प्राणी प्राणी वर्तन

घोडा हा प्राणी का बसत नाही?

2 उत्तरे
2 answers

घोडा हा प्राणी का बसत नाही?

26
घोड्याला पृथ्वीवर माणसाचा सगळ्यात प्रिय श्वापद म्हणून ओळखले जाते. प्राचीन काळापासून घोडा हा रहदारीचे साधन म्हणून वापरला जात असे. घोडा त्याची चाल आणि वफादारीसाठी ओळखला जातो. आजच्या या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला घोड्यांबद्दल अशी काही महत्वाची माहिती सांगणार आहे ज्या बद्दल तुम्हाला काहीही कल्पना नसेल.

१. घोडा उभा राहून व जमिनीवर बसून दोन्ही मार्गांनी झोपू शकतो.


२. घोड्यांचा छोटा बाळ जन्माला येण्याच्या काही वेळातच चालायला सुरवात करतो.


३. साधारणपणे घोडा 25 वर्षापर्यंत जगतात.


४. घोडा हा शाह्कारी प्राणी आहे आणि कधीही मांस खात नाही.


५. जमिनीवर राहणाऱ्या सर्व जीवांमध्ये घोड्याचे डोळे सर्वात मोठे असतात. घोडा काळोखात माणसापेक्षा जास्त स्पष्ट बघू शकतो.


६. घोड्यांचे डोळे त्यांच्या तोंडाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असतात आणि म्हणूनच घोडा १ वेळेला ३६० डिग्री मध्ये बघू शकतो.


७. निरोगी घोड्याची चाल जवळ जवळ ४४ किलोमीटर प्रति तास एवढी असते.


८. जगभरात जवळ जवळ ६ करोड घोडे आहेत.


९. नर घोड्याला इंग्लीश मध्ये "Stallion" म्हणतात. मादा घोड्याला इंग्लीश मध्ये "Mare" म्हणतात.


१०. घोडे जेव्हा दात बाहेर काढून हसल्यासारखे वाटतात तेव्हा ते हसत नसून काही तर वास घेण्याचा प्रयत्न करत असतात.


११. घोड्यांचा जबडा त्यांच्या मेंदूपेक्षा मोठा असतो. नर घोड्याचे ४० दात असतात आणि मादा घोड्यांचे ३६ दात असतात.


१२. सामान्य घोड्यांच्या मेंदूच वजन माणसाच्या मेंदूपेक्षा अर्ध्या वजनाचे असते.


१३. घोडा कधीच उलटी करू शकत नाही. घोडे हे गोड खाणे पसंद करतात त्यांना आंबट व कडू गोष्टी आवडत नाहीत.


१४. घोडा ज्या दिशेला त्याचे कान फिरवतो समजायचे त्याच दिशेला तो बघत आहे.


१५. घोड्यांचा तोंडामध्ये १ दिवसाला १ गॅलन एवढी लाळ तयार होते.


१६. घोडा गरमीच्या दिवसात १०० लिटर पाणी एका दिवसात पिऊ शकतो.


१७. घोडा आपल्या कानाला १८० डिग्री पर्यंत फिरवू शकतो.


मित्रोंना तुम्हाला हा मराठी चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला uttar la cometment fallo kara Suraj Gaykawad
उत्तर लिहिले · 13/2/2020
कर्म · 3385
0

घोडा उभा राहू शकतो कारण त्याच्या शरीराची रचना त्याला मदत करते.

घोड्याच्या शरीराची रचना:
  • 'स्टे аппаратус' (Stay Apparatus): घोड्यांमध्ये 'स्टे аппараatus' नावाचे एक अद्वितीय शारीरिक रचना असते. यामुळे त्यांना कमीत कमी स्नायूंच्या प्रयत्नांनी उभे राहता येते.
  • सांधे आणि अस्थिबंधन (Joints and Ligaments): घोड्यांच्या पायांतील सांधे आणि अस्थिबंधन मजबूत असतात, जे त्यांना स्थिर ठेवतात.
बसण्याचे तोटे:
  • ऊर्जा खर्च: घोड्याला बसण्यासाठी आणि उठण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते.
  • शिकारी प्राणी: घोडा हा शिकार होणारा प्राणी आहे. बसलेल्या स्थितीत तो सावध राहू शकत नाही आणि त्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तो शक्यतोवर उभा राहणे पसंत करतो.

त्यामुळे, शारीरिक रचना आणि नैसर्गिक धोक्यांपासून बचाव करण्यासाठी घोडा बहुतेक वेळा उभा राहतो.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2540

Related Questions

कै. मारूती चितमपल्ली यांनी वर्णन केलेला माकडाची लाकडे हा अनुभव दुसऱ्या कोणत्या भारतीय किंवा परदेशी वन्यपशु अभ्यासकाला आला आहे का?
भुकेलेल्या वासराकडे कोण धाव घेते, लिहा?
हत्ती स्वतःचे घर का नाही बांधत?
लांडगा या प्राण्याला पाळले का जात नाही?
असा कोणता प्राणी आहे जो आपले लिंग बदलू शकतो?
पाल तिची शेपटी का टाकते?
झेब्रा प्राण्याच्या अंगावर पट्टे का असतात?