आयकर सरकारी योजना कागदपत्रे अर्थशास्त्र

उत्पन्न दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

2 उत्तरे
2 answers

उत्पन्न दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

4
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पुढील पायऱ्यांनी जा.
१) पुर्वतयारी – उत्पन्नाचा व रहिवासी पुरावा घेणे
२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन उत्पन्नाचा दाखला काढणे



पायरी १) पुर्वतयारी – उत्पन्नाचा आणि रहिवासी पुरावा घेणे.

● उत्पन्नाचा पुरावा काढणे
अ) अर्जदार शेतकरी/मजुर असल्यास आपले रेशनकार्ड दाखवुन गाव कामगार तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा मागील तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला घ्या.
ब) अर्जदार नोकरदार असल्यास पगाराची स्लिप घ्यावी.
क) अर्जदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाचे आयकर विवरणपत्र घ्यावे.
ड) अर्जदाराला वैद्यकीय कारणासाठी प्रमाणपत्र हवे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्यावे.
ई) अर्जदार जर पेन्शनर असतील तर बँकेचे पासबुक/बँकेचे प्रमाणपत्र घ्यावे.

● रहिवासी पुरावा घेणे
गावकामगार तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहिवासी दाखला घ्यावा.



पायरी २) आवश्यक कागदपत्रे जमा करणे

● उत्पन्नाचा पुरावा

● रहिवासी दाखला

● ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – तुमचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १०₹ चे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो

● उत्पन्नाबाबत १००₹ स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदाराचे वय १८ वर्ष पुर्ण असल्यास त्याने स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र.

(वरील कागदपत्रांची फाईल बनवुन साक्षांकित प्रत तयार करुन ठेवावी.)



पायरी ३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन उत्पन्नाचा दाखला काढणे

सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयामधुन उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा. त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी. त्यावर १०₹ किंमतीचे कोर्ट फी स्टँप/तिकीट लावावे. तुमचा फोटो लावावा. या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयमध्ये जमा करावा. फॉर्म जमा केल्यावर पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपला उत्पन्नाचा दाखला घ्यावा. त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी. उत्पन्नाचा दाखला मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या झेरॉक्स काढुन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवाव्यात. उत्पन्नाच्या दाखल्याचा उपयोग नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी होतो.
उत्तर लिहिले · 26/5/2020
कर्म · 6740
0
उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
  • अर्जदाराचा फोटो: पासपोर्ट साईझ फोटो.
  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी कोणतेही एक. आधार कार्ड (UIDAI)
  • पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल, मालमत्ता कर पावती, भाडे करार यापैकी कोणतेही एक.
  • उत्पन्नाचा पुरावा:
    • पगारदार असल्यास: मागील तीन महिन्यांची पगार स्लिप आणि फॉर्म १६.
    • व्यवसायिक असल्यास: मागील वर्षाचा आयटीआर (ITR) आणि व्यवसायाच्या उत्पन्नाचा पुरावा.
    • शेतकरी असल्यास: जमिनीची कागदपत्रे (७/१२ उतारा) आणि उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडून).
    • इतर उत्पन्न असल्यास: त्याचे संबंधित कागदपत्रे.
  • स्वयंघोषणा पत्र (Self Declaration): अर्जदाराने स्वतःच्या उत्पन्नाबद्दल दिलेले घोषणापत्र.
  • अर्ज: विहित नमुन्यातील अर्ज.

टीप: आवश्यक कागदपत्रे वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित शासकीय कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी.

अधिक माहितीसाठी, आपल्या स्थानिक तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्राला भेट द्या.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

सरकारी योजना नोंदणी कशी करायची?
महाराष्ट्रामध्ये फ्री उपचार कोठे होतात?
नवीन सरकारी योजना आल्या तर कशा कळतात?
लाडकी बहिण योजनेची नवीन नियमानुसार काय पात्रता आहे?
कल्याण सुधारण्यासाठी सरकारचे विविध उपाय लिहा?
कल्याण सुधारणेसाठी सरकार विविध उपाय काय करत आहे?
पुरुष बचत गटासाठी सरकारी योजना आहेत का?