2 उत्तरे
2 answers

चिन्हांचा अर्थ काय होतो?

3
तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की या लेखात सापडेल

वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.

मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थाॅमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाददुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही.

विरामचिन्हे संपादन करा
पूर्णविराम ( . ) (Full Stop) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा० अ) मी मराठी बोलतो. ब) हे चिन्ह संक्षिप्त रूपाशेवटीही वापरतात. उदा० वि.स. खांडेकर यात विष्णूऐवजी वि. आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह काढले आहे.
स्वल्पविराम ( , ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदा० अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट व काकडी आहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
अपूर्णविराम (:) (इंग्रजीत Colon) : जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात. उदा० मुरव्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.
अर्धविराम ( ; ) (इंग्रजीत Semi Colon) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते० उदा० १. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. २. इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.
उद्गारचिन्ह ( ! ) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा! किती सुंदर फुले आहेत. अभिनंदन! अशीच प्रगती करा. अनेकदा एकापाठॊपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.
प्रश्नचिन्ह ( ? ) : एखद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
एकेरी अवतरणचिन्ह(‘…’) : एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी दोन उलट-सुलट एकेरी अवतरणचिन्हे वापरतात. जसे — मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात. उच्चारलेला शब्द मुळाबरहुकूम-जशाच्या तसा लिहून दाखवायचा असेल तर त्या शब्दाआधी व नंतर एकेरी अवतरणचिन्हे असतात. ही चिन्हे उलट-सुलट स्वल्पविरामांसाखी दिसतात.
दुहेरी अवतरण चिन्ह(“…”) : बॊललेले वाक्या मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी विराम चिन्ह' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे"असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
संयोग चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पति-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.
'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते.
उदा० १). ४-५ (चार ते पाच/चार किंवा पाच). २). १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.
तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा० दिनांक ७-५-२०२० रोजी.
अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात.) हे (– )एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी वापरतात. उदा० सुमेध आज एक चित्र काढणार होता. पण –– ?
शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ०.
जुन्या काळी संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कॊल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, अप्पासाहेबसाठी अप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.
'किंवा' या शब्दाऐवजी (/) वापरतात. उदा० प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.
विराम चिन्हांखेरीज छापलेल्या मजकुरात काही 'छपाई' चिन्हे आढळतात; त्यांपैकी काही चिन्हे ही :

'एकेरी खंजीर' नावाचे चिन्ह (†) मजकुरातल्या एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण जेव्हा पानाच्या तळाशी देतात, तेव्हा त्या शब्दालागून वापरतात. याच कारणासाठी दुहेरी खंजीर (‡), तारा (*), (¶ - पिलक्रो=परिच्छेद चिन्ह) यांचाही उपयोग करतात.
वगैरे, वगैरे.


विरामचिन्हांची उपयुक्तता दाखवणारी मराठी उदाहरणे संपादन करा
खालील गोष्ट प्र.के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.

एकदा ना.सी. फडके अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन."
त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले,
"मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या."
ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे :
"अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'

उत्तर लिहिले · 19/7/2020
कर्म · 14865
0

चिन्हांचा अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो. विविध क्षेत्रांमध्ये विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी चिन्हे वापरली जातात.

काही सामान्य चिन्हे आणि त्यांचे अर्थ:
  • गणित: +, -, *, / (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार)
  • रस्ते सुरक्षा:speed breakers ,right turn, left turn ,no parking etc.(गतीरोधक, उजवीकडे वळा, डावीकडे वळा, पार्किंग नाही)
  • संगणक: @, #, $, %, ^, &, * (ॲट, हॅश, डॉलर, शेकडा, कॅरेट, अँड, ॲस्टरिस्क)

चिन्हांचा अर्थ समजून घेण्यासाठी, ते कोणत्या संदर्भात वापरले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2540

Related Questions

स्वतः: दु:ख आणि फायदा न पाहता केलेले काम म्हणजे काय?
नाम नसलेला पर्याय क्रमांक शोधा: स्वतः, दुःख, फायदा, नाव, दुसरा, प्रश्न, मोठेपणा, आई, पण, शहाणा, वाहन?
प्रयत्न घट्ट त्याची एकमेव दुसरा प्रश्न विशेष काळजी पडतो सर्व तिसरा प्रश्न एक दुसरा पांढरा मार्ग चौथा प्रश्न मिळाला हवा केले देईल?
आशा टीपा लिहा?
माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?
सामाजिक परिपक्वता कशी निर्माण करावी?
हजरजबाबीपणा नसल्यामुळे दुसऱ्यांसमोर कमजोर ठरतो का?