कायदा परवाना आणि ओळखपत्रे कागदपत्रे शस्त्र परवाना

मला पिस्तूल लायसन्स काढायची आहे, त्याबद्दल माहिती हवी आहे?

2 उत्तरे
2 answers

मला पिस्तूल लायसन्स काढायची आहे, त्याबद्दल माहिती हवी आहे?

3
भारतात आर्म्स ऍक्ट १९५९ अन्वये भारतीय नागरिकाला स्वतःच्या संरक्षणासाठी केवळ विनाप्रतीबंधित शस्त्रे (NPB) वापरण्याचेच लायसन मिळू शकते. विनाप्रतिबंधित शस्त्रे (NPB) देण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि गृह विभागाकडे असतात, तर प्रतिबंधित शस्त्रे (PB) देण्याचे अधिकार केवळ केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असतात. भारतात आठ इंचापेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विकण्यास बंदी आहे, तशी शस्त्रे बेकायदा मानली जातात. तसेच भारतात केवळ देशी बनावटीचीच शस्त्रे वापरता येतात.

शस्त्र परवान्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
शस्त्र परवान्यासाठी आपल्याला आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आपले पासपोर्ट साईज फोटो, आपले मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न याची पूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच आपण कोणती गन घेणार आहोत त्याचीही माहिती द्यावी लागते.

याशिवाय आपल्या भागातील दोन चांगल्या व्यक्तीकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि आपण ज्या कारणासाठी शस्त्र बाळगू इच्छिता त्याचे समर्पक कारण द्यावे लागते. तसेच हे शस्त्र बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पटवून द्यावे लागते.

केवळ ही शस्त्रे वापरण्याची मिळते परवानगी

भारत सरकारच्या नियमांनुसार आपल्या देशात केवळ तीन प्रकारच्या शस्त्रांसाठी आपण अर्ज करु शकता. म्हणजेच भारतात तीन प्रकारची शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना मिळतो. भारतात शॉटगन, हॅन्डगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारच्या गन्सला परवाना मिळतो. एक भारतीय व्यक्ती वरीलपैकी कुठल्याही जास्तीत जास्त तिचं गन भारतात वापरु शकतो.

कसा निघतो शस्त्र परवाना ?

१) फॉर्म A – शस्त्र परवाण्यासाठी फॉर्म A भरुन त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परवाना कार्यालयात सादर करावा. २) आवश्यक तपासणी – शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का ते तपासले जाते.

पत्त्याची पडताळणी केली जाते आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अर्जदाराची मुलाखतही घेतली जाते. मुलाखतीत अर्जदाराला बंदूक का ठेवायची आहे असा प्रश्न विचारला जातो. बहुतेक अर्जदार स्वसंरक्षणाचे कारण सांगतात.

३) मुलाखती नंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठवला जातो. जर या दोन्ही ठिकाणाहून कोणताही आक्षेप आला नाही आणि पोलिस अधिकारी देखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.

४) फी – पिस्तुल, रिव्हॉल्व्हर्स आणि रिपीट रायफल्सचे परवाना शुल्क १०० रुपये असून त्यांचे नूतनीकरण शुल्क ५० रुपये आहे. २२ बोअर रायफल परवान्यासाठी फी ४० रुपये आणि नूतनीकरण फी २० रुपये आहे. एमएल गन, एअर गनचे शुल्क १० रुपये आणि नूतनीकरण शुल्क ५ रुपये आहे.
उत्तर लिहिले · 13/9/2020
कर्म · 3835
0
पिस्तूल लायसन्स (परवाना) मिळवण्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी पूर्ण कराव्या लागतात. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

पिस्तूल लायसन्स (परवाना) काढण्याची प्रक्रिया:

  1. अर्ज करण्याची पात्रता:

    • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
    • वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे.
    • अर्जदारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल नसावा.
    • अर्जदाराचे मानसिक आरोग्य ठीक असावे.
  2. आवश्यक कागदपत्रे:

    • ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड)
    • पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, वीज बिल, पाणी बिल)
    • जन्मतारखेचा दाखला (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला)
    • शैक्षणिक पात्रतेचा दाखला
    • चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate)
    • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
    • वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate)
    • शपथपत्र (Affidavit)
  3. अर्ज करण्याची प्रक्रिया:

    • तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या पोलीस आयुक्तालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल.

    • अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.

    • अर्ज सादर केल्यानंतर, पोलीस तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.

    • पडताळणीत, तुमच्या चारित्र्याची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली जाते.

    • आवश्यक असल्यास, तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

  4. लायसन्स मिळण्याची प्रक्रिया:

    • अर्जदाराची पार्श्वभूमी तपासल्यानंतर, पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) किंवा संबंधित अधिकारी तुमच्या अर्जावर निर्णय घेतात.

    • लायसन्स मंजूर झाल्यास, तुम्हाला ते घेण्यासाठी काही शुल्क भरावे लागेल.

इतर माहिती:

  • लायसन्सची वैधता काही वर्षांसाठी असते, त्यानंतर त्याचे नूतनीकरण (Renew) करावे लागते.

  • तुम्ही कोणत्या कारणांसाठी पिस्तूल वापरणार आहात, हे अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.

  • आत्मরক্ষणासाठी किंवा मालमत्तेच्या संरक्षणासाठी पिस्तूलची गरज आहे हे सिद्ध करावे लागते.

हे सर्व नियम आणि प्रक्रिया वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नवीनतम माहिती मिळवणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

1969 पासून वारस नोंद नाही, वहीवाट नाही, आज तिसऱ्या पिढीस जमीन मिळेल का?
गहाण खत म्हणजे काय?
Sale deed म्हणजे काय?
इच्छापत्र म्हणजे काय?
दस्तऐवजांची नोंदणी - कलम १७, १८ भारतीय नोंदणी कायदा?
विश्वस्तपत्र म्हणजे काय?
खरेदी प्रमाणे माझी जागा १५ फूट पूर्व पश्चिम २८ फूट आहे, तरी मला माझी जागा पूर्णपणे मिळू शकते का?