2 उत्तरे
2
answers
जवळा-अहमदनगर यात्रेचे वैशिष्ट्य काय?
2
Answer link
पावसासाठी अनेक ठिकाणी होमहवन केले जातात. होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़
पण जामखेड तालुक्यातील जवळा येथे नर्तिकांच्या पायातील घुंगरांचा आवाज झाला की हमखास पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे़ म्हणूनच गावात आषाढी एकादशीला नर्तिका पायात घुंगरु चढवतात़
जामखेड तालुक्यातील जवळा येथे आषाढी एकादशी निमित्त रथयात्रा असते. जवळेश्वर रथ तब्बल १०० वर्षांपासूनचा असून, राज्यातील सर्वांत जुना रथ म्हणून याकडे पाहिले जाते. हा रथ भव्य असून, रथ वळविण्यासाठी स्टेअरिंग नसलेला हा एकमेव रथ आहे. वळणाच्या रस्त्यावर रथास मागे पुढे करूनच वळवावे लागते. जवळेश्वर यात्रेमध्ये नृत्यांगना मोठ्या प्रमाणात नृत्य करण्यासाठी येतात. गावातील प्रत्येक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या नर्तिकांच्या पायातील घुंगरु वाजल्यानंतर पाऊस पडतो, अशी आख्यायिका आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे़ मात्र, जवळा येथे अद्याप पाऊस नाही़ दरवर्षी आषाढी एकादशीनंतर जवळा येथे मोठा पाऊस होतो़ आषाढी एकादशीनिमित्त गावात आलेल्या नर्तिकांच्या घुंगरांच्या आवाजामुळेच पाऊस पडतो, अशी येथील पिढीजात धारणा आहे़ त्यामुळे या यात्रेला मोठे महत्व असते़♍
ही रथयात्रा १९ जुलैपर्यंत चालणार आहे. ही रथयात्रा आषाढ शुद्ध एकादशी ते गुरुपौर्णिमा असे ५ दिवस चालते. आषाढी एकादशीच्या दिवशी जवळ्याचे ग्रामदैवत जवळेश्वराची आरती करून रथयात्रेस प्रारंभ होतो. गावातील एकूण १० मंडळांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम रात्रभर चालतो. नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळा पंचक्रोशीतील हजारो लोक येतात. पहिल्या दिवशी सर्व मंडळांच्या नर्तिका जवळेश्वर मंदिरात येऊन जवळेश्वराची आरती करतात. यात्रेमध्ये विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी असते. शेवटच्या दिवशी म्हणजे ५ व्या दिवशी जवळेश्वराच्या मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. दुपारी जवळेश्वराची आरती करून मुख्य रस्त्याने मिरवणूक निघते. रथासमोर नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम असतो. रथास मोठमोठे दोर लावून ओढले जाते. रथ ओढण्यास ५० ते ६० लोक लागतात. रथाला नारळाचे तोरण अर्पण करतात. जवळजवळ ३०,४० हजार नारळांचे तोरण रथात असते.
*🔹१०० वर्षांचा रथ*
राज्यातील सर्वांत मोठा साधारण १०० वर्षांपूर्वीचा हा रथ आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला येदू सुरवसे या सुताराने तो तयार केला आहे. त्यामुळे रथात बसण्याचा मान सुरवसे परिवाराला आहे. अजून रथाची कसलीही मोडतोड झालेली नाही. दरवर्षी रथास तेल लावून मगच त्यात मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते.♍
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_289.html

0
Answer link
जवळा-अहमदनगर यात्रा ही अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते.
या यात्रेची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- श्री क्षेत्रContext jhavala: जवळा हे गाव श्री क्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे Renuka mata रेणुका मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे.
- Renuka mata रेणुका मातेची पूजा: या यात्रेत Renuka mata रेणुका मातेची विशेष पूजा केली जाते.
- पालखी सोहळा: या यात्रेतील महत्वाचा भाग म्हणजे पालखी सोहळा. Renuka mata रेणुका मातेची पालखीStandard Chartered bank जवळा गावातून अहमदनगरला जाते.
- भाविकांची गर्दी: या यात्रेला महाराष्ट्रभरStandard Chartered bankून Renuka mata रेणुका मातेच्या भक्तांची मोठी गर्दी होते.
- विविध कार्यक्रम: यात्रेत Renuka mata रेणुका मातेच्या पूजेसोबतStandard Chartered bank विविध सांस्कृतिक कार्यक्रमStandard Chartered bankे आयोजित केले जातात.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: