व्यायाम क्रीडा व्यक्तिमत्व खेळाडू कुस्ती

पैलवान सादिक पंजाबी बद्दल माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

पैलवान सादिक पंजाबी बद्दल माहिती सांगा?

6
दि २२ जुलै, २०२० सकाळीच बातमी आली की, पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी यांचे निधन झाले. माहिती सेवा ग्रूप च्या अनेक वाचकानी त्याच्याबददल काही लिहावे असे सांगितले. म्हणुन त्यांचेबददल हे चार शब्द... मारुती माने यांच्याशी 1972 साली खासबाग ला शेवटची कुस्ती ते पराभूत झाले व टाकटोक पाकिस्तान ला परतले. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी भारतात येणे जमले नाही.भारतातून पाकिस्तानला परतल्यावर लाहोरमध्ये त्यांनी कुस्तीचा अध्याय सुरू ठेवला. पैलवान गोगा विरुद्ध त्यांची खासबाग मैदानातील लढत एक तास सात मिनिटे चालली. भलेही लढतीत गोगा जिंकले असले तरी टाळ्यांचे मानकरी सादिक पंजाबी ठरले‌.सादिक पंजाबी यांचे वडील निका पंजाबी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत कोल्हापुरात कुस्ती लढतींसाठी येत होते. तालमीत डावपेचांचे प्रशिक्षणही घेत होते. मुलगा सादिक यांनाही त्यांनी कुस्तीची गोडी लावली. सादिक पंजाबी यांनी इथल्या तालमीत अंग झिजवून कुस्तीचे डावपेच आत्मसात केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज  यांच्याविषयी त्यांच्या मनात आदर होता. कोल्हापुरात कुस्तीला मिळालेल्या राजाश्रयाचे त्यांना कौतुक होते. त्यांच्या खासबाग मैदानातील लढती मात्र जुन्या पिढीच्या स्मरणात राहिल्या.आपण वाचत आहात माहिती सेवाग्रूप पेठवडगांवची पोस्ट,तालमीतून कुस्ती मेहनत करुन मलमली तीन बटनी कुर्ता व सफेद लुंगी लावून,लाल भडक कोल्हापुरी चप्पल करकर वाजवत ज्यावेळी सादिक कोल्हापूर च्या रस्त्यावरून चालायचा त्यावेळी साऱ्यांच्या नजरा त्या देखण्या bवल्लाकडे पडायच्या.पंढऱ्याशुभ्र शिंपल्यात जसा मोती चमकावा तसा सादिक ,धिप्पाड शरीर मात्र नजरेने कधी भुई सोडली नाही.एखादा ओळखीचा माणूस समोर नमस्कार घालायचा त्यावेळी किंचित हसत हात छातीजवळ नेऊन नमस्कार स्विकारत पुढे जायचा.जसा देहाने स्वच्छ होता तसाच चारित्र्याने.जशी नित्यनियमित कुस्ती मेहनत करत असे तसेच नित्यनियमित नमाज पठण करणे ही सादिक ची दिनचर्या होती. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्याविरुद्ध त्यांची लढत बरोबरीत सुटली. पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या विरुद्ध ते दोन वेळा लढले. पहिल्या लढतीत बरोबरी साधल्यानंतर दुसऱ्या लढतीत त्यांनी खंचनाळे यांचा पराभव केला. हिंदकेसरी मारूती माने यांच्याविरुद्ध त्यांचे डावपेच कमी पडले. शाहूपुरी तालमीतील पैलवान श्रीरंग जाधव व महान भारत केसरी दादू चौगले यांच्याविरुद्ध निभाव लागला नसला तरी केशव भेडगावकर व शिवा आळनावर यांना त्यांनी अस्मान दाखवले. उत्तर भारतातही त्यांच्या अनेक लढती झाल्या. मात्र, त्यांची गाजलेली कुस्ती राहिली ती १९६१ला झालेली गोगाविरुद्धची. गोगासारख्या ताकदवान पैलवानाविरुद्ध त्यांनी तब्बल एक तास सात मिनिटे झुंज दिली. या लढतीत अखेर गोगा विजयी झाले असले तरी कुस्ती प्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात सादिक यांचे कौतुक केले. मास्टर चंदगीराम यांच्याविरुद्ध १९६९ ला त्यांनी दंड थोपटले.चंदगीराम त्यांच्यावर भारी पडले.
अशा या कोल्हापुरच्या मातीशी नाळ जोडलेल्या मल्लास माहिती सेवा ग्रूप तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली.
अनिल पाटील पेठवडगांव कोल्हापुर. 9890875498
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_651.html



0

पैलवान सादिक पंजाबी:

सादिक पंजाबी एक भारतीय कुस्तीपटू आहे. ते प्रामुख्याने त्यांच्या ताकदीसाठी आणि कुस्तीतील आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

  • ठळक वैशिष्ट्ये:
    • शैली: आक्रमक कुस्ती
    • सहभाग: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे आणि ते भारतातील लोकप्रिय कुस्तीपटूंपैकी एक आहेत.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1420

Related Questions

कुस्तीसाठी खाशाबांचे शरीर बळकट होण्याची कारणे काय होती?
वडा​ पाला कोणत्या वयोगटाशी निगडित आहे?
2022 च्या कुस्ती महाराष्ट्र केसरी कोण ठरला?
महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोठे आहे?
२०२२ चा कुस्तीतील महाराष्ट्र केसरी कोण आहे?
2022 चा कुस्तीतील महाराष्ट्र केसरी कोण ठरला?
कुस्तीसाठी पूरक कोणत्या पकडी आहेत, ज्यांची निर्मिती उत्तर पेशवाईत बाळंभट देवधर यांनी केली?