सरकारी योजना शिधापत्रिका

शिधा पत्रिका माहिती ?



​📌 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) संदर्भात माहिती*
---------------------------------------
🏉 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी अर्ज*
परिमंडळ कार्यालय, अ विभाग, संततुकाराम व्यापारी संकुल, दुसरा मजला, निगडी, पुणे – ४११ ०४४ व महानगरपालिका क्षेत्रातील ठराविक महा ई-सेवा केंद्रात अर्ज मिळतील. या केंद्राची यादी मनपाचे https://www.pcmcindia.gov.in/marathi/ > General info > maha e seva centers


रेशनकार्ड(शिधापत्रिका)साठी संकेतस्थळ

👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

🏉 *नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे*
१. अर्ज कुटुंबातील ज्येष्ट स्त्री हिचा कुटुंबप्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज
२.अर्जदार कुटुंब प्रमुख स्त्रिचे २ फोटो, त्यावर अर्जदाराची सही करुन जोडावे
३.अर्जासोबत बँक जॉईंट अकाऊंट (पती व पत्नीचे नावे) काढलेबाबतचे बँक पासबुकची प्रत
४.आधार कार्डची प्रत अथवा आधार कार्ड नोंदणी केलेबाबतची पावतीची साक्षांकित छायांकित प्रत
५.नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या ठिकाणचा शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे, नसेलतर मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा नाव नसलेबाबतचा दाखला
६.राहत्या जागेचा पुरावा म्हणून स्वत:चे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षाचे मिळकत कर पावती, तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व त्यांचे नावे विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती

🏉 *दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे*
१.रेशन कार्ड (शिधापत्रिका) हरविले असल्यास कार्ड हरविलेबाबत पोलिसांचा दाखला
२.दुकानदारांकडील रेशन कार्ड (शिधापत्रिका) चालू असल्याबाबत सही व शिक्का दाखला
३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) जीर्ण झाली असल्यास मूळ कार्ड व दुकानदाराचा सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
४.जीर्ण कार्डवरील अक्षर पुसट असेलतर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र करणे आवश्यक आहे
५.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा

🏉 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) मध्ये युनिट वाढ करणेसाठी*
१.लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी मुलांचे जन्म दाखले, शाळेतील बोनाफाईड दाखल्याची सांक्षाकित प्रत
२.पत्नीचे नाव वाढविण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला दाखल व लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
३.मोठ्या व्यक्तींचे नाव वाढविण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा दाखला

🏉 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील युनिट कमी करणेसाठी*
१.मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा भरलेला अर्ज
२.मयत असल्यास मयत दाखला
३.परगावी जात असल्यास मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज
४.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा.

🏉 *रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्याचा कालावधी*
१.नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी – १ महिना
२.दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी – ८ दिवस
३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) नुतनीकरण – १ महिना
४.रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील नावात बदल व युनिटमध्ये वाढ अथवा घट असल्यास – ३ दिवस

🏉 *नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी फी*
१.नवीन पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड - रुपये १०/-
२.नवीन केशरी रंगाचे रेशन कार्ड - रुपये २०/-
३.नवीन शुभ्र पांढ-या रंगाचे रेशन कार्ड - रुपये ५०/-

🏉 *दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी फी*
१.दुबार पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड - रुपये २०/-
२.दुबार केशरी रंगाचे रेशन कार्ड - रुपये ४०/-
३.दुबार शुभ्र पांढ-या रंगाचे रेशन कार्ड - रुपये १००/-

🏉 *कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा*
१.पिवळी शिधापत्रिका – रुपये १५ हजारापर्यंत
२.केशरी शिधापत्रिका – रुपये १ लाखापर्यंत
३.शुभ्र शिधापत्रिका – रुपये १ लाख व त्यापुढील


रेशन(राशन)दुकानदाराविरुद्ध तक्रार कुठे करावी?

*महत्वपुर्ण_माहिती*
*🍀स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*🌴
*गहू - २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो*
*साखर - २० रू . किलो*
*तुरदाळ- ३५ रू. किलो*
*उडीद दाळ - ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर असेल व तुम्हाला माल (राशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
      *चोरांना खुलेआम आपली लूट  करन्याची संधी देवू नका...!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..!
                                जागा ग्राहक जागा !           आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्रार करा.  आरबीएम वृत्त वाहिनी महाराष्ट्र (RBM news Maharashtra) तुमच्या सोबत. जाहिरात व बातम्या प्रसारीत करण्यासाठी संपर्क ९९७०२२८२३६ करा. आम्ही तुमची नक्कीच मदत करू.🍃


_*📙 तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य मिळते?*_


📍देशातील गरिबांना मोफत धान्यपुरवठा होणेसाठी रेशनकार्डचा उपयोग केला जातो. तसेच या धर्तीवर गरजूंच्या दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी म्हणून रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते.

❗दरम्यान काहीवेळा लोकांना लक्षात येत नाही कि आपल्याला क्षमतेनुसार किती धान्य मिळायला हवे , त्यामुळे दात्यांचा गोंधळ उडतो. हि माहिती आपणास मिळवायची असेल तर खालील कृती अवलंबावा.

▪प्रथम  http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटला भेट द्या.

▪पुढील स्क्रीनवर ऑनलाईन रास्तभाव असे विंडो दिसेल. पुढील विंडोत Aepds सर्व जिल्हे या नावाची कोलाम दिसेल, त्यावर क्लिक करा.

▪RC Details New वर क्लिक करा. पुढील विंडोत आपला (SRC No) रेशनकार्ड नं. टाका.

▪Submit या बटनावर क्लिक करा.

💁🏻आता आपल्या स्क्रिनवर तुमच्या रेशनकार्डवरील माहिती व आपल्याला मिळत असलेल्या मालाची माहिती तसेच मागील एक वर्षांपूर्वीची माहिती याद्वारे मिळू शकेल.

राशन विषयी अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ लिंक उघडा.
https://youtu.be/xwEytlXzxPI


या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

शिधा पत्रिका माहिती ?

Related Questions

शिधापत्रिकेचे (रेशनकार्ड) प्रकार किती व कोणते आहेत? कोणत्या शिधापत्रिकेवर (रेशनकार्डवर) किती धान्य (रेशन) मिळते? शिधापत्रिकेमधील (रेशनकार्ड) वरील नाव कमी करणे आणि नवीन नाव टाकण्याची प्रक्रिया कशी करावी? शिधापत्रिका (रेशनकार्ड) ऑनलाईन करण्याची प्रक्रिया काय आहे?
केशरी रेशनकार्डवर SRC नंबर नसेल तर काय करावे?
वडिलांचे रेशन कार्ड बीपीएल आहे, तर त्यांच्या मुलांचे रेशन कार्ड बीपीएलच येईल का?
मला ऑनलाईन शिधापत्रिका काढायची आहे, पण गॅसची माहिती अनिवार्य आहे. माझ्याकडे गॅस कनेक्शन नाही, तर काय करू?
माझे केशरी रेशनकार्ड आहे, मला त्याच्यावर काहीच राशन मिळत नाही, त्यासाठी मी काय करू?
माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, तरी पण मला रेशन मिळत नाही. रेशन दुकानवाला बोलतो की तुम्हाला कार्डवर शिक्का मारावा लागेल, तर कोणता शिक्का मारावा लागेल आणि कुठून मारावा लागेल?
मला केशरी शिधापत्रिका विभक्त काढायची आहे, ती किती दिवसात मिळेल आणि त्यासाठी किती पैसे लागतील?