भारताचा इतिहास गडदुर्ग किल्ले इतिहास

विशाळगड या किल्ल्याचे जुने नाव काय?

2 उत्तरे
2 answers

विशाळगड या किल्ल्याचे जुने नाव काय?

3
स्थानिक मंडळी या गडाला जिनखोड असेही म्हणतात. टेकडीवरील दगडात पाण्याचे सहा कोरीव टाके व चार गुहा आहेत. त्यातील एका गुहेत विशाल देवी असून त्यावरूनही गडाला विशालगड असे नाव दिले गेले, असे काही मंडळींचे मत आहे.

१६६० साली शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना त्यांना पकडण्यासाठी या गडाला वेढा घालण्यात आला होता. मात्र अत्यंत कल्पकतेने महाराज पन्हाळगडावरून सुखरूप विशालगडावर पोहोचले होते. पावन खिंडीचे ठिकाण विशालगडापासून ६ कि.मी. अंतरावर आहे.

आजही असंख्य इतिहासप्रेमी दरवर्षी पावन खिंडीला भेट देण्यासाठी येत असतात.
शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी राजांनी खूप वेळा विशालगडाला भेटी दिल्या. वास्तव्य केले आणि या गडाची डागडुजीही करून घेतली. घाटमाथा आणि कोकण यांच्या सीमेवर असणा-या या गडाने नेहमीच पहारेक-यांची भूमिका बजावली.

सध्या दगडावर असलेली कमान पडक्या स्थितीत आहे. गडावर असणा-या मलिक रेहान या दर्ग्यावर नवस बोलण्यासाठी असंख्य भाविक येत असतात. गडावर पाण्याची मोठी टंचाई असून पायथ्याजवळून गडावर पाणी न्यावे लागते. गडावर येणा-या पर्यटकांना राहण्यासाठी सध्या निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.

या गडाच्या डोंगरभागावर गवेरेडे जवळून पाहायला मिळतात. गडाकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचा मार्ग आंबा या गावातून आहे. हा रस्ता गडाच्या पायथ्यापर्यंत जातो. विशाळगड व रस्त्याचा भाग यांच्यामध्ये मोठी दरी असून यांना जोडणारा लोखंडी साकव उभारण्यात आला आहे.

यामुळे पर्यटकांना या लोखंडी पुलामुळे गडाकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या गडावर माकडेही मोठया प्रमाणात दृष्टीस पडतात, मात्र त्यांचा पर्यटकांना कोणताही त्रास होत नाही. या गडाकडे पायथ्यापासून जाण्यासाठी पाखाडी व त्याला दरीच्या बाजूने रेलिंगही उभारण्यात आले आहे. यामुळे गडाचा परिसर सुरक्षित झाला आहे.

पावसाळयामध्ये या गड परिसराला धुक्याची झालर पसरलेली असते. अगदी दुपारीही या भागात धुके पाहायला मिळते. गड अत्यंत उंचावर वसलेला असल्याने या गडावरून संगमेश्वर, लांजा व रत्नागिरीचा काही भाग उन्हाळयात पाहायला मिळतो व याचा पर्यटकही लाभ उठवतात🙏
उत्तर लिहिले · 2/4/2020
कर्म · 3350
0

विशाळगड किल्ल्याचे जुने नाव खेळणा होते.

हा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

इतिहासानुसार, हा किल्ला शिलाहार वंशाच्या राजांनी इ.स. ११९० मध्ये बांधला.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2020

Related Questions

शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
पट्टा किल्ल्याबद्दल माहिती द्यावी?
मुंबईच्या किल्ल्यांची माहिती द्या?
दातेगडाबद्दल माहिती द्या?
महाराष्ट्र मध्ये किती किल्ले आहेत?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती किल्ले आहेत?
रायगडावरील एक टोक?