अधिकारी व्यवस्थापन संस्था पदग्रहण आणि त्यागपत्र

संस्था पदाधिकारी राजीनामा कसा घ्यावा?

2 उत्तरे
2 answers

संस्था पदाधिकारी राजीनामा कसा घ्यावा?

5
कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव, खजिनदार या पदाधिकाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी या तिघा पदाधिकाऱ्यांना वेगवेगळे महत्त्वाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

सहकारी संस्थांच्या कामकाज कार्यपद्धतीमध्ये उपविधींना जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे तितकेच महत्त्व सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये व्यवस्थापक समिती तथा कार्यकारिणीला असते. त्यातही कार्यकारिणीमधील अध्यक्ष-सचिव-खजिनदार या पदाधिकाऱ्यांनासुद्धा विशेष महत्त्व असते. संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची व सर्व कामे व्यवस्थितपणे वेळेवर पार पाडण्याची जबाबदारी या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर असते. संस्थेचा कारभार व व्यवहार तसेच संस्थेमधील व संस्थेबाहेरील सर्व कामे या पदाधिकाऱ्यांच्याच सह्य़ांनी होत असतात. बँक, व्यक्ती, संस्था व इतर प्राधिकरणांबरोबर करावयाचे अर्थव्यवहार, येणी-देणी हीसुद्धा अध्यक्ष-सचिव किंवा सचिव-खजिनदार यांच्या सह्य़ांनी होत असतात. इतकेच नाही, तर संस्थेची सभासूचना पत्रे, संस्थेचे सचिव किंवा अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने, तर वार्षिक हिशेबपत्रके-ताळेबंद संस्थेच्या अध्यक्ष-सचिव-खजिनदार यांच्या सह्य़ांनी सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येतात. त्यामागील कारणे लक्षात घेतल्यास असे दिसून येईल की, संस्थेचे कामकाज चालविणे सुलभ व्हावे, त्याची जबाबदारी केंद्रित व्हावी, कामकाजात एकसू्त्रता राहून विलंब टळावा आणि महत्त्वाचे म्हणजे सभासदांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण राहून शिस्त पाळली जावी, या दृष्टिकोनातून या तिन्ही पदाधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यावर जबाबदाऱ्यासुद्धा सोपविण्यात आल्या आहेत.

पदाचा राजीनामा देण्याची पद्धत काय असते ?

१. अध्यक्ष सचिवांकडे राजीनामा देऊ शकतो,
२. सचिव किंवा खजिनदार अध्यक्षांकडे राजीनामा देऊ शकतात.
राजीनामा अमलात कधी येतो?

१. राजीनामा स्वीकारला गेला पाहिजे आणि
२. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी त्यांच्या कामाचा ताबा, नवीन निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना रीतसर दिल्यानंतरच राजीनामा अमलात येतो.
म्हणजेच नवीन पदाधिकारी कारभार स्वीकारपर्यंत तुम्हाला कामकाज बंद करता येत नाही. तसेच संस्थेची अडवणूक सुद्धा करता येत नाही.

राजीनामा कधी स्वीकारला जातो?

१. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यावर सोपवलेली कामे अद्ययावत पूर्ण केली असली पाहिजेत
२. त्यांचे ताब्यातील संस्थेची सर्व कागदपत्र, दप्तर, मालमत्ता समितीच्या समोर सादर केली पाहिजे.
३. उक्त बाबींची पूर्तता झाल्यावरच समिती राजीनामा स्वीकारू शकते.

उत्तर लिहिले · 17/4/2020
कर्म · 55350
0

संस्थेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया संस्थेच्या नियमांनुसार आणि कायद्यानुसार असली पाहिजे. खाली काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत:

1. राजीनामा सादर करणे:

  • पदाधिकाऱ्याने लेखी राजीनामा सादर करणे आवश्यक आहे.
  • राजीनाम्यात राजीनामा देण्याचे कारण नमूद करणे आवश्यक नाही, पण तारीख नमूद करणे आवश्यक आहे.

2. राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया:

  • संस्थेच्या घटनेनुसार राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया निश्चित केली जाते.
  • अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारायचा असतो की संचालक मंडळाने, हे संस्थेच्या नियमांवर अवलंबून असते.

3. राजीनाम्याची स्वीकृती:

  • राजीनामा मिळाल्यानंतर, तो स्वीकारण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.
  • राजीनामा मंजूर झाला की नाही, हे संबंधित पदाधिकाऱ्याला लेखी कळवावे.

4. पर्यायी व्यवस्था:

  • राजीनामा स्वीकारल्यानंतर, रिक्त झालेल्या पदावर नवीन नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
  • तात्पुरती व्यवस्था म्हणून, एखाद्या सदस्याला अतिरिक्त कार्यभार सोपवला जाऊ शकतो.

5. कागदपत्रे अद्ययावत करणे:

  • संस्थेच्या नोंदीमध्ये राजीनाम्याची नोंद करावी.
  • कंपनीच्या कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रे Registrar of Companies (ROC) कडे जमा करावी लागतात.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेसाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200