भाषा भारत सामान्य ज्ञान

भारताचि राष्ट्र भाषा कोणती आहे ?

2 उत्तरे
2 answers

भारताचि राष्ट्र भाषा कोणती आहे ?

3
भारताची राष्ट्रभाषा नेमकी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी , राष्ट्रभाषा म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याची गरज आहे. राष्ट्रभाषा आणि राजभाषा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजभाषा म्हणजे राज्यकारभाराची अधिकृत भाषा असा त्याचा अर्थ होतो.

भारतीय संविधानाच्या सतरावा भाग अधिकृत भाषा या विषयाचा आहे. त्यात अनुच्छेद 342 नुसार भारताच्या संघराज्याची भाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल अशी तरतूद करण्यात आली. पण जेव्हा संविधान बनविण्यात आलं त्यावेळेस देशाचा कारभार एका खटक्यात हिंदीत सुरू होईल अशी स्थिती नव्हती मग त्याच कलम 342 मध्ये १५ वर्षाच्या कालमर्यादेची तरतूद करण्यात आली. पंधरा वर्षे हिंदीचा प्रचार, प्रशिक्षण व्हावं आणि मग संसदेने परिस्थिती विचारात घेऊन याबद्दल कायदा करावा. १९६० च्या दरम्यान दक्षिणेकडील राज्यांत हिंदीला विरोध सुरू झाला. जाळपोळ झाली. नेहरूंनी संसदेत घोषणा केली की, हिंदी भाषा अ-हिंदी प्रदेशांवर लादली जाणार नाही. त्यानुषंगाने 1962 साली अधिकृत भाषा अधिनियम बनविण्यात आला. ज्याद्वारे दक्षिणेकडील राज्य जोपर्यंत स्वतः हिंदी भाषा विधीमंडळात ठराव करून स्वीकारणार नाहीत तोपर्यंत हिंदीसह इंग्रजी चा उपयोग राज्यकारभारात केला जाईल. राज्यांना मात्र स्वतःच्या कामकाजाची भाषा ठरविण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. हे सर्व 'राजभाषा' बाबतीत ..

अधिकृत भाषा म्हणून भारताच्या संविधानिक दृष्टीने 'हिंदी'च आहे. संविधानातील आठव्या अनुसूचितील बावीस भाषा ह्या अनुसूचित भाषा आहेत त्यांना राष्ट्रभाषा म्हणणे घटनात्मक दृष्ट्या अनुचित ठरेल. आपली राष्ट्रीय मिठाई 'जिलेबी' आहे ; याचा अर्थ सगळया देशाने फक्त जिलेबीच खावी , गुलाबजामुन खाऊ नयेत असा होत नाही. तसच राष्ट्रभाषा हिंदीचेही आहे!!
उत्तर लिहिले · 4/4/2020
कर्म · 55350
0

भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही.

हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. सरकारी कामकाज आणि संसदेतील कामकाजासाठी या भाषांचा वापर केला जातो.

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात आणि त्या सर्व भाषांना राज्यांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर मान्यता आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

जगातील सर्वात लहान माणूस किंवा स्त्री कोण आहे?
जगात सर्वात जास्त उंच माणूस कोण?
जगातील सर्वात चांगली भाषा कोणती?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील. सर्वात मोठा जिल्हा कोणता?
भारतात किती तालुके?
राम चा उलट काय होतो?
या जगात सर्वात मोठे काय आहे?