बंद पाकीट, त्यावर मृत्यूपत्र करणार्याचे नाव किंवा त्याच्या एजेंटचे नाव लिहून कुठल्याही निबंधकाकडे सुरक्षित ठेवण्यासाठी देता येते.
*साक्षीदाराची कायदेशीर मान्यता*
मृत्यूपत्र वैध मानल्या जाण्यासाठी, मृत्युपत्रातील लाभार्थी साक्षीदार असू शकत नाही.
*मृत्यूपत्र रद्द करणे*
स्वेच्छेने किंवा इतर परिस्थितीत मृत्यूपत्र रद्द करता येते. कायदेशीर रित्या गरज असल्यास मृत्यूपत्र रद्द करता येते. जर मृत्यूपत्र लिहिणार्या व्यक्तिचे लग्न झाले तर ते मृत्यूपत्र आपोआप रद्द होते. लिहिणार्याचे फक्त पहिलेच नाही तर नंतर होणार्या कुठल्याही लग्नानंतर मृत्यूपत्र रद्द होते. आपण हव्या तितक्या वेळा मृत्यूपत्र बनवू शकतो पण मृत्यूपूर्वी केलेले शेवटचे मृत्यूपत्र अंमलात आणले जाते.
आजही अनेकांचा असा गैरसमज आहे की, मृत्युपत्र केले की सर्व मालमत्ता आपल्या इच्छेप्रमाणे आपोआप हस्तांतरित होते. मात्र असे नसते. मृत्युपत्रातील लाभार्थी अथवा प्रशासक यांस सक्षम न्यायालयात जाऊन न्यायालयामार्फत मृत्युपत्राची अंमलबजावणी करून घ्यावी लागते, त्याशिवाय मालमत्तेचे अभिलेखात लाभार्थ्यांच्या नावाची नोंद केली जात नाही.
वरील सर्व विवेचनावरून आपल्या असे लक्षात येईल की, मृत्युपत्र करणे ही एक अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येकाने सर्व कायदेशीर बाबी ध्यानात ठेवून किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन या सोयीचा लाभ अवश्य घ्यावा.

0
Answer link
मृत्युपत्र (Will) बनवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
१. कायदेशीर सल्ला: मृत्युपत्र बनवण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
२. आवश्यक माहिती:
- तुमचे पूर्ण नाव, पत्ता आणि ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी).
- तुमच्या मालमत्तेची (property) संपूर्ण माहिती (जसे की जमीन, घर, बँक खाती, शेअर्स,FD).
- ज्या व्यक्तींना तुम्ही तुमची मालमत्ता वाटू इच्छिता त्यांची नावे आणि पत्ते.
- एका साक्षीदाराची (witness) आवश्यकता असते.
३. मृत्युपत्राचा मसुदा (Draft):
- मृत्युपत्र लेखी स्वरूपात असावे.
- तुमच्या मालमत्तेचे विभाजन स्पष्टपणे नमूद करा. कोणाला काय मिळणार आहे ते स्पष्ट लिहा.
- मृत्युपत्र वाचायला सोपे असावे.
४. साक्षीदार (Witness):
- मृत्युपत्रावर दोन साक्षीदारांची सही (signature) आवश्यक आहे.
- साक्षीदार तुमच्यासमोर सही करतील आणि त्यांनी तुमच्या सहीची खात्री करावी.
- साक्षीदार निष्पक्ष असावेत, म्हणजे ते तुमच्या मालमत्तेचे लाभार्थी नसावेत.
५. नोंदणी (Registration): मृत्युपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नाही, पण नोंदणी केल्यास ते अधिक सुरक्षित राहते.
६. वेळोवेळी सुधारणा: तुमच्या परिस्थितीत बदल झाल्यास (उदाहरणार्थ, मालमत्तेत वाढ किंवा घट झाल्यास) मृत्युपत्रामध्ये बदल करणे आवश्यक आहे.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शक आहे. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलाची मदत घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे: