भारत सामान्य ज्ञान विमान इतिहास

भारतातील पहिले विमानतळ कोणते?

2 उत्तरे
2 answers

भारतातील पहिले विमानतळ कोणते?

3
      आपल्या पैकी बऱ्याच जणांनी विमानप्रवास ✈️ केला असेल विमानतळावर पण वाट बघत वेळ घालवला असेल तर काही जणांची ही बकेट लिस्ट📝 असेल काहींच स्वप्न असेल की एकदा तरी आयुष्यात आपण विमानप्रवास करावा, आपण पण विमानतळ बघावं. हे भले मोठे रणवेज त्यावर उभे असलेले प्रशस्थ विमाने बघणे याचा एकदा तरी आयुष्यात लाभ घ्यावा😍, पण कधी याचा विचार केला आहे का की याची सुरवात कशी झाली असेल? 🤔

     भारतामध्ये पाहिले नागरी विमान वाहतूक करणारे विमानतळ 🛣️  हे १९२८ मध्ये सुरु झाले त्याला आज जुहू ऐरोड्रोम (Juhu Aerodrome) म्हणतात. हे मुबंई मध्ये नानावती हॉस्पिटलच्या🏥 थोडे पुढे स्थित आहे. जेव्हा हे विमानतळ सुरू झाले होते तेव्हा त्याला विले पार्ले फ्लायिंग क्लब नावाने ओळखले जात होते.




​     याच विमानतळावरून १५ ऑक्टोबर १९३२ साली पहिली फ्लाईट झाली ज्याचे व्यवस्थापन टाटा एव्हीएशन सर्विस (Tata Aviation Service ) यांनी केली होते आणि तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की याचे पायलट होते खुद्द भारतरत्न जे. आर. डी. टाटा सर. कराची ते जुहू ऐरोड्रोम अशी ती फ्लाईट होती. अशाप्रकारे ही भारतातील पहिली फ्लाईट ठरली. ✈️

      या विमानतळाच अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळामध्ये शहराचे मुख्य विमानतळ म्हणून महत्वाची भूमिका बजावली. जुहू ऐरोड्रोम हे २६ वर्ष शहरातील एकमेव🥇 विमानतळ होते. या विमानतळावर दोन रणवे आहे आजही इथे हेलिकॉप्टर उड्डाणे, फ्लाईग क्लब, सादरीकरण,सिनेमाचं चित्रीकरण होत राहतात
✈️🛩️🛫🚁🎥🎞️📽️




इमेज आणि माहिती संदर्भ ~ गुगल, विकिपीडिया.
उत्तर लिहिले · 3/9/2020
कर्म · 7975
0

भारतातील पहिले विमानतळ जुहू एरोड्रोम (Juhu Aerodrome) आहे, जे 1928 मध्ये सुरू झाले.

हे मुंबई शहरात आहे.

सुरुवातीला ते फक्त खाजगी विमानं आणि विमानांसाठी वापरले जात होते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2820

Related Questions

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड किती वेळेस आणि कुणी जाळला?
अरुण गवळीला डॅडी हे नाव कसे पडले?
महात्मा फुले माहिती?
Hadappa Sanskriti Harappa Sanskriti konatya Kala til hoti?
हडप्पा संस्कृती कोणत्या काळातील होती?
गरीब निवाजी नंदा संस्था कोण होती?
तोरणा किल्ल्याची उंची किती आहे?