2 उत्तरे
2
answers
प्रकल्पग्रस्त दाखला कसा मिळवता येतो?
3
Answer link
शासकीय कामांसाठी खाजगी जमीन/शेती जमिनीचे जेव्हा भूसंपादन होते.तेव्हा ज्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.शासकीय नोकरीमध्ये आरक्षण,कोर्टातील संपादित जमिनीचा मोबदला प्राप्त करण्यासाठी,प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त असणारया विविध शासकीय योजना अनुदान इ. साठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.
प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्रप्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-
कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज .
ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.
रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सह प्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .
संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तह्शीलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.
मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीची मूळप्रती.
इ – स्टेटमेंटची प्रत.
मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .
घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र व पत्नीचे शपथपत्र.
प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
मतदार यादीची नक्कल.
तलाठ्यांचे जमीन सम्पादन झाल्याचे प्रमाणपत्र.
शिधापत्रिकेची / रेशनकार्ड / कुपनाची प्रत.
ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र.
पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.

0
Answer link
प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी खालील माहिती आणि प्रक्रिया उपयुक्त ठरू शकते:
प्रकल्पग्रस्त दाखला म्हणजे काय?
प्रकल्पग्रस्त दाखला हा त्या व्यक्तीला मिळतो ज्यांची जमीन सरकारद्वारे एखाद्या विकास प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जाते. यामुळे त्या व्यक्तीला सरकारी योजनांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये काही प्रमाणात आरक्षण मिळते.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जमिनीच्या मालकीचे कागदपत्र (७/१२ उतारा, फेरफार)
- विस्थापित झाल्याचा पुरावा
- ग्रामपंचायत किंवा तलाठी यांचा दाखला
- ओळखपत्र
- रेशन कार्ड
- शपथपत्र (Affidavit)
अर्ज करण्याची प्रक्रिया
- संबंधित तहसील कार्यालयात जा आणि प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी अर्ज करा.
- अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज सादर करा आणि पावती घ्या.
- तलाठी कार्यालयामार्फत कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- पडताळणीनंतर दाखला जारी केला जातो.
अर्ज कोठे करावा?
तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रावर अर्ज करू शकता.
महत्वाचे
- प्रत्येक जिल्ह्यानुसार किঞ্চিত वेगळी प्रक्रिया असू शकते, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील तहसील कार्यालयातून माहिती घेणे अधिक योग्य राहील.
- कागदपत्रे सादर करताना त्यांची मूळ प्रत (original) सोबत ठेवावी.
अधिक माहितीसाठी:
- आपल्या जिल्ह्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधा.