पशुपालन प्राणी पाळीव प्राणी गोवंश

गाईचा गाभण काळ किती दिवसांचा असतो?

2 उत्तरे
2 answers

गाईचा गाभण काळ किती दिवसांचा असतो?

6
गायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस आणि म्हशीचा गाभण काळ १० महिने १० दिवसांचा असतो. वासरांची गर्भाशयातील वाढ, पुढच्या वेतात दूध उत्पादन, तंदुरुस्त वासरांचा जन्म आणि व्याल्यानंतर गर्भाशयाचे आरोग्य हे सर्व प्रसूतीपूर्व जनावरांच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते.
 
जनावरांतील कृत्रिम रेतनाने अथवा नैसर्गिक पैदाशीने गाभण करवून घेतलेली तारीख पशुपालकाने नोंद करून ठेवावी. दोन ते अडीच महिन्यांनी तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून ती तपासून गाभण असल्याची खात्री करून घ्यावी.
गाभण असल्यास रेतनाच्या तारखेवरून ती सर्वसाधारणपणे कोणत्या तारखेला विणार हे निश्‍चित करता येते. जनावरे विण्याची तारीख नोंदवणे आवश्यक आहे. गायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस (२८० दिवस) तर म्हशीतील १० महिने १० दिवस (३१० दिवस) असतो.
उत्तर लिहिले · 20/5/2020
कर्म · 55350
0

गाईचा गाभण काळ साधारणपणे 280 दिवसांचा असतो. हा काळ 270 ते 290 दिवसांपर्यंत असू शकतो.

अर्थात, खालील गोष्टींवर तो अवलंबून असतो:

  • गाईची जात: काही जातींमध्ये गाभण काळ थोडा कमी किंवा जास्त असू शकतो.
  • वासरांची संख्या: जर गाय जुळ्या वासरांना जन्म देणार असेल, तर गाभण काळ थोडा कमी होऊ शकतो.
  • आहार आणि आरोग्य: गाईला चांगला आहार आणि आरोग्य सेवा मिळाल्यास गाभण काळ नियमित राहतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1900

Related Questions

पशुपालनाची तत्त्वे लिहा?
गोठा नोंद करायचा आहे, काय करावे लागेल?
इन्क्युबेटरमध्ये अंडी टाकल्यानंतर कोणकोणत्या दिवशी कॅंडलिंग प्रक्रिया करतात?
पशुपालन खात्याच्या नावे बाजूस येणाऱ्या कोणत्याही दहा बाबी स्पष्ट करा?
भारतातील पशुपालनाचे महत्त्व काय आहे?
पशु पालनाचे रक्षण करणारा देव होता का?
देवणी गाईचे मूळ स्थान कोणते आहे?