3 उत्तरे
3
answers
बहिर्जी नाईक बाबतीत माहिती सांगा?
5
Answer link
*बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण*
१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!
तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!
शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!
माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!
मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!
खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!
आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!
गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!
पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!
महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!
काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणस असतील ती…!
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ …?
काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!
हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते….!
!! जय जिजाऊ , जय शिवराय ,जय शंभुराजे !!

1
Answer link
मूळ बहुरूपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचे चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत, यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वाऱ्यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहीत असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असे म्हटले जाते की, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करून आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच, अशी सर्वांची समजूत असायची.
बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहीत होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फक्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत.
शिवाजी राजे व संभाजी जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपऱ्यांत लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले.
0
Answer link
बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक शूर आणि महत्त्वाचे गुप्तहेर होते.
त्यांच्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:
- जन्म आणि पार्श्वभूमी: बहिर्जी नाईक यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. ते महाराष्ट्रातील होते.
- शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती: ते लहानपणापासूनच धाडसी आणि चपळ होते. त्यामुळे ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती झाले.
- गुप्तहेर म्हणून कामगिरी:
बहिर्जी नाईक यांनी शिवाजी महाराजांसाठी गुप्तहेराचे काम केले. त्यांनी शत्रूंबद्दल माहिती काढण्याचे महत्त्वाचे काम केले.
ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेशांतर करून शत्रूंमध्ये मिसळत असत आणि त्यांच्या योजनांची माहिती काढत असत.
- महत्त्वाच्या मोहिमा: त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये भाग घेतला आणि त्या यशस्वी केल्या. उदाहरणार्थ, सुरत शहरावर छापा घालण्यापूर्वी त्यांनी तेथील माहिती काढली होती.
- योगदान: बहिर्जी नाईक यांच्यामुळे शिवाजी महाराजांना शत्रूंवर विजय मिळवणे सोपे झाले. त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत खूप मदत केली.
बहिर्जी नाईक हे एक निडर आणि विश्वासू गुप्तहेर होते आणि त्यामुळेच ते इतिहासात अजरामर झाले आहेत.