प्राणी प्राणी वर्तन

झेब्रा प्राण्याच्या अंगावर पट्टे का असतात?

2 उत्तरे
2 answers

झेब्रा प्राण्याच्या अंगावर पट्टे का असतात?

4

 झेब्राच्या अंगावर पट्टे का असतात ? http://bit.ly/38qtgdl


             ☬ निसर्गाने प्रत्येकाच्या संरक्षणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. झेब्राच्या अंगावर असलेले काळे-पांढरे पट्टेही असेच आहेत. त्याबाबत सतत संशोधन होत असते. द‍ृष्टिभ्रम निर्माण करणे हा त्यामागील हेतू असावा, असे एक संशोधन गेल्यावेळी झाले होते. आता संशोधकांनी म्हटले आहे की, हा द‍ृष्टिभ्रम केवळ मोठ्या शिकार्‍यांसाठीच नाही तर माशीसारख्या छोट्या जीवांसाठीही आहे. किडे-माश्या यांच्यापासून रक्षण करण्यासाठी झेब्य्राला अशा पट्ट्यांचा उपयोग होतो.

*रक्‍त शोषणारे किडे व माश्यांना दूर ठेवण्यासाठी झेब्रा या पट्ट्यांचा उपयोग करीत असतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. या किड्यांना दूर ठेवून ते त्यांच्यामुळे फैलावणार्‍या रोगांनाही दूर ठेवत असतात. संशोधकांनी यासाठी एक प्रयोग करून पाहिला. त्यांनी घोड्याच्या देहावर असे पट्टे निर्माण करून तिथे किती किडे, माश्या येतात यावर नजर ठेवली. त्यांना असे दिसून आले की नेहमीप्रमाणेच अनेक किडे व माश्या तिथे आल्या;ⁱ  पण या पट्ट्यांमुळे त्यांना तिथे उतरण्यात अडचण येत होती. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील मार्टिन हाऊ यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की या माश्या तिथे आल्यावर पट्ट्यांमुळे त्यांचे डोळे भ्रमित होत असत. द‍ृष्टीत अडचण आल्याने त्यांना तिथे उतरण्यात अडचणी आल्या.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,झेब्राला आफ्रिकन हॉर्स सिकनेस, ट्रायपेंसोमाइसिस आणि एन्फ्लुएंझासारख्या काही घातक आजारांचा धोका असतो. हे आजार हॉर्स फ्लाईज नावाच्या माशीमुळे फैलावतात. अशा माश्यांना दूर ठेवण्यासाठीही त्यांच्या शरीरावरील या पट्ट्यांचा उपयोग होत असतो.

0

झेब्राच्या अंगावर पट्टे असण्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे आहेत:

  • Camouflage ( Camouflage):

    सवाना गवताळ प्रदेशात, जिथे झेब्रा राहतात, तेथे हे पट्टे त्यांना नैसर्गिकरित्या लपण्यास मदत करतात. दूरून पाहिल्यास, त्यांचे शरीर गवतामध्ये मिसळून जाते आणि ते लवकर दिसत नाहीत.

  • Insect Repellent ( कीटक प्रतिबंधक):

    काही संशोधनानुसार, झेब्राच्या अंगावरील पट्ट्यांमुळे कीटक आणि माश्या त्यांच्यावर बसू शकत नाहीत. पट्ट्यांमुळे प्रकाशाचे ध्रुवीकरण होते आणि त्यामुळे कीटकांना झेब्रा स्पष्टपणे दिसत नाही.

    संशोधन (Ref:) Science.org

  • Temperature Regulation ( तापमान नियंत्रण):

    काही तज्ञांच्या मते, काळे पट्टे अधिक उष्णता शोषून घेतात, तर पांढरे पट्टे उष्णता परावर्तित करतात. यामुळे झेब्राच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

  • Social Recognition ( सामाजिक ओळख):

    प्रत्येक झेब्राच्या अंगावरील पट्टे वेगळे असतात, जसे माणसांचे फिंगरप्रिंट. त्यामुळे झेब्रा एकमेकांना ओळखू शकतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2540

Related Questions

कै. मारूती चितमपल्ली यांनी वर्णन केलेला माकडाची लाकडे हा अनुभव दुसऱ्या कोणत्या भारतीय किंवा परदेशी वन्यपशु अभ्यासकाला आला आहे का?
भुकेलेल्या वासराकडे कोण धाव घेते, लिहा?
हत्ती स्वतःचे घर का नाही बांधत?
लांडगा या प्राण्याला पाळले का जात नाही?
असा कोणता प्राणी आहे जो आपले लिंग बदलू शकतो?
पाल तिची शेपटी का टाकते?
घोडा हा प्राणी का बसत नाही?