शिक्षण डिप्लोमा अभ्यासक्रम

आर्ट टीचर डिप्लोमा आणि मॉन्टेसरी कोर्सबद्दल सविस्तर माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

आर्ट टीचर डिप्लोमा आणि मॉन्टेसरी कोर्सबद्दल सविस्तर माहिती द्या?

2
Arts

चित्रकला, रंगकाम किंवा कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती यातून अनेक सर्जनशील व्यक्ती आपली सर्जनशीलता व्यक्त करतात. विविध कलाक्षेत्रांतील संधींवर नजर टाकली, की त्यांची व्याप्ती, आपली आवड आणि त्या क्षेत्रांतील आपल्याला असलेला वाव यातून आपल्याला अभ्यासक्रमाची निवड करता येते.

शाळेत असताना ज्यांनी इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा दिली आहे, त्यांना दहावीनंतर मूलभूत अभ्यासक्रमाला (फाउंडेशन) एक वर्षाचा प्रवेश मिळू शकतो. फाउंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना थेट जी. डी. आर्ट्‌‌स या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. चित्रकला परीक्षेत ज्यांना 'अ' श्रेणी किंवा 'ब' श्रेणी मिळाली आहे, त्यांनी या क्षेत्राचा आवर्जून विचार करावा. यात फाइन आर्ट्‌‌स किंवा कमर्शिअल आर्ट अशी विभागणी होते. एकूण पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम राज्यातील सर्व प्रमुख शहरी भागांत उपलब्ध आहे.

जी. डी. आर्ट या चार वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमानंतर एक वर्षाचा 'डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन' (डिप. ए. एड.) हा डिप्लोमा पूर्ण करता येतो. उच्च कला शिक्षणसंस्थांत 'डिप. ए. एड.' झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्याने सेवेत घेतले जाते. 'आर्ट मास्टर' (ए. एम.) हा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही 'जी.डी. आर्ट' पदविकेनंतर पूर्ण करता येतो. ए. एम. असलेल्या व्यक्तीस कला संस्थांकडून सेवा बढती व सुधारित वेतनश्रेणीचा लाभ होतो. या व्यतिरिक्त बारावीनंतर विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा 'आर्ट टीचर्स डिप्लोमा' (ए.टी.डी.) हा पदविका अभ्यासक्रमही निवडता येतो.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र अशी मान्यवर विद्यापीठे व समीक्षक संस्थांत उच्च कला शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबविले जातात. त्यापैकी एक वर्षाचा 'बॅचलर ऑफ फाइन आर्ट' (बी.एफ.ए.) ब्रीज कोर्सद्वारे, 'जी. डी. आर्ट' डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम व दर्जा मिळविता येऊ शकतो. उपयोजित कला, रंग-रेखाकला व शिल्पकला या प्रमुख विषयांतील चार वर्षांचा 'बॅचलर ऑफ फाइन आर्ट' (बी.एफ.ए.) हा पदवी अभ्यासक्रम बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकतो.

राज्यात उच्च कलाशिक्षण संस्था वाढत असतानाच केवळ महिलांसाठी कला शिक्षण देणारे 'एसएनडीटी' विद्यापीठही कार्यरत आहे. दृश्यकला (व्हिजुअल आर्ट) विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांबरोबरच 'एम फील' आणि पीएच.डी असे संशोधन अभ्यासक्रमही या विद्यापीठात अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबविले जात आहेत. कला क्षेत्रातील पुरुष व महिला कलाकारांना संधी असून, सर्जनशील, संगणक कुशल, संवादक्षम व माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून सातत्याने 'अपडेट' असणाऱ्या कलाकारांची विविध क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निवड होताना आढळते.

कलाक्षेत्रातील संधी देणाऱ्या संस्था

१) सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट
पत्ता : डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१

२) शासकीय चित्रकला महाविद्यालय
पत्ता : दीक्षाभूमीसमोर, लक्ष्मीनगर, नागपूर

३) रचना संसद
पत्ता : २७८, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.

