Topic icon

कागदपत्रे.

4
नवीन रेशनकार्ड काढण्याचे वेगवेगळे प्रकार आहे 
1 तुम्ही स्थलांतरीत असाल तर त्यासाठी नवीन   राहण्याच्या ठिकाणसाठी रेशनकार्ड काढणे.
त्यासाठी तुम्ही आधी ज्या तहसीलच्या कार्यक्षेत्रात राहतात तिथे रेशनकार्ड रद्द करून नवीन तालुक्यात समाविष्ठ करण्यासाठी अर्ज करता येईल त्यासाठी  रेशनकार्ड रद्द केल्याचा दाखला , सर्वांचे आधारकार्ड , नवीन लाईट बिल घेऊन तहसील कार्यलयात विहित नमुन्यात अर्ज  सादर करा. 
 2. जर तुम्ही त्याच तालुक्यात रहात असाल आणि घरच्या कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नाव असेल व विभक्त करावयाचे असेल तर नाव कमी करून विहित नमुन्यात अर्ज करून  विभक्त रेशनकार्डसाठी अर्ज करा. 
3 जर  रेशनकार्ड नसेलच तर त्यासाठी विविध पुरावे द्यावे लागतील त्यात सर्वांचे आधार कार्ड , मतदानकार्ड, रहिवाशी दाखला , घराचा उतारा, वीज बिल, मुलांचे शाळेचे दाखले किंवा बोनाफाईट, बँक पासबुक, 2 फोटो व विहित नमुन्यात अर्ज तहसीलला दयावा लागेल.
उत्तर लिहिले · 20/2/2022
कर्म · 11785
3
शासकीय कामांसाठी खाजगी जमीन/शेती जमिनीचे जेव्हा भूसंपादन होते.तेव्हा ज्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.शासकीय नोकरीमध्ये आरक्षण,कोर्टातील संपादित जमिनीचा मोबदला प्राप्त करण्यासाठी,प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त असणारया विविध शासकीय योजना अनुदान इ. साठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.

प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्रप्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-

कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज .

ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.

रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सह प्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .

संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तह्शीलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.

मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.

मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीची मूळप्रती.

इ – स्टेटमेंटची प्रत.

मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .

घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.

प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र व पत्नीचे शपथपत्र.

प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.

मतदार यादीची नक्कल.

तलाठ्यांचे जमीन सम्पादन झाल्याचे प्रमाणपत्र.

शिधापत्रिकेची / रेशनकार्ड / कुपनाची प्रत.

ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र.

पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.
उत्तर लिहिले · 24/5/2020
कर्म · 55350
0
सेतू समितीमध्ये 15 रु फॉर्म मिळतो..जी जी कागदपत्रे जातीच्या प्रमाणपत्रासाठी जोडली आहेत तीच कागदपत्रे याला पण जोडावीत..!
उदा. तलाठी पंचनामा, जातीचे प्रमाणपत्र, TC, ,पोलिस पाटील यांचा दाखला.
उत्तर लिहिले · 11/10/2017
कर्म · 2420
5
अधिवास दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, 'आरएसबीवाय'कार्ड, वाहनचालक परवाना ( वरीलपैकी कोणतेही एक)

पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा (वरीलपैकी कोणतेही एक)

वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी) (वरीलपैकी कोणतेही एक)

रहिवासाचा पुरावा : रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला( वरीलपैकी कोणतेही एक)
उत्तर लिहिले · 27/9/2017
कर्म · 20545