पक्षी पर्यावरण प्राणी

चातक पक्ष्याबद्दल माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

चातक पक्ष्याबद्दल माहिती सांगा?

7
मराठी साहित्यात अशी आख्यायिका आहे की, चातक हा पक्षी तहान भागवण्यासाठी फक्त पावसाचे थेंब चोचीत झेलून पितो. बाकी कोणतेही पाणी तो पीत नाही. त्यामुळे, तो पावसाची 'बडी मुद्दत से राह देखता है।' वगैरे..प्रत्यक्षात चातक म्हणजे पाइड कक्कू, हा कोकिळेच्या जातकुळातील पक्षी आहे. पाइड म्हणजे काळा-पांढरा. याचे नवीन नाव जॅकोबीयन कक्कू असे आहे. तर शास्त्रीय नाव 'क्लॅमाटोर जॅकोबीनस' आहे. क्लॅमाटोर हा लॅटीन शब्द 'क्लॅमर म्हणजे दंगेखोर किंवा आरडाओरडी करणारा आणि जॅकोबीन हा शब्द युरोपातल्या फ्रेंच रिव्हॉल्यूशनसंबंधी आहे. यातूनच आपल्याला या पक्ष्याचा स्वभाव आणि हा कोठून स्थलांतर करून येतो हे समजते. युरोपातून उन्हाळी स्थलांतर करून आलेले हे पक्षी पावसाळ्याच्या तोंडावर कोकणासह पश्चिम घाटात उत्तरेस पसरतात.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=747792415618684&id=100011637976439
चातक हा पावसाळ्यात येणारा स्थलांतरित पक्षी असून याला इंग्रजीत Pied Crested Cuckoo, Jacobin Cuckoo म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव Clamator jacobinus असे आहे. जवळपास ३३ सें. मी. लांबीचा हा पक्षी मान्सूनच्या आगमनाची वर्दी घेऊन येतो.
मुख्यत्वे झाडांवर राहणे पसंत असले तरी कधीकधी कीटकांच्या शोधार्थ चातक जमिनीवरही उतरतो. याच्या विणीचा हंगाम जून ते ऑगस्ट असून याचे स्वतःचे घरटे नसते. इतर सर्व प्रकारच्या ककू पक्ष्यांप्रमाणे चातकाची मादी आपले अंडे दुसऱ्या एखाद्या पक्ष्याच्या घरट्यात टाकून निघून जाते. चातकाच्या पिलांची देखभाल ते उसने आई-वडील करतात.
प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य, म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले असते. अर्थात ही एक कविकल्पना आहे. इतर पक्ष्यांप्रमाणेच चातकही जमिनीवर साठलेले पाणीसुद्धा पितो....♍

0

चातक पक्ष्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

  • नाव: चातक पक्षी (Pied Cuckoo)
  • वैज्ञानिक नाव: Clamator jacobinus
  • ओळख: हा पक्षी आकाराने साधारणपणे बुलबुलपेक्षा मोठा असतो. त्याचे डोके, मान आणि छाती काळी असून पंखांवर पांढरे पट्टे असतात.
  • आढळ: चातक पक्षी भारत, आफ्रिका आणि आशिया खंडातील काही भागांमध्ये आढळतो.
  • खाद्य: ते कीटक आणि लहान आळ्या खातात.
  • विशेषता:
    • हा पक्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसतो, म्हणून तो पावसाचा सूचक मानला जातो.
    • 'चातक' हा शब्द संस्कृतमध्ये 'पाऊस' या अर्थाने वापरला जातो.
    • असे मानले जाते की हा पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही.

अधिक माहितीसाठी: विकिपीडिया

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1820

Related Questions

माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
नर मांजर दोन दिवसांपासून घरी आले नाही?
डायनासोरचे हात आखूड का होते?
सर्वात बुद्धिमान मासा कोणता?
ॲनिमल डे च्या होम रिचर्डच्या वार्तापत्रातील परिणाम काय आहेत?