घर बांधकाम रिअल इस्टेट घराची किंमत

4 लाख रुपयांमध्ये किती रूमचे घर होईल?

5 उत्तरे
5 answers

4 लाख रुपयांमध्ये किती रूमचे घर होईल?

5
स्वतःची जागा असेल तर 4 लाखात दोन रूम किचन टॉयलेट बाथरूम सह होऊ शकते फक्त स्लॅब न टाकता वर पत्रे टाकावे.
आणि
प्लास्टर आतून डबल हात बाहेरून सिंगल हात असे करून 4 लाखात होईल.
त्यासाठी तुम्ही कोणत्याही इंजिनियर न लावता एखाद्या खाजगी अनुभवी गवंडी ला घेऊन त्याला जागा दाखवून द्या तो तुम्हाला तेवढ्या जागेत तीन रूम कडून देईल कोणत्याही इंजिनियर च्या भानगडीत पडू नका.

आणि राहिला प्रश्न  वीट , खडी , सिमेंट , रेती ,

हा सगळा माल तुम्ही स्वतः कमीत कमी भावात कसा भेटेल याचे नियोजन करावे
मग नक्कीच 4 लाखात तीन रुमचे घर होईल

राहिला प्रश्न

दार , खिडक्या , फरशी , इलेक्ट्रिक फिटिंग हे

याचा खर्च वेगळा लागेल


तुम्ही जर मेट्रो सिटीत राहत असाल तर उत्तरा कडे दुर्लक्ष करा.

उत्तर लिहिले · 1/9/2020
कर्म · 16700
2
स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.... निवारा ही माणसाच्या तीन मूलभूत गरजांपैकी एक महत्वाची गरज आहे.... आणि तुमचं पण घराचं स्वप्न नक्की पूर्ण होईल....☺️

तुमची स्वतःची जागा असेल तर चार लाखात कमीत कमी एक रूम, किचन आणि टॉयलेट बाथरूम तरी नक्की बांधता येईल. तुमचं घर सिनेमात बघतो तसं भव्यदिव्य नाही होणार पण तुमच्या कडे असलेल्या भांडवलात तुम्हाला राहण्यासाठी छोटेखानी छानसं घर बांधून होईल....

घर बांधकामासाठी तुम्हाला जास्त किमतीचे सामान नाही वापरता येणार... घरावर स्लॅब नसून पत्रे असतील कदाचित.... पण तुमचं स्वतःच हक्काचं घर नक्कीच होईल चार लाख रुपयात....☺️

मी असा सल्ला देईल की तुम्ही कुठल्या मोठ्या इंजिनिअर कडे न जाता एखाद्या छोट्या गरजू बांधकाम करणाऱ्या आणि कामाची नितांत गरज असलेल्या गुत्तेदाराकडे जा....

तुमचं स्वप्नांतलं घर नक्कीच पूर्ण होईल....☺️👍👍

उत्तर लिहिले · 1/9/2020
कर्म · 7815
0
४ लाख रुपयांमध्ये किती रूमचे घर होईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत: * जागेची किंमत: जागेची किंमत खूप महत्त्वाची ठरते. शहरांमध्ये जागेची किंमत जास्त असल्याने कमी रूम मिळतील, तर ग्रामीण भागात जास्त रूम मिळू शकतात. * बांधकामाचा प्रकार: साधे बांधकाम असेल तर जास्त रूम मिळतील, तर आधुनिक बांधकाम असल्यास रूमची संख्या कमी होऊ शकते. * बांधकाम साहित्य: बांधकाम साहित्याच्या किमतीवर रूमची संख्या अवलंबून असते. * मजुरांची किंमत: मजुरांची किंमत देखील बांधकाम खर्चावर परिणाम करते. सर्वसाधारणपणे, ४ लाख रुपयांमध्ये १ ते २ रूमचे साधे घर बांधता येऊ शकते. अधिक माहितीसाठी, बांधकाम क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5060

Related Questions

मला आमच्या गावी दीड गुंठा जागेत 1BHK घर बांधायचे आहे, तर मला किती खर्च येईल?
घर बांधण्यासाठी किती खर्च येतो किंवा एका रूमसाठी किती खर्च येतो?
800 चौरस फूट जागेवर मला घर बांधण्यासाठी किती खर्च येईल?
300 चौ.फूट लोड बेअरिंग मध्ये मला घर बांधण्यासाठी किती खर्च येईल?