2 उत्तरे
2
answers
रामदास आठवले बद्दल माहिती द्या?
6
Answer link
⭕ रामदास आठवले नावाचा झंझावात ⭕
अशी कोणतीही दलित वस्ती नाही जेथे रामदास आठवलेना आोळखत नाही. रामदास बंडू आठवले (जन्म: २५ डिसेंबर, इ.स. १९५९)यांचा जन्म अगलगाव जि. सांगली येथे झाला. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले.
https://www.facebook.com/187866231779698/posts/663782167521433/
त्यांची तेथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. इ.स. १९७२ मध्ये दलित पॅंथरची स्थापना झाली व ते पॅंथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ती व सहकारी मंडळी होती. पॅंथर्समुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांच्यात पॅंथर्सचा झंझावात निर्माण झाला.

नामांतराचा लढा काही वर्षे सुरू राहिला. शिवसेनेशी व सरकारशी त्यांनी संघर्ष केला. अनेक नेत्यांसह मोर्चे आणि आंदोलनात ते सहभागी झाले. शेवटी मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ’ असा नामविस्तार वा नामांतर झाले. तेव्हाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मुख्यमंत्री असताना हा ऐतिहासिक निर्णय झाला. मार्ग निघाला. आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. आंदोलन, चळवळ आणि राजकारण सुरू असतानाच त्यांचा इ.स. १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला.

• गेल्या अनेक वर्षांपासून आठवले नावाचं वादळ ऐकून होतो. महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या माध्यामातून त्यांनी आपला राजकीय अजेंडा जाहीर करून धाडसाने निर्णय घेतला असेल आणि तेवढ्याच धाडसानं निर्णय बदललाही असेल मात्र कधी राजकारण करण्यासाठी समाजात आग ओतण्याचं काम या पँथरने केल्याचं ऐकलं नाही.
• खऱ्या अर्थाने दलित, वंचित आणि शोषित घटकांवर अन्याय होतो तेव्हा रामदास आठवले आवाज देताना पाहिलंय.
• रामदास आठवले नावाचा नेता एका रात्रीत तयार झालेला नाही, कुण्या मिडीयाने डोक्यावर घेऊन तयार केलेला नाही, कुणाच्या पाठीमागे फिरून तयार झालेला नाही तर खेड्यापाड्यात दलित समाजाच्या वाड्यावस्तीत फिरून एक एक पँथर जमा करून त्यांच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवण्याचं काम यांनी केलं.
• साधारण घरातून घोंघावत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदापर्यंत मारलेली मजल ही त्यांच्या इतिहासजमा झालेल्या संघर्षाचे आणि कार्याचे मोल आहे.
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________
• गावागावात आठवले साहेब अंगार है अशा घोषणा बाहेर पडताना पाहिल्या तेव्हा त्या फाटक्या माणसाची उंची तुम्हाला आम्हाला लक्षात येते.

• दलित समाजाला इतर नेत्यांनी काय दिलं आणि आठवलेंनी काय दिलं हे समजून घ्यायचं असेल तर आठवलेंचा संघर्ष जाणून घ्या. आपलं काम ही आपली आयडेंटीटी असली पाहिजे आणि तशी आयडेंटीटी आठवलेंनी तयार केली.

दलित समाजाच्या मागण्या आणि उत्कर्षासाठी तळमळत उन्हात बसण्यापेक्षा भाजपाच्या सोबतीने जाऊन एखादं मंत्रिपद घेऊन समाजाला जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला तर रामदास आठवले याचं बिघडलं कुठं?

दलितांच्या हितासाठी सातत्याने काम करून झोपडपट्टीतल्या दलितांचे प्रतिनिधित्व करणारे रामदास आठवले यांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा कार्यकर्ता आठवतो.
कारण देशाला बळ दिले पाहिजे म्हणत चुकीचे ते चुकीचे आणि बरोबर ते बरोबर म्हणण्याची ताकद रामदास आठवले ठेवतात.https://www.facebook.com/187866231779698/posts/663782167521433/

0
Answer link
div >
रामदास आठवले (जन्म: २५ डिसेंबर, १९५९) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष आहेत.
राजकीय कारकीर्द:
ते अनेक वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.
२०१४ ते २०१९ या काळात ते सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री होते.
आठवले हे दलित आणि इतर मागासलेल्या समुदायांच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवतात.
सामाजिक कार्य:
दलित समाजासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत.
ते शिक्षण आणि सामाजिक समानता यावर विशेष लक्ष केंद्रित करतात.
संदर्भ:
विकिपीडिया: रामदास आठवले (विकिपीडिया)