सण होळी

होळी का पेटवतात?

2 उत्तरे
2 answers

होळी का पेटवतात?

5
देशभरात आज होळीला उत्साहात सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी पेटवण्यात येते. जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे. साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचा. यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या. पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या, गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात. गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं. हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. थंडीनंतर सुरु होणार्या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते.
या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा; पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी होता. परंतु आता मात्र पारंपारिक होळीच स्वरूपच पूर्णपणे बदललं आहे. आता होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल केली जाते, तसेच होळी पेटवताना त्यात प्लॅस्टिक, टायरदेखील जाळले जाते त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होतं जाते.

0

होळी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी पेटवण्यामागे अनेक कारणे आहेत:

  • वाईटावर चांगल्याचा विजय: होळी पेटवणे हे वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार, होलिका नावाच्या राक्षसीने प्रल्हाद नावाच्या एका लहान मुलाला मारण्याचा प्रयत्न केला, कारण तो भगवान विष्णूचा भक्त होता. होलिका अग्नीमध्ये जळू शकत होती, त्यामुळे तिने प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश केला. परंतु, विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून खाक झाली. त्यामुळे, होळी पेटवून होलिका दहन करणे म्हणजे वाईटाचा नाश करणे होय.
  • नकारात्मक ऊर्जा दूर करणे: होळीच्या वेळेस वातावरणात नकारात्मक ऊर्जा जास्त असते, त्यामुळे होळी पेटवल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
  • नवीन सुरुवात: होळीनंतर नवीन वर्षाची सुरुवात होते, त्यामुळे होळी पेटवणे म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टींना सुरुवात करणे.
  • सामाजिक एकोपा: होळीच्या निमित्ताने लोक एकत्र येतात आणि एकमेकांना रंग लावतात. यामुळे लोकांमध्ये सामाजिक एकोपा वाढतो.

अधिक माहितीसाठी हे दुवे पहा:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1080

Related Questions

होळी म्हणजे काय आहे?