कागदपत्रे पेटंट तंत्रज्ञान

पेटंट आपल्या नावावर करून घेणे म्हणजे नक्की काय? ते कसे मिळवले जाते?

2 उत्तरे
2 answers

पेटंट आपल्या नावावर करून घेणे म्हणजे नक्की काय? ते कसे मिळवले जाते?

4
_*🏷️‘पेटंट’ आपल्या नावावर करून घेणं म्हणजे नक्की काय? ते कसं मिळवलं जातं?*_

*🔰📶महा डिजी । विशेष*

💡एखाद्याची कल्पना चोरून त्याची नक्कल करणे हा एक गुन्हाच आहे. आता तुम्ही विचाराल, कल्पनांची चोरी म्हणजे नक्की कसली चोरी, अहो म्हणजे एखाद्याने जर नवीन शोध लावला असेल तर तसाच शोध किंवा वस्तू बनवून ती आपली म्हणून सांगायची.

*🧐पेटंट कशाला म्हणतात?*

👉पेटंट एक अधिकार आहे जो एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही एकदम नवीन सेवा, तांत्रिक, प्रक्रिया, उत्पादन किंवा डिझाईनसाठी दिले जाते, कारण कोणीही त्याची नक्कल तयार करू शकत नाही.

👉पेटंट एक असा अधिकार आहे, जो मिळाल्यानंतर जर कोणीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही उत्पादनाचा शोध करते किंवा बनवते तर ते त्या उत्पादनाला बनवण्याचा एकाधिकार प्राप्त करते.

👉जर पेटंट मिळालेल्या व्यक्तीऐवजी इतर कोणी व्यक्ती किंवा संस्था याच उत्पादनाला बनवते, तर ते बेकायदेशीर मानले जाते.

👉जर पेटंट मिळालेल्या व्यक्तीने त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवल्यास पेटेंटचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

👉पण जर कोणी या उत्पादनाला बनवू इच्छित असेल तर त्याला पेटेंट मिळालेल्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून परवानगी घ्यावी लागेल आणि त्याला रॉयल्टी देणे गरजेचे आहे.

*📌आता वर्ल्ड ट्रेड संघटनेने पेटेंट लागू राहण्याचा कालावधी २० वर्ष केला आहे, जो पहिले प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा होता.*
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
*👉पेटंटचे दोन प्रकार असतात*

*१.उत्पादन पेटंट:*

याचा अर्थ हा आहे की, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था एखाद्या उत्पादनाची एकदम हुबेहूब नक्कल करू शकत नाही, म्हणजे दोन उत्पादनांची डिझाईन सारखी असू शकत नाही.

*हे अंतर उत्पादनाची पॅकिंग, नाव, रंग, आकार आणि चव इत्यादीचा असतो.*

*२.प्रक्रिया पेटंट:*

या प्रकारच्या पेटंटचा अर्थ कोणताही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही उत्पादनाला बनवण्यासाठी त्याच पद्धतीचा वापर करू शकत नाही, ज्या प्रक्रियेचा वापर करून एखाद्या उत्पादनाला पहिलेच बनवले असेल.

*म्हणजेच प्रक्रिया पेटंटमध्ये कोणतेही उत्पादन बनवण्याची पद्धत चोरी करू शकत नाही.*

*❓पेटंट कसे मिळवले जाते?*

▪प्रत्येक देशामध्ये पेटंट कार्यालय असते. आपले उत्पादन किंवा प्रक्रियचे पेटंट मिळवण्यासाठी पेटेंट कार्यालयामध्ये अर्ज द्या आणि आपल्या नवीन शोधाचे वर्णन केलेला अहवाल द्या.

▪त्यानंतर पेटंट कार्यालय त्याची पडताळणी करेल आणि जर ते उत्पादन किंवा प्रक्रियेचा विचार नवीन असेल, तर पेटंट देण्याचा आदेश दिला जातो.

▪येथे ही गोष्ट जाणून घेणे खूप गरजेचे आहे की, उत्पादन किंवा सेवेसाठी घेण्यात आलेले पेटंट फक्त त्याच देशासाठी लागू झालेला असतो, ज्या देशामध्ये पेटंट केले गेले असेल.

*📌भारतीय पेटंट कार्यालयाला पेटेंट डिझाईन आणि ट्रेड मार्क्स (सीडीपीडीटीएम) चे नियंत्रक जनरलच्या कार्यालयद्वारे प्रशासित केले जाते. याचे मुख्यालय कोलकात्यामध्ये आहे आणि हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतात.*
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_

https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 23/2/2020
कर्म · 569265
0
पेटंट (Patent) म्हणजे काय?

पेटंट हे एक प्रकारचे बौद्धिक संपदा अधिकार (Intellectual Property Right) आहे, जे सरकारद्वारे एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्यांच्या शोधासाठी दिले जाते. पेटंट मिळाल्यानंतर, त्या शोधाचा वापर, उत्पादन किंवा विक्री करण्याचा अधिकार फक्त पेटंटधारकाकडे असतो.

पेटंट मिळवण्याची प्रक्रिया:

  • शोधाचे मूल्यांकन (Evaluation of the Invention):
    • पेटंट मिळवण्यासाठी, तुमचा शोध नवीन (Novel) आणि उपयोगी (Useful) असणे आवश्यक आहे.
    • त्याचबरोबर, तो शोध 'स्पष्ट नसलेला' (Non-obvious) असावा, म्हणजे तो त्याच क्षेत्रातील तज्ञांना सहजपणे समजण्यासारखा नसावा.
  • पेटंट शोध (Patent Search):
    • अर्ज करण्यापूर्वी, पेटंट डेटाबेसमध्ये (Patent Database) शोधा की तुमचा शोध आधीच अस्तित्वात नाही ना.
    • यासाठी तुम्ही ऑनलाइन टूल्स (Online Tools) आणि डेटाबेसची मदत घेऊ शकता.
  • पेटंट अर्ज दाखल करणे (Filing a Patent Application):
    • पेटंट अर्ज दाखल करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या शोधाचे संपूर्ण विवरण (Detailed Description), दावे (Claims) आणि आवश्यक आकृत्या (Drawings) सादर कराव्या लागतील.
    • भारतात, तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पेटंट अर्ज दाखल करू शकता.
  • परीक्षण (Examination):
    • अर्ज दाखल केल्यानंतर, पेटंट ऑफिस तुमच्या अर्जाची तपासणी करते.
    • परीक्षक (Examiner) तुमचा शोध नवीन आहे की नाही आणि तो पेटंट कायद्यानुसार योग्य आहे की नाही हे तपासतात.
  • पेटंट मंजूर (Grant of Patent):
    • जर तुमचा अर्ज सर्व आवश्यकता पूर्ण करत असेल, तर पेटंट ऑफिस तुम्हाला पेटंट मंजूर करते.
    • पेटंट मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या शोधाचे अधिकार मिळतात.

टीप: पेटंट मिळवणे एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि यासाठी तज्ञांची मदत घेणे फायदेशीर ठरू शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: IP India

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5280

Related Questions

कॉम्प्युटर घेताना काय तपासणी करावी?
इंटरनेटवर टिपा लिहा?
कार्यालयीन स्वयंचलन म्हणजे काय? कार्यालय स्वयंचलन प्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
वयक्तीक Quiz बनलाय ची असेल तर ॲप्लिकेशन कोणतं घ्यावे?
संगणकाची व्याख्या सांगून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आज्ञावली यातील फरक स्पष्ट करा?
मोबाइल चार्जर कसा बंद पडतो असे मानले जाते?
पंख्याचा वेग कमी असल्यास कोणते घटक बदलता येतील?