४) अभिनव कला महाविद्यालय
पत्ता : टिळक रोड, पुणे ४११०३०

५) अभिनव कला महाविद्यालय
पत्ता : पाषाण, पुणे ४११००८

६) एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट
पत्ता : सेंट मार्टिन्स रोड, बांद्रा (प.) मुंबई ४११०५०

७) आबनावे कला महाविद्यालय
पत्ता : ४८४, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे ४११०३०

८) कला सागर कला महाविद्यालय
पत्ता : सिंहगड रोड, पुणे

९) साई चित्रकला महाविद्यालय
पत्ता : कात्रज, पुणे

१०) चित्रलीला निकेतन कला महाविद्यालय
पत्ता : शनिवार पेठ, पुणे ३०

बालवाडी (Montessori) शिक्षिका प्रशिक्षण (शासनमान्य कोर्स)

बालवाडी म्हणजे बालकाचे घर, बागडण्यासाठीचे अंगण! साधारणपणे बालक अडीच वर्षाचे झाल्यावर त्याला बालवाडीत घेतले जाते.इथेच खऱ्या अर्थाने त्याची समाजाशी ओळख व्हायला लागते. आईच्या मायेत, उबेत वाढणारे मूल प्रथमच ‘शाळा’ या अधिक विस्तृत वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. आई आणि घरापासून वेगळ्या वातावरणात रमताना त्याला आपलं स्वतःचं माणूस हवं असते. त्याच्या मनातली भीती पळवून लावणारी, आईसारखी मायाव प्रेम देणारी अशी व्यक्ती त्याला हवी असते. बालवाडीत ताईच्या रुपात ती त्याला मिळते. यासाठीच बालवाडी शिक्षिकेने प्रशिक्षण घेणे जरुरीचे असते. बालकांना हसत-खेळत शिक्षण देता येणे आवश्यक असल्याने शासनाचा ६महिन्यांचा बालवाडी कोर्स करणे गरजेचे आहे.

बालक हे सर्वसाधारणपणेतीन तासबालवाडीत असते.या वयात बालकाच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते.त्याची जिज्ञासा, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती जागृत झालेली असते. त्यामुळेच त्याला प्रत्येक गोष्टीबाबत कुतूहल असते. जे दिसेल (चांगलं-वाईट) ते टीपकागदासारखे टिपून घेण्याची वृत्ती असते. यासाठीच त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. याचे प्रशिक्षण बालवाडी कोर्समध्ये दिले जाते.बालकाचा सर्वांगीण विकास साधता येणाऱ्या बालवाडी शिक्षिका घडवणे हे या कोर्सचेउदिद्ष्ट असते. बालवाडीत येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगळी असते. प्रत्येकाची‘गती आणि मती’ भिन्न असते. हे सगळेकसे ओळखायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला कसे शिकवायचे, त्याला उमलू द्यायचे, त्याला समुहात आणि समाजात वावरायला कसे शिकवायचे? या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण बालवाडी कोर्समध्ये दिले जाते.

सहा महिन्यांच्या कालावधीत :

लेखी व प्रात्यक्षिक कामाचा भरपूर सराव.

शासनमान्य कोर्स असल्यामुळे सर्व नियम शासनाचे असतात.

कालावधी: ६ महिने

बॅच:

सोमवार ते शुक्रवार

खास शिक्षिकांसाठी शनिवार बॅच

बॅच:
जानेवारी ते जून

जुलै ते डिसेंबर

भरपूर सराव–

गाणी गोष्टी, खेळ, हस्तकला, चित्रकला या प्रात्यक्षिकांचा भरपूर सराव .

लेखी व प्रात्यक्षिक काम मिळून एकूण १००० गुणांची परीक्षा-

बालमानसशास्त्र
बालशिक्षणाची कार्यपद्धती
बालआरोग्य व बालआहार
बालशिक्षणाचे सिद्धांत व शालेय व्यवस्थापन
बालकल्याण व समाजशिक्षण

[८० गुणांची लेखी व अंतिम परीक्षा आणि २० गुणांची चाचणी परीक्षा]

प्रात्यक्षिक काम- ५०० गुण

हस्तकला
चित्रकला
संगीत
शारीरिक शिक्षण
साधन निर्मिती

याशिवाय पाठांसाठी मार्गदर्शन-

भाषा
गणित
विज्ञान
कलानुभव
शारीरिक शिक्षण
जीवन व्यवहार
हे विषय कसे शिकवायचे यासाठी पाठाचे नियोजन केले जाते व त्याचे मार्गदर्शन केले जाते.

फायदे:-

नामांकित शाळॆत शिक्षिका म्हणून काम करू शकता.
स्वतःची बालवाडी चालवू शकता.

बालभवनासारखे खेळ तुमच्या सोसायटीत, परिसरात घेऊ शकता.

सुट्टीत छंदवर्ग घेऊ शकता.

अंगणवाडी चालवू शकता.

यासर्वांसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते, ती या कोर्समध्ये दिली जाते. आजची स्थिती पाहिली तर प्रत्येक स्त्रीने सक्षम होणे महत्त्वाचे आहे. बालवाडी हा पाया आहे. त्यासाठीच शासनमान्य कोर्सचे प्रशस्तिपत्रक असणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 19/5/2020
कर्म · 2890
0

मी तुम्हाला आर्ट टीचर डिप्लोमा (Art Teacher Diploma) आणि मॉन्टेसरी (Montessori) कोर्सबद्दल सविस्तर माहिती देतो:

आर्ट टीचर डिप्लोमा (Art Teacher Diploma)

आर्ट टीचर डिप्लोमा हा कला शिक्षणातील एक व्यावसायिक कोर्स आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर, तुम्ही शाळांमध्ये कला शिक्षक म्हणून काम करू शकता.

  • कोर्सची उद्दिष्ट्ये:
    • विद्यार्थ्यांना कला आणि चित्रकला यांबद्दल मूलभूत ज्ञान देणे.
    • विविध कला प्रकारांचा (drawing, painting, sculpture, crafts) परिचय करून देणे.
    • कला शिक्षण पद्धती आणि तंत्रांचे प्रशिक्षण देणे.
    • विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता (creativity) आणि कलात्मक दृष्टिकोन विकसित करणे.
  • प्रवेश पात्रता:
    • किमान १० वी किंवा १२ वी पास.
    • काही संस्थांमध्ये चित्रकला विषयात आवड आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
  • कोर्स कालावधी:
    • १ ते २ वर्षे ( संस्थेनुसार बदलू शकतो).
  • अभ्यासक्रम:
    • Drawing, Painting, Sculpture, Printmaking, Applied Arts, History of Art, Art Education इत्यादी विषय शिकवले जातात.
  • जॉबच्या संधी:
    • प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये कला शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
    • खाजगी क्लासेस किंवा आर्ट स्टुडिओमध्ये शिकवू शकता.
    • फ्रीलांस आर्टिस्ट म्हणून काम करू शकता.

मॉन्टेसरी कोर्स (Montessori Course)

मॉन्टेसरी कोर्स हा लहान मुलांच्या शिक्षणासाठी एक विशेष प्रशिक्षण आहे. मारिया मॉन्टेसरी यांनी विकसित केलेल्या शिक्षण पद्धतीवर आधारित हा कोर्स आहे.

  • कोर्सची उद्दिष्ट्ये:
    • मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीची माहिती देणे.
    • लहान मुलांच्या विकासाच्या टप्प्यांबद्दल मार्गदर्शन करणे.
    • मुलांना शिकवण्यासाठी योग्य शैक्षणिक साहित्य (teaching aids) कसे वापरावे हे शिकवणे.
    • मुलांना स्वतंत्रपणे शिकण्यास प्रोत्साहित करणे.
  • प्रवेश पात्रता:
    • किमान १२ वी पास.
    • काही संस्थांमध्ये पदवीधर (graduate) असणे आवश्यक आहे.
  • कोर्स कालावधी:
    • काही महिने ते १ वर्ष (कोर्सच्या प्रकारानुसार).
  • अभ्यासक्रम:
    • Montessori Philosophy, Child Psychology, Montessori Materials, Curriculum Planning, Classroom Management इत्यादी विषय शिकवले जातात.
  • जॉबच्या संधी:
    • मॉन्टेसरी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
    • प्लेgroup किंवा बालवाडीमध्ये (kindergarten) शिकवू शकता.
    • send child care center सुरू करू शकता.

टीप: कोर्स निवडण्यापूर्वी, संस्थेची मान्यता (recognition) आणि अभ्यासक्रम तपासा.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5220

Related Questions

D.AD अभ्यासक्रम काय असतो?
शालेय अभ्यासक्रमामध्ये गणिताची गरज?
अभ्यासक्रम म्हणजे काय? अभ्यासक्रमाची संकल्पना स्पष्ट करा आणि अभ्यासक्रमाची तत्त्वे लिहा.
इयत्ता सातवी दुसऱ्या धड्याचे नाव मराठी?
इयत्ता सातवीच्या दुसऱ्या धड्याचे नाव काय आहे?
BNS pdf मिळेल का?
FY B.A. ला किती विषय असतात